भारतात प्रवासाचे सर्वाधिक मोठे आणि सोप्पे साधन म्हणजे भारतीय रेल्वे. सणासुदीच्या काळात रेल्वेमध्ये ऐवढी गर्दी होते की, शेकडो स्पेशन ट्रेन चालवल्या जातात. यंदाच्या दिवाळी निमित्त सुद्धा तसेच करण्यात आले आहे. दिवाळीच्या वेळी सर्व स्थानकांवर होणारी गर्दी पाहता भारतीय रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात वाढ केली आहे. बहुतांश ठिकाणी जेथे १० रुपयांचे प्लॅटफॉर्म तिकिट आता ५० रुपयांना विक्री केले जात आहे. तर कुठे ३० रुपयांना. (Platform Ticket Price)
खासकरुन रेल्वे स्थानकात पोहचवण्यासाठी किंवा एखाद्याला घेण्यासाठी लोकांना प्लॅटफॉर्म तिकिट घ्यावे लागते. सणाच्यावेळी बहुतांश लोक प्रवास करतात. अशातच रेल्वेने असे म्हटले आहे की, दिवाळीसारख्या सणाच्या वेळी प्लॅटफॉर्मवर गर्दी कमी करण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी कोरोनाच्या काळात सुद्धा गर्दी कमी करण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात वाढ करण्यात आली होती.

प्लॅटफॉर्म तिकिटाच्या माध्यमातून किती कमवते भारतीय रेल्वे?
नोव्हेंबर २०१९ मध्ये भाजपचे पीयूष गोयल हे रेल्वेमंत्री होते. लोकसभेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नानुसार त्याचे उत्तर देताना सांगितले की, २०१८-१९ मध्ये प्लॅटफॉर्म तिकिटाच्या माध्यमातून १३९.२० कोटी रुपयांची कमाई झाली होती. तर २०१९-२० मध्ये रेल्वेमध्ये प्लॅटफॉर्म तिकिटातून १६०.८७७ कोटी रुपयांची कमाई झाली.
अशाप्रकारे प्रत्येक महिन्याला रेल्वेला जवळजवळ १०-१५ कोटी रुपयांची कमाई होते. सणाच्या वेळी अधिक गर्दी होत असल्याने तिकिटाची अधिक विक्री होते.अशातच रेल्वे गर्दी कमी करण्यासह तिकिटाच्या दरात वाढ करत महसूलात वाढ करण्याचा प्रयत्न करते. (Platform Ticket Price)
हे देखील वाचा- रेल्वेत एका तिकिटावर मर्यादेपेक्षा अधिक सामान घेऊन जात असाल तर भरावा लागेल दंड
कोणत्या स्थानकात प्लॅटफॉर्मच्या तिकिटात वाढ केलीय?
रेल्वने मुंबई सेंट्रल दादर, बोरिवली, वांद्र टर्मिनस, वापी, वलसाड, उढना आणि सुरत मध्ये प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर १० रुपयांवरुन ५० रुपये करण्यात आले आहे. दिल्लीतील नवी दिल्ली, पुरानी दिल्ली, आनंद विहार टर्मिनल, हजरत निजामुद्दीन, दिल्ली सराय रोहिल्ला आणि गाजियाबाद मधील स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर १० रुपयांवरुन २० रुपये करण्यात आले आहे. तर दक्षिण रेल्वेच्या एमजीआर चेन्नई सेंट्रल, चेन्नई इग्मोर, तंबरम, कटपाडी, चेंगलपट्टू, अराक्कोणम, तिरुवल्लूर आणि अवाडी स्थानकात प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर १० रुपयांवरुन २० रुपेय करण्यात आले आहे.