पाकिस्तानचे पाणी बंद करण्याचा सर्वात मोठा निर्णय अफगाणिस्ताननं घेतला आहे. कुनार नदी ही पाकिस्तानात वाहणाऱ्या सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक आहे. सिंधू नदीप्रमाणेच कुनार नदी ही सिंचन, पिण्याचे पाणी आणि वीज निर्मितीचा एक प्रमुख स्रोत आहे. याच नदीचा पाकिस्तानला जाणारे पाणी अफगाणिस्तान रोखणार आहे. भारत आणि अफगाणिस्तानमध्ये मध्यंतरी झालेल्या चर्चेनंतर घेण्यात आलेला हा सर्वात मोठा निर्णय आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानला जाणारा सिंधू नदीचा पाणीपुरवठा रोखला आहे. त्याचा परिणाम दिसू लागला असून पाकिस्तानच्या अनेक भागात दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता अफगाणिस्तानातील तालिबान सरकारनेही पाणी रोखण्याचा निर्णय घेतल्यामुळे पाकिस्तानमधील पाणीसंकट आणखी गडद होणार असून तेथील शेतीवर परिणाम होणार आहे. कुनार आणि सिंधू नदीतील पाणी सोबतच बंद झाल्यामुळे पाकिस्तानच्या या पाणीकोंडीला चर्चा करुन सोडवण्याऐवजी शाहबाज शरीफ यांनी भारताला धडा शिकवणार असल्याची वल्नगा केली आहे. पाकिस्तानच्या या शेखीबाज सत्ताधा-यांमुळेच आता पाण्यावाचून तेथील जनतेचे मोठे हाल होणार आहेत. (Kunar River)

भारताशेजारील पाकिस्तानची पाणीकोंडी झाली आहे. भारतासह अफगाणिस्ताननंही पाकिस्तानचे पाण्याचे स्त्रोत बंद करण्यास सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने कुनार नदीचे पाणी नांगरहार प्रदेशात वळवण्याची योजना आखली आहे. नांगरहार हा अफगाणिस्तानच्या पूर्व भागातील प्रदेश आहे. नांगरहारच्या पूर्व आणि दक्षिण सीमा पाकिस्तानला जोडलेल्या आहेत. हा संपूर्ण डोंगराळ भाग असून येथे कुनार नदीच्या पाण्याला अडवण्याची आणि त्यातून संपूर्ण नांगरहार प्रदेशाला शेतीखाली आणण्याची अफगाणिस्तान सरकाराची योजना आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली असून त्यामुळे पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतावर परिणाम होणार आहे. या भागातील नद्यांना कुनार नदीचे पाणी मिळते. (International News)
मात्र आता कुनार नदीच्या पाण्याचा स्त्रोत आडवला गेल्यामुळे या नद्यांचे पाणी झपाट्यानं कमी होऊ लागले आहे. कुनार नदीचे पाणी नांगरहारमधील दारुंता धरणाकडे वळवण्यात येणार आहे. दारुंता धरण हे अफगाणिस्तानातील नांगरहार प्रांतातील जलालाबादजवळील काबुल नदीवरील एक महत्त्वाचे जलविद्युत धरण आहे. सोव्हिएत युनियनच्या मदतीनं अफगाणिस्तानमध्ये १९६० मध्ये बांधलेले हे सर्वात जुने धरण आहे. याच धरणाचा आता अधिक विस्तार करण्यात येत आहे. त्यात काबुल नदीसह कुनार नदीचेही पाणी आणण्याची योजना आहे. असे झाल्यास या सर्व क्षेत्रातील ऊर्जा आणि जलस्रोत यांचा प्रश्न मिटणार आहे. याशिवाय हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर अफगाणिस्तानातील नांगरहारमधील अनेक शेती जमिनींना होणारी पाण्याची कमतरता दूर होईल. येथे दुबार शेतीही शेतकरी करु शकतील. (Kunar River)

या सर्वांसाठी कुनार नदीचे पाणी अडवणे गरजचे असल्याचे अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारनं स्पष्ट केले आहे. कुनार नदी ही ५०० किलोमीटर लांबीची असून ती पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील चित्राल जिल्ह्यातील हिंदूकुश पर्वतरांगेत उगम पावते. कुनार आणि नांगरहार प्रांतांमधून जात ही नदी काबूल नदीत मिळते. ही नदी पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक आहे आणि सिंधू नदीप्रमाणेच, सिंचन, पिण्याचे पाणी आणि जलविद्युत निर्मितीचा एक प्रमुख स्रोत आहे. त्यामुळेच या कुनार नदीचे पाणी अफगाणिस्तननं दारुंता धरणाकडे वळवले तर त्याचा पाकिस्तानच्या सिंचन, पिण्याचे पाणी आणि जलविद्युत प्रकल्पांसाठी पाण्याच्या उपलब्धतेवर गंभीर परिणाम होणार आहे. (International News)
=======
हे देखील वाचा : Japan VS China : जपानवर चीनची दादागिरी !
=======
हे सर्व होत असतांना भारतानंही सिंधू नदीच्या पाणीपुरवठ्यावर निर्बंध घातले आहेत. सिंधू पाणी करार स्थगित करण्याच्या भारताच्या निर्णयामुळे पाकिस्तानची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. पाकिस्तान सरकारनं याबाबत भारत सरकारला पत्र लिहिले आहे. यात चिनाब नदीच्या प्रवाहात अचानक झालेल्या बदलाबद्दल स्पष्टीकरण मागितले आहे. कारण पाकिस्तानच्या पंजाबमधील विविध भागातीला गव्हाचे पिक पाण्याचा अभाव असल्यामुळे संकटात आले आहे. या भागात पाण्याची टंचाई एवढी आहे की, काही शेतकरी पिक वाचवण्यासाठी ट्यूबवेल मालकांकडून पाणी विकत घेत आहेत. यामुळेच रडकुंडीला आलेला पाकिस्तान भारतानं सिंधू पाणी करारातील तरतुदींचे पालन करावं अशी अपेक्षा व्यक्त करत आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर पावले उचलली. या उपाययोजनांमध्ये १९६० चा सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. (Kunar River)
सई बने
