Home » पाकिस्तानी क्रिकेटर आणि त्यांचे विषारी बोल…

पाकिस्तानी क्रिकेटर आणि त्यांचे विषारी बोल…

by Team Gajawaja
0 comment
Pakistani cricketer
Share

भारताचा शेजारी देश पाकिस्तान म्हणजे भारतासाठी मोठी डोकेदुखी आहे. पाकिस्तानची सध्याची परिस्थिती बेहाल आहे. तिथे सर्वसामान्यांना जीवन जगणे मुश्किल झाले आहे. महागाई आकाशाला पोहचली आहे. त्यात राजकीय अस्थिरतेचीही भर आहे. अशा परिस्थितीत सापडलेल्या या देशाला त्याच्या मित्र देशांनीही एकटं सोडलं आहे. असं असलं तरी येथील काही मंडळी भारताला बोल लावतांना कसलाही विचार करीत नाही. भारताला कायम कडवे बोल बोलणारी ही मंडळी बरेचवेळा भारतीय पाहुणचाराचा लाभ घेतलेली असतात हे विशेष. यात पाकिस्तानी क्रिकेटपट्टूची संख्या मोठी आहे. सध्या अशाच दोन पाकिस्तानी क्रिकेटपट्टूचे (Pakistani cricketer) विषारी बोल सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. त्यापैकी एक म्हणजे, सोहेल तन्वीर आणि दुस-या खेळाडूचे नाव आहे, शाहिद आफ्रिदी. हे दोन्ही पाकिस्तानी खेळाडू आता आपल्या खेळातून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या देशातही त्यांची लोकप्रियता कमी झाली आहे. ही लोकप्रियता पुन्हा मिळवण्यासाठी त्यांच्याकडे एकच माध्यम सध्या उपलब्ध आहे, ते म्हणजे भारताबद्दल अपशब्दांचा वापर. सध्या या दोन्हीही क्रिकेटपट्टूंनी भारताबद्दल केलेल्या उल्लेखाचा सोशल मिडियामधून निषेध केला जात आहे.(Pakistani cricketer)  

पाक क्रिकेटर सोहेल तन्वीरचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. यात सोहेल भारतीयांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करीत आहे. आयपीएल सामन्यांमध्ये भारतीय संघाचा भाग असलेल्या पाकिस्तानच्या सोहेल तन्वीरने एका चॅनलवर हिंदूंना ‘निचली मानसिकता’ असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानचा प्रसिद्ध क्रिकेटर (Pakistani cricketer) सोहेल तन्वीरने हिंदूंबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामुळे संपात व्यक्त होत आहे. या व्हिडिओमध्ये तो ‘तोंडात राम, बाजूला चाकू’ असे बोलतांना आढळत आहे. तसेच त्याच्यासोबत असलेल्या पाकिस्तानी महिला पत्रकारही त्याच्या शब्दाला दुजोरा देत असल्याचे ऐकू येते.  

सोशल मिडियावरील 23 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी क्रिकेटर (Pakistani cricketer) सोहेल तन्वीर आणि पाकिस्तानी पत्रकार हिंदूंबद्दल अतिशय संतापजनक शब्दात वक्तव्य करीत आहेत. 38 वर्षीय सोहेल तन्वीर हा पाकिस्तानचा प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे. वेगवान गोलंदाजीसाठी त्याची ओळख होती. या वर्षी 6 मार्च रोजी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. सोहेल पाठोपाठ शाहिद आफ्रिदी यानेही काश्मिर राग आवळला आहे. त्यानं पाकिस्तानच्या जनतेला आवाहन करत पाकिस्तानी सैन्याला पाठिंबा देण्यास सांगितलं आहे. अन्यथा त्याचे दुष्परिणाम भयंकर होतील अशा इशारा दिला आहे. माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने याआधीही भारताबद्दल विषारी बोल बोलले होते. आता अफ्रिदीने पुन्हा एकदा विषारी वक्तव्य केले आहे. शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानच्या लष्कराचे कौतुक केले आहे. लष्कराच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे,  अन्यथा काश्मीर, पॅलेस्टाईनची काय अवस्था आहे ते बघा, असे आफ्रिदीने म्हटले आहे.  तसेच पाकिस्तानी सैन्याने या देशासाठी मोठा त्याग केला आहे. राजकारणी हे का मान्य करत नाहीत? पाकिस्तानचे सैन्य नसेल, तर स्वातंत्र्य कसले?, पॅलेस्टिनींना विचारा, काश्मिरींना विचारा,  असेही सांगून त्यानं एकाअर्थांनं काश्मिरला सैन्याच्या कैदेत असल्यासारखे वक्तव्य केले आहे.  अर्थात पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीने भारताबाबत अशी बेताल वक्तव्ये करण्याची ही पहिलीच वेळ नाही. (Pakistani cricketer)

========

हे देखील वाचा : आतापर्यंत ‘या’ संघांनी आयपीएल जेतेपद पटकावले…

========

गेल्या वर्षीही त्यांनी भारतातील काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिक याच्या समर्थनार्थ ट्विट केले होते. मानवाधिकारांच्या उल्लंघनाविरुद्ध टीका करणाऱ्यांचा आवाज भारत सतत दाबण्याचा प्रयत्न करतो, असे ट्विट करत त्यानं यासिन मलिकचं समर्थन केलं होतं.  तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्यानं टिका केली होती.  अर्थात, सोहेल तन्वीर आणि  शाहिद आफ्रिदी या दोन्ही क्रिकेटपट्टूंना पाकिस्तानमध्ये आता फारशी किंमत नाही.  पाकिस्तान हा असा देश झाला आहे की जिथे भारताबद्दल सतत टिका, निंदा आणि कडवे बोल बोलल्याशिवाय कोणालाही महत्त्व देण्यात येत नाही.  सध्याचे पाकिस्तानी राजकारणीही त्याच वाटेवर आहेत आणि याच वाटेवर या दोन्ही क्रिकेटपट्टूंना जायचे आहे.  शाहिद आफ्रिदी लवकरच पाकिस्तानी राजकारणात एन्ट्री करणार अशी चर्चा आहे. त्यामुळे सुमार लोकप्रियता मिळवण्यासाठी भारतावर टिका करण्याचे सोप्पे माध्यम त्याच्याकडे आहे.  पण यापेक्षा गरीबीत खितपत पडलेल्या पाकिस्तानी जनतेसाठी काहीतरी करण्यावर भर दिला पाहिजे.(Pakistani cricketer)

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.