Home » न्यूक्लिअर बॉम्बवरुन पाकिस्तानची धमकी

न्यूक्लिअर बॉम्बवरुन पाकिस्तानची धमकी

by Team Gajawaja
0 comment
nuclear bomb
Share

पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या पुरता कर्जबाजारी झालेला देश आहे. पाकिस्तानमध्ये सध्या भाजीचे दरही सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर आहेत. देशाची अर्थव्यवस्था कंगाल अवस्थेपर्यंत पोहचली असताना सत्ताधारी कोणत्याही प्रयत्नानं देशात पैसा आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र पाकिस्तानचा हा प्रयत्न संपूर्ण जगाला तापदायक असू शकतो हे आता स्पष्ट झाले आहे. कारण पाकिस्ताननं अन्य देशातील तंत्रज्ञान चोरून चक्क ‘न्यूक्लिअर बॉम्ब’ची निर्मिती केली आहे.(nuclear bomb)

नुसता हा न्युक्लिअर बॉम्ब तयार करुन पाकिस्तान गप्प राहिलेलं नाही तर पैशासाठी या बॉम्बची विक्री करण्याची तयारीही त्यांनी सुरु केली आहे. हा न्यूक्लिअर बॉम्ब विकण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकणार नाही, अशी धमकीही पाकिस्तानतर्फे देण्यात आली आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री भारताच्या दौ-यावर आले असताना भारतानं त्यांना “पाकिस्तान हा विश्वास ठेवण्यासारखा देश नाही”, असे स्पष्ट शब्दात सांगितले होते. आता न्यूक्लिअर बॉम्बबाबत (nuclear bomb) संपूर्ण जगाला धमकी देणा-या पाकिस्तानचे बोल ऐकल्यावर भारताच्या सांगण्याचा अर्थ नक्कीच अमेरिकेला समजला असणार.

संपूर्ण जगातून तंत्रज्ञान चोरून बनवलेला न्यूक्लिअर बॉम्ब पाकिस्ताननं बनवल्याचं स्पष्ट झालं आहे. यासंदर्भात पाकिस्तानच्या एका शास्त्रज्ञानं जाहीर कबुली दिली आहे. ‘झैद हमीद’ यांनी या बॉम्बबाबत माहिती दिली असून, “हा अणुबॉम्ब विकण्यापासून कुणाचा बाप रोखू शकत नाही” अशा शब्दात धमकी दिली आहे. अर्थात ही धमकी भारताला असल्याचे स्पष्ट होत आहे. पाकिस्तानच्या या बॉम्बची सर्वात भीती भारताला आहे. मात्र कंगाल झालेला पाकिस्तान हा बॉम्ब अन्य कुठल्याही देशाला विकण्यास तयार असल्याची माहिती आहे. यासंदर्भात पाकिस्तान आर्मी आणि आयएसआयचे जवळचे झैद हमीद यांनी एक व्हिडिओ सोशल माध्यमांवर शेअर केला आहे. त्यात त्यांनी दिलेल्या थेट धमकीनं जगभरातील देशांनी चिंता व्यक्त केली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये झैद हमीद याने, “पाकिस्तान न्यूक्लियर बॉम्ब टर्की, सौदी अरबला विकत आहे, असे करण्यापासून आम्हाला कोणाचाही बाप रोखू शकत नाही” असे वक्तव्य केल्यानं खळबळ उडाली आहे.(nuclear bomb)

पाकिस्तान अक्षरशः भिकेला लागला आहे. मोठ्या आर्थिक संकटातून जाणा-या या देशाला अन्य इस्लामिक देशांनी मदत करण्यासाठी नकार दिला आहे. आता त्याच देशांना पाकिस्तान या न्यूक्लिअर बॉम्बची (nuclear bomb) विक्री करुन मोठी आर्थिक मदत मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सरकारचे जगभर हसू होत आहे. शाहबाज शरीफ यांनी आत्तापर्यंत जगभरात आर्थिक मदत मिळवण्यासाठी दौरे केले आहेत पण त्यांना यश आलेले नाही. पाकिस्तानमध्ये दैनंदिन वस्तू घेण्यासाठीही जनतेकडे पैसे नाहीत. अशी परिस्थिती असतांनाच पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयचे जवळचे झैद हमीद यांनी अणुबॉम्बच्या संदर्भात धक्कादायक माहिती दिली आहे. हे करतांना न्युक्लिअर बॉम्बचे तंत्रज्ञान जगभरातून चोरल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे. त्यामुळे पाकिस्ताननं नेमकं कुठल्या देशाचं तंत्रज्ञान चोरलं आहे, याबाबत अणुबॉम्ब धारक देशातील गुप्तचर संघटना सतर्क झाल्या आहेत.

दरम्यान लिबियाचे गद्दाफी आणि इराण यांना पाकिस्तानकडून अणुबॉम्बचे तंत्रज्ञान घ्यायचे होते. एवढेच नव्हे तर, “पाकिस्तानने उत्तर कोरियालाही अणु तंत्रज्ञान देण्याचा गुपचूप प्रयत्न केला होता. त्यानंतर तेथील वरिष्ठ शास्त्रज्ञांवर जगाकडून टीका झाली होती” असेही तारे झैद यांनी आपल्या व्हिडिओमध्ये तोडले आहेत. पाकिस्तानकडे गौरी, गझनवी सारखी अण्वस्त्रे आहेत. त्यांची विक्री केल्यास पाकिस्तनच्या कर्जाची बरीचशी रक्कम फेडली जाईल अशी शक्यता आहे. एक ते पाच अब्ज रुपयांपर्यंत पाकिस्तान या अण्वस्त्रांची किंमत वसूल करु शकतो, असा अंदाज आहे.(nuclear bomb)

=======

हे देखील वाचा : इराण अफगाणिस्तानमध्ये पाण्यासाठी युद्ध…

=======

ही अण्वस्त्रे विकण्यासाठी पाकिस्तान सौदीकडे प्रथम जाणार असल्याचीही माहिती आहे. सौदीला ही अण्वस्त्रे दिल्यावर काही तासातच सौदी २५ अब्ज डॉलर्स पाकिस्तानला देऊ शकते, त्यामुळे सौदी अरेबियाकडे पाकिस्तानचे दोन अणुबॉम्ब जाण्याची शक्यता आहे. एवढ्या रकमेतून पाकिस्तान आपल्या देशाचे परकीय कर्ज फेडू शकेलच शिवाय ही रक्कम देशातील दुष्काळही संपवू शकेल अशी आशा आहे. या सर्वांबाबत झैद हमीद यांनी आपल्या व्हिडिओतून माहिती दिली आहे. झैद, भारताविरोधात विषारी विधाने करण्यासाठी पाकिस्तानमध्ये ओळखले जातात.

सई बने…


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.