Home » Vegetarian : ‘हे’ आहे भारतातीलच नव्हे तर जगातील एकमेव शाकाहारी शहर

Vegetarian : ‘हे’ आहे भारतातीलच नव्हे तर जगातील एकमेव शाकाहारी शहर

by Jyotsna Kulkarni
0 comment
Vegetarian
Share

आजकाल शाकाहारी होण्याचे प्रमाण वाढले असले तरी मांसाहारी लोकं कमी झालेली नाही. अगदी चवीने आणि आवडीने नॉनव्हेज खाणारी बहुसंख्य जनता आपल्या आजूबाजूला दिसते. नॉनव्हेज खाणे आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे आहे, असे सांगून अनेक लोकं नॉनव्हेज खातात तर, नॉनव्हेज हे आपल्यासाठी घातक असून, नॉनव्हेज खाल्ल्याने अनेक त्रास उद्भवू शकतात असे सांगून काही लोकं नॉनव्हेज खात नाही. काही लोकांच्या घरात तर नॉनव्हेज शब्द उच्चारणे देखील पाप असते. (Vegetarian)

सध्या अनेक मोठमोठ्या सेलेब्रिटींपासून ते उद्योजक, खेळाडू सर्वच शाकाहारी होताना दिसत आहे. शाकाहारी होण्याचे अनेक फायदे असल्याने कट्टर नॉनव्हेज खाणारे लोकं आता शाकाहारी होत आहे. असे असले तरी आपल्या आजूबाजूला नॉनव्हेज खाणारे लोकं असतातच. मात्र भारतात एक असे ठिकाण, एक असे गाव आहे जे पूर्णपणे शाकाहारी आहे. या गावात कोणत्याही प्रकारचे नॉनव्हेज जेवण मिळत नाही. हे गाव केवळ भारतातील नव्हे तर जगातील एकमेव शाकाहारी असलेले गाव आहे. जाणून घेऊया याच गावाबद्दल. (Gujrat)

भारतातील अतिशय प्रसिद्ध राज्य म्हणजे गुजरात. याच गुजरात राज्यात पालीताना या शहरात नॉन व्हेज वर संपूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. भावनगर जिल्ह्यातील पालीताना येथे केवळ शुद्ध शाकाहारी जेवण मिळते. पालीताना हे जगातले पहिले शाकाहारी शहर बनले आहे. येथे आता केवळ शाकाहारी पदार्थ मिळतील असे म्हटले जात आहे. असे नाही की हे शहर पूर्वीपासूनच शाकाहारी होते. या शहरात देखील मांसाहारी पदार्थ मिळायचे. मात्र साधारण दहा वर्षांपूर्वी येथे जैन साधूंनी केलेल्या दीर्घ आंदोलनानंतर हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. मुख्य म्हणजे या अनोख्या निर्णयाची संपूर्ण देशभरात खूपच चर्चा झाली. पालीताना गुजरातच्या अहमदाबाद पासून ३८१ किमीवर आहे. येथे रस्ते मार्गे येण्यासाठी किमान सात तास लागतात. (Marathi News)

२०१४ मध्ये, गुजरात सरकारने पालीताना शहराला संपूर्ण शाकाहारी घोषित केले होते. येथे जगभरातून जैन धर्माचे अनुयायी मोठ्या संख्येने येतात. पालीताना हे जैन धर्माचे अत्यंत मुख्य आणि महत्त्वाचे धार्मिक स्थान आहे. त्यामुळेच हे भारतातील एकमेव ठिकाण आहे जे पूर्णपणे शाकाहारी आहे. या शहरात मांसाहारावर पूर्णपणे बंदी आहे. एका वृत्तानुसार, पालीताना शहरात मोठ्या प्रमाणात जैन मंदिरे आहेत. हे शहर गुजरातच्या भावनगर जिल्ह्यात आहे. येथे शत्रुजयाच्या टेकड्या आहेत. (Todays Marathi Headline)

Vegetarian

आश्चर्याची बाब म्हणजे जगातील ही एकमेव टेकडी आहे जिथे ९०० पेक्षा जास्त मंदिरे आहेत. २०१४ मध्ये, शेकडो जैन साधू आणि संतांनी येथे उपोषण करत, सरकारने जनावरांच्या हत्येवर बंदी घालण्याची आणि कत्तलखाने बंद करण्याची मागणी केली होती. पालिताना हे श्वेतांबर जैन समुदायाचे मुख्य तीर्थक्षेत्र आहे. शत्रुंजय टेकडीवर असलेली सुमारे ९०० मंदिरे आहेत, जी “सिद्धक्षेत्र” (मोक्ष प्राप्तीचे स्थान) मानली जाते. जैन मान्यतेनुसार, या टेकडीवर अनेक तीर्थंकरांना मोक्ष मिळाला होता. (Marathi News)

साधू संतांच्या निषेधापुढे राज्य सरकारला झुकावे लागले. येथे अनेक ऋषीमुनींना मोक्ष मिळालेत असे मानले जाते. अशा स्थितीत जैन संतांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण करून येथे कडक कायदा करण्यात आला. तसेच हा नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई झाली, तेव्हा पालीताणा हे जगातील पहिले शाकाहारी शहर ठरले. जैन धर्माचे हे तीर्थस्थळ आहे. जैन धर्माचे पहिले तीर्थंकर आदिनाथ हे या ठिकाणी पहाडांवर गेल्याचे म्हटले जाते. तेव्हापासून हे स्थळ जैन धर्माच्या अनुयायांसाठी तिर्थस्थळ ठरले आहे. (Top Marathi News)

पालितानाची एकूण लोकसंख्या सुमारे ६५००० आहे. साक्षरता दर ८५% आहे. येथील ६०% लोक जैन समुदायाचे आहेत. ३५% हिंदू आणि ५% मुस्लिम आहेत. येथे राहणारे मुस्लिम देखील मांसाहार करू शकत नाहीत. धार्मिक पर्यटन या शहराच्या अर्थव्यवस्थेला चालना देते. दरवर्षी लाखो भाविक आणि पर्यटक येथे येतात. मंदिर प्रशासन, हॉटेल्स आणि धर्मशाळा मोठ्या प्रमाणात रोजगार प्रदान करतात. दर १२ वर्षांनी येथे महामस्तकाभिषेकचा भव्य सोहळा आयोजित केला जातो. मांसाहारी अन्नावर बंदी असल्याने येथे कार्बन फूटप्रिंट कमी आहे. शाकाहारी आहारामुळे आरोग्याच्या समस्या कमी होतात. येथील बहुतेक मुस्लिम कुटुंबे स्थानिक जैन आणि हिंदू समुदायांसोबत एकोप्याने राहतात. (Marathi Latest Headline)

मुख्य म्हणजे पालितानामध्ये केवळ नॉनव्हेज नाही तर कांदे आणि लसूण विक्री आणि वापरावर बंदी आहे. स्थानिक बाजारात तुम्हाला कांदे आणि लसूण मिळणार नाहीत. रेस्टॉरंट्स किंवा घरांमध्येही ते वापरले जात नाहीत. जर तुम्हाला कांदे किंवा लसूण खरेदी करायचे असेल तर तुम्हाला भावनगरसारख्या शेजारील शहरांमध्ये किंवा जिथे कोणतेही निर्बंध नाहीत अशा ठिकाणावरून आणले जातात. (Top Trending News)

========

Winter : हिवाळ्यामध्ये फिरण्यासाठी ‘या’ जंगल सफारी आहेत उत्तम पर्याय

========

नॉनव्हेज बंदीमुळे पालीताना येथे अनेक शाकाहारी रेस्टॉरंट उघडण्यात आले आहेत. येथे विविध प्रकारचे अतिशय चविष्ट असे शाकाहारी पदार्थ वाढले जातात. तुम्हालाही इथे जायचे असेल, तर तुम्हाला गुजरातमधील भावनगरहून पालीतानाला जाण्यासाठी बस किंवा टॅक्सीची व्यवस्था उपलब्ध आहे. हे ठिकाण शहरापासून ५० किलोमीटर अंतरावर आहे. यासोबतच तुम्ही वडोदरा किंवा अहमदाबादहून ट्रेन किंवा बसनेही येथे पोहोचू शकता. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.