Home » पाकिस्तान हिंदूसाठी नरक !

पाकिस्तान हिंदूसाठी नरक !

by Team Gajawaja
0 comment
Pakistan
Share

देशभर भगवान शंकराचे भक्त कांवड यात्रेमध्ये भक्तीमय झाले आहेत. असे असतांना उत्तर प्रदेशमध्ये कांवड यात्रेदरम्यान घेण्यात आलेल्या एका निर्णयानं देशभरात मोठी खळबळ निर्माण केली. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी कांवड यात्रा मार्गावरील सर्व दुकानदारांना संबंधित दुकान कुणाचे आहे, त्याचे नाव लिहिणे आवश्यक केले. या आदेशामुळे उत्तरप्रदेश सरकारवर चहूबाजुनं टिका करण्यात आली. दोन धर्मामध्ये दुही करणारा हा निर्णय असल्याचे विरोधी पक्षाचे म्हणणे आहे. (Pakistan)

मात्र गेल्याकाही वर्षात कांवड यात्रेदरम्यन झालेल्या घटनांचा उल्लेख करत उत्तर प्रदेश सरकारनं आपल्या या आदेशाचे समर्थन केले आहे. या निर्णयाचे पदसाद देशभर उमटत असतांना आता पाकिस्तानमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सोबत आपल्या सात वर्षाच्या मुलीसाठी गेली तीन वर्ष लढा देणा-या आईवडिलांचा टाहो जगापुढे आला आहे. यातून पाकिस्तानात हिंदू कुटुंबियांची अवस्था किती दारुण आहे, हे स्पष्ट होत आहे. पाकिस्तान म्हणजे, हिंदूंसाठी नरक झाल्याचेच त्यातून स्पष्ट होत आहे.

उत्तरप्रदेशमध्ये कांवड यात्रेच्या मार्गावरील दुकानदारांचे नाव लिहिण्याचे आदेश आल्यावर सर्वत्र खळबळ उडाली. हा निर्णय दोन धर्मामध्ये दुही करणारा असल्याचे आरोप होत आहेत. मात्र आपल्या शेजारी देशामध्ये तर हिंदूंना जिंवतपणी नरकयातना भोगाव्या लागत आहेत. याचा एक पुरावा म्हणून पाकिस्तानमधील व्हिडिओ सर्वाधिक बघितला जात आहे. पाकिस्तानमधील प्रितम दास या युट्यूबरचा हा व्हिडिओ आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सादीकाबाद भागातील हा व्हिडिओ आहे. येथ केस कापण्याच्या दुकानात जर कोणी गेलं तर त्यांना पहिला त्यांचा धर्म कोणता हे विचारण्यात येते. केस कापण्यासाठी कोणी हिंदू गेला असेल तर त्याला त्या दूकानातून परत पाठवले जाते. (Pakistan)

या व्हिडिओत प्रितम दास स्वतः एका दुकानात गेला आहे. तिथे तो दुकानदाराला केस कापायला सांगतो. पण दुकानदार हिंदुंचे केस कापायला आवडत नाहीत, सांगून त्याला नकार देतो. प्रितम आपले केस कापण्यासाठी अन्य दुकानातही जातो, तेव्हा त्याला असाच अनुभव येतो. कोणत्याही हिंदूला हे दुकानदार आपल्या दुकानातही घेत नाहीत. हिंदू धर्मियांना या भागात अतिशय वाईट वागणूक मिळत आहे. अल्पसंख्याक असलेला हिंदू समाज या भागात दिनवाण्या अवस्थेत जीवन जगत आहे.

याशिवाय पाकिस्तानमध्ये राजरोजपणे हिंदू तरुणींवर होत असलेल्या अत्याचाराच्या बातम्या नवीन नाहीत. पण तीन वर्षापूर्वी अपहरण झालेल्या सात वर्षीय बालिकेची कहाणी ऐकली तरी पाकिस्तानमध्ये हिंदू किती हतबल अवस्थेत जीवन जगत आहेत, हे स्पष्ट होईल. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात २०२१ मध्ये मोहरमच्या मिरवणुकीत सरबत वाटत असणा-या ७ वर्षिय मुलीचे अपहरण करण्यात आले. तिच्या आईवडिलांना अद्याप तिचा तपास लागलेला नाही. गेली तीन वर्ष या मुलीचे आईवडिल आपल्या मुलीसाठी झगडत आहेत. पण त्यांची कुठेच दखल घेतली जात नाही. २०२१ मध्य मोहरमची मिरवणूक दारात आल्यावर ही मुलगीही मिरवणूक बघण्यासाठी पुढे गेली. (Pakistan)

त्यासोबत अन्यजण सरबत वाटायला लागले, तेव्हा ही चिमुरडीही पुढे जाऊन सरबत वाटू लागली. पण या मिरवणुकीदरम्यान काही क्षणात ही चिमुरडी गायब झाली. तिचे वडिल वडील राजकुमार पाल आणि आई वीणा कुमारी यांनी आपल्या मुलीच्या शोधासाठी अनेक निवदने केली. वरिष्ठांना भेटून आर्जवं केली आहेत. पण या मातापित्याच्या वेदनचेची पाकिस्तानमध्ये दखल घेण्यात आली नाही. सिंध प्रांतात १९ ऑगस्ट २०२१ रोजी ही घटना घडली. प्रिया कुमारी ही ७ वर्षाची मुलगी या दिवशी गायब झाली.

====================

हे देखील वाचा :  बॉलिवूड स्टार पाकिस्तानचा निषेध कधी करणार ?

====================

तिच्याबद्दल अद्यापही कुठलिही बातमी तिच्या आईवडिलांना मिळाली नाही. गेल्या आठवड्यात प्रिया कुमारीच्या आईवडिलांनी यासाठी कराचीतही निदर्शने केली. यावेळी त्यांना फक्त तुमच्या मुलीचा शोध चालू आहे, असे आश्वासन मिळाले आहे. सिंधचे गृहमंत्री झिया लँग्रोव्ह आणि पोलिस महानिरीक्षकांनी या पालकांना मुलीला लवकर शोधण्याचे आश्वासन दिले. गेल्या तिन वर्षात प्रियाच्या आईवडिलांनी तिच्या शोधासाठी सिंध प्रांताचा कानाकोपरा शोधून काढला आहे. प्रियासारख्याच अनेक हिंदू तरुणी पाकिस्तानमध्ये कधी आणि कशा गायब झाल्या आहेत, याचीही चौकशी करावी अशी मागणी हिंदू समाजाकडून करण्यात येत आहे. (Pakistan)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.