Home » ३ बायका आणि ६० मुलं… तरीही थांबायचे नाव नाही, सरकारकडे केलीय ‘ही’ अजब मागणी

३ बायका आणि ६० मुलं… तरीही थांबायचे नाव नाही, सरकारकडे केलीय ‘ही’ अजब मागणी

by Team Gajawaja
0 comment
Pakistani man welcome 60th child
Share

पाकिस्तानात एक व्यक्ती ६० मुलांचा बाबा झाला तरीही त्याला आणखी मुलं जन्माला घालायची इच्छा आहे. या व्यक्तीला तीन बायका सुद्धा आहेत. व्यक्तीचे नाव सरदार जान मोहम्मद खान खिलजी असे आहे. डेली स्टार युकेच्या नुसार ५० वर्षीय सरदार जान मोहम्मद खान खिलजी हा पेशाने डॉक्टर आहे. त्याची ६० मुल आणि तीन बायका असल्याने तो चर्चेत आला आहे. आता त्याला आणखी बायको हवी आहे. जिच्यापासून तिला मुलं हवयं रिपोर्ट्सनुसार, खिलजी बलूचिस्तान मधील क्वेटा शहराजवळ ईस्टर्न बाइपासजवळ राहतो.(Pakistani man welcome 60th child)

लग्नासाठी शोधतोय मुलगी शोधतोय
स्थानिक मीडिया सोबत बातचीत करताना आपल्या मुलांची संख्या किती आहे हे सांगतनाना त्याने असे म्हटले की, त्याला आणखी एका मुलीशी लग्न करायचे आहे. तिचा तो शोध ही घेत आहे. दरम्यान, खिलजी आपल्या तीन पत्नी आणि मुलांसह एकाच घरात राहतो. वयाच्या ५० व्या वर्षी सुद्धा त्याला आपला परिवार वाढवायचा आहे.

खिलजी यावेळी ६० व्या मुलाचा बाबा झाला आहे. तरीही त्याला आणखी मुलं हवी आहेत. सध्या त्याचा त्यावरच थांबवण्याचा विचार ही नाही. त्याला या वयातही आणखी एक बायको आणि मुलासोबत रहायचे आहे.

परिवाराला फिरवण्यासाठी बसची मागणी
ऐवढेच नव्हे तर कंगाल झालेल्या पाकिस्तान सरकारकडे त्याने एक मागणी सुद्धा केली आहे. ती म्हणजे त्याला एक बस हवी आहे. ज्याचा माध्यमातून त्याला आपल्या परिवाराला फिरायला घेऊन जायचे आहे. त्याला आपल्या परिवारासोबत फिरायला जाणे फार आवडते. मातर आता असे करणे मुश्किल झाले आहे. कारण त्याला संपूर्ण परिवाराला घेऊन जाण्यासाठी एक नव्हे तर काही वाहनांची गरज भासणार आहे.(Pakistani man welcome 60th child)

हे देखील वाचा- आंतरराष्ट्रीय स्तरावर एका गुप्तहेराची चर्चा

आर्थिक तंगीचा सामना करतोय पाकिस्तान
संपूर्ण पाकिस्तानात सध्याची स्थिती भयंकर असून तो आर्थिक तंगीचा सामना करत आहे. यामुळे सरदार जान मोहम्मद खान सुद्धा सुटलेले नाहीत. त्यांनी स्थानिक मीडियाला असे सांगितले की, पीठ, तूप आणि साखरेसह सर्व महत्वाच्या गोष्टींची किंमत तिप्पट झाली आहे. गेल्या तीन वर्षात संपूर्ण जगासह पाकिस्तान ही समस्यांचा सामना करत आहे. ज्यामध्ये मी सुद्धा सहभागी आहे.

दरम्यान, पाकिस्तानात एकापेक्षा अधिक बायकांशी लग्न करण्यास परवानगी आहे. हे केवळ इस्लाम धर्मियांसाठीच आहे. स्थानिक सुत्रांनी दावा केला आहे की, पुरुषांना कायद्याच्या रुपात बहुविवाह करण्याची परवानगी आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.