Home » पाकिस्तानातील सर्वाधिक महागडे घर, मुकेश अंबानींच्या अँटेलियाला देते टक्कर

पाकिस्तानातील सर्वाधिक महागडे घर, मुकेश अंबानींच्या अँटेलियाला देते टक्कर

पाकिस्तान सध्या बेरोजगारीचा सामना करत आहे. पण तुम्हाला माहितेय का, पाकिस्तानात काही अशा गोष्टी आहेत ज्याची जगभरात चर्चा केली जाते.

by Team Gajawaja
0 comment
Pakistan Most Expensive House
Share

Pakistan Most Expensive House : पाकिस्तान भले आर्थिक संकटाचा सामना करत आहे. तरीही काही गोष्टी अशा आहेत त्यांच्या भव्यता आणि काही गोष्टींमुळे पाकिस्तानाचे कौतुक केले जाते. अशातच पाकस्तानातील सर्वाधिक महागड्या घराची नेहमीच चर्चा होते. याची भव्यता प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटेलियाला देखील टक्कर देते.

पाकिस्तानातील सर्वाधिक महागडे घर
पाकिस्तानातील इस्लामाबाद येथील गुलबर्ग परिसर आलिशान व्हिला आणि हवलींसाठी ओखळला जातो. येथे प्रत्येकजणाला राहण्याची इच्छा असते. गुलबर्ग आपल्या सुंदर निसर्ग आणि भव्य फार्म हाउससाठी प्रसिद्ध आहे. अशातच पाकिस्तानातील सर्वाधिक महागडे ठिकाण म्हणजे गुलबर्म आहे.

किंमत किती?
घराच्या आजूबाजूला असणाऱ्या भव्य गार्डनमुळे त्याची भव्यतेची चर्चा केली जाते. या घरात स्विमिंग पूल, जिम, थिएटर, लाउंज एरिया आणि मोठे गॅरेजसह 10 बेडरुम, 10 मोठे बाथरुमही आहे. खास गोष्ट अशी की, मुघल आणि आधुनिक संगम लक्षात घेता घराचे इंटिरियर करण्यात आले आहे. अमेरिकेतून आणलेली झाडे देखील गार्डनमध्ये लावण्यात आली आहेत.

पाकिस्तानातील सर्वाधिक श्रीमंत परिसर
गुलबर्ग हे ठिकाण पाकिस्तानातील सर्वाधिक महागडे ठिकाण असल्याचे म्हटले जाते. येथे आलिशान आयुष्य जगण्याचा अनुभव येतो. या परिसरात बडे अरबपति, सिनेकलाकार, क्रिकेटर्स आणि राजकीय नेते मंडळी राहतात. याशिवाय एक आलिशान हवेली देखील असून ती 10 एकर जमिनीवर विस्तारलेली आहे. (Pakistan Most Expensive House)

भारतातील सर्वाधिक महागडे घर
भारतातील सर्वाधिक महागड्या घराबद्दल बोलायचे झाल्यास ते मुकेश अंबानींचे आहे. अँटेलिया 27 मजली असून यामध्ये जिम, सिनेमागृह, स्विमिंग पूल अशा सुविधा आहेत. या घराची किंमत 15 हजार कोटी रुपये आहे.


आणखी वाचा :
राष्ट्रध्यक्षांच्या निधनानंतर इराणमध्ये आनंदोत्सव का झाला ?
नेपाळच्या नोटेवर भारताचे चित्र गेलेच कसे

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.