Home » Pamban Bridge : अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार ठरणारा पांबन पूल !

Pamban Bridge : अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार ठरणारा पांबन पूल !

by Team Gajawaja
0 comment
Pamban Bridge
Share

रामनवमीच्या मुर्हूतावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील रामेश्वरम येथे भारतातील पहिल्या उभ्या लिफ्ट समुद्री पुलाचे उद्घाटन केले. या पांबन पूलाचे उद्घाटन करत त्यांनी रामेश्वरम आणि तांबरम दरम्यान नवीन रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवला. याचवेळी या पूलाखालून तटरक्षक दलाचे जहाजही रवाना झाले. जगातील काही मोजक्या आणि आशियातील पहिल्या उभ्या लिफ्ट पुलांपैकी हा पांबन पूल एक ठरला आहे. अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार म्हणून या पूलाची गणना होत आहे. या सागरी पूलाखालून आता मोठी जहाजेही सहजपणे पार होणार आहेत. त्यासाठी 17 मीटर पर्यंत पूल उंच उचलण्याची सुविधा यात आहे. (Pamban Bridge)

विशेष म्हणजे, या दरम्यान पूलावरील रेल्वे वाहतूकही सुरळीत रहाणार आहे. हा पांबन पूल रामेश्वरम बेटाला देशाच्या अधिक जवळ घेऊन येणार आहे. याच मार्गावर पहिला पांबन पूल 1914 मध्ये ब्रिटिश अभियंत्यांनी बांधला होता. हा जुना पांबन पूल लाकडाच्या आधारे तयार करण्यात आला होता. एका शतकाहून अधिक काळ, हा पूल यात्रेकरू, पर्यटक आणि व्यापाऱ्यांसाठी जीवनरेखा ठरला. मात्र एका चक्रीवादळात या पूलाचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर त्यामध्ये दुरुस्ती करुन पूल चालू कऱण्यात आला. परंतु वाढती रेल्वे वाहतूक लक्षात घेता, सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये या मार्गावर नवीन पांबन पूल बांधण्यास मान्यता दिली. हा नवीन पूल 2021 मध्ये पूर्ण होईल, अशी आशा होती. पण दरम्यान आलेल्या कोरोना महामारीमुळे पूलाच्या बांधकामात खंड पडला. आता हा नवा पांबन पूल रामनवमीच्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांसाठी खुला केला आहे. (Marathi News)

भगवान रामाच्या सैन्याने रामेश्वरमजवळील धनुषकोडी येथून रामसेतूचे बांधकाम सुरू केले. येथेच असलेला नवीन पांबन पूल हा सांस्कृतिक आणि पौराणिक वारसा जसा जोपासत आहे, तसाच हा पूल भारतीय अभियांत्रिकी क्षेत्रातील झेपही अवघ्या जगाला दाखवत आहे. या पूलाच्या कामात 550 कोटीहून अधिक रुपये खर्च झाले आहेत. 2.08 किलोमीटर लांबीच्या या पुलावर 99 स्पॅन आहेत. शिवाय या पूलाचा जो भाग मोठे जहाज आल्यावर वर उचलला जातो, तो भाग 72.5 मीटर लांब आहे. (Pamban Bridge)

त्याची किंमत 550 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या पूलाखालून कितीही मोठं जहाज विनाअडथळा जाणार आहे. याचवेळी रेल्वे सेवा कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरू रहाणार आहे. हा पूल उभारतांना मुख्य आव्हान होतं, ते समुद्राच्या पाण्याचे आणि त्यावरुन वाहणा-या हवेचे. या खा-या हवेमुळे पूलासाठी जे लोखंड किंवा अन्य सामुग्री वापरली जाते, तिला लवकर गंज पकडण्याचा धोका असतो. यासाठी पूल बनवतांना स्टेनलेस स्टिलचा वापर करण्यात आला असून त्यावर एक विशेष पॉलिसिलॉक्सेन लेप लावण्यात आला आहे. हा नवीन पांबन पूल रेल विकास निगम लिमिटेडने उभारला आहे. जिथे पूल तयार करण्यात आला आहे या भागात मोठी चक्रीवादळे होतात, त्यामुळे एक मजबूत डिझाइन तयार करण्यात आले, आणि त्यावर सर्वोत्तम साहित्य वापरून हा पांबन पूल तयार करण्यात आला आहे. या नवीन पांबन पुलाची बरोबरी अमेरिकेतील गोल्डन गेट ब्रिज, लंडनचा टॉवर ब्रिज आणि डेन्मार्क आणि स्वीडनला जोडणाऱ्या ओरेसुंड ब्रिजसोबत करण्यात येत आहे. (Marathi News)

हा पूल उभारतांना मुख्य आव्हान हे जोरदार समुद्री वा-यांचे होते. पण समुद्रातील वाऱ्याचा वेग ताशी 58 किमी किंवा त्याहून अधिक झाला तरच येथे स्वयंचलित लाल सिग्नल दिला जाणार आहे. अशावेळी वाऱ्याचा वेग सामान्य होईपर्यंत रेल्वे वाहतूक बंद राहील. ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान या भागात जोरदार वारे वाहतात. अशी घटना घडली, तर तेव्हा वाहतूक बंद रहाणार आहे. या पूलासाठी वापरण्यात आलेले तंत्रज्ञान वैशिष्टपूर्ण आहे. उभ्या लिफ्ट पूलाची सर्व यंत्रणा बॅलन्सिंग सिस्टमवर आहे. जेव्हा पूल खाली येतो तेव्हा प्रति-वजन त्याच्या वजनाला आधार देतात. या तंत्रज्ञानामुळे पूल जास्त भार सहन करू शकतो. दक्षिण रेल्वेने 12 जुलै 2024 रोजी नवीन पांबन पुलावर हलक्या इंजिनची चाचणी घेतली होती. तर 31 जानेवारी 2025 रोजी रामेश्वरम एक्सप्रेस ट्रेनची यशस्वी चाचणी घेण्यात आली. या दरम्यान, भारतीय तटरक्षक दलाच्या गस्त घालणाऱ्या बोटीसाठी प्रथमच उभ्या लिफ्ट पूलला वर उचलण्यात आले होते. (Pamban Bridge)

=========

हे देखील वाचा : Pamban Bridge : जाणून घ्या भारतातील पहिल्या व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिजची वैशिष्ट्ये

Pitongtarn Shinawatra : ती फक्त सुंदर नाही, उत्तम प्रशासकही आहे…

==========

जुना पांबन पूल हा जवळपास 100 वर्ष काम करीत होता. 24 फेब्रुवारी 1914 रोजी या पूलावरुन वाहतूक सुरु झाली. 2.06 किमी लांब असलेला हा भारतातील पहिला समुद्री पूल होता. 23 डिसेंबर 1964 रोजी 240 ताशी वेगाने आलेल्या चक्रीवादळामुळे या पुलाचे मोठे नुकसान झाले. यामध्ये एक ट्रेनही उलटली. यात 150 प्रवाशांचा मृत्यू झाला. यानंतर अवघ्या 46 दिवसात या पूलाची दुरुस्ती करण्यात आली आणि तो पुन्हा वाहतुकीसाठी खुला कऱण्यात आला. मात्र वाढत्या रेल्वे वाहतुकीनं या मार्गावर नवीन पूल बांधावा अशी मागणी होती. 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नवीन पूलाच्या बांधकामाची आधारशिला ठेवली. आता त्यांच्याच हस्ते या नवीन पांबन पुलाचे उद्घाटन कऱण्यात आले आहे. (Marathi News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.