पाकिस्तानला पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइकची भीती सतावत आहे. नुकत्याच माजी पाकिस्तानचे राजकीय नेते अब्दुल बासित यांनी असे म्हटले की, लोकांना असे वाटत आहे की,जम्मू-कश्मीर मधील पुंछ जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणखी एक सर्जिकल स्ट्राइक करु शकतो. त्यांनी पुढे असे ही म्हटले ही, याची शक्यता व्यक्त केली जाऊ शकते. कारण भारत जी२० शिखर सम्मेलनाचे नेतृत्व करत आहे. परंतु भारतात पुढील वर्षात होणाऱ्या लोकसभा निवडणूकीपूर्वी असे होऊ शकते. या दरम्यान पाकिस्तानी नेते अब्दुल बासित यांचे एक वादग्रस्त विधान सुद्धा समोर आले आहे. (Pakistan)
त्यांनी पुंछ मधील भारतीय सैन्यावर करण्यात आलेला हा योग्य होता आणि ज्यांनी केला त्यांची ही त्यांनी बाजू घेतली आहे. पुढे त्यांनी असे म्हटले की, ज्यांनी कोणी हे केले आहे तो मुजाहिद्दीन असो किंवा कोणीही त्यांनी नागरिकांवर नव्हे तर सैन्यावर हल्ला केलाय. या हल्ल्यात भारतीय सैन्यातील ५ जवान शहीद झाले होते. खरंतर २० एप्रिलला राजौरी सेक्टरमध्ये पुंछ येथून जाणाऱ्या सैन्याच्या वाहानावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. यामध्ये ५ जवान शहीद झाले. हे सर्व सैनिक राष्ट्रीय राइफल्सचे जवान होते.
पीपीएफएफने सोशल साइट्सवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये दावा करण्यात आला आहे की, तोता गली मध्ये हल्ला केला जाणार होता. तसेच असे ही म्हटले होते की, ऑपरेशनच्या व्हिडिओतील काही हिस्से लवकरच दाखवू. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नुकत्याच अँन्टी फास्टिस्ट फ्रंट नावाच्या एका संस्थेने या हल्ल्याची जबाबदारी घेतील होती आणि काही फोटो सुद्धा जारी केले होते.
या संपूर्ण घटनेनंतर दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यासाठी शोध सुरु करण्यात आला आहे. या मोठ्या ऑपरेशनदरम्यान आता पर्यंत ५० लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी बाटा डोरिया-तोता गल्ली तसेच आजूबाजूच्या परिसारात घेराव घालून शोध सुरु आहे. अधिकृत सुत्रांनुसार दाट जंगलात सुद्धा अभियनात विशेष बल आणि एनएसजीचा समावेश आहे. अभियानात ड्रोन, ट्रेनिंग दिलेले कुत्रे आणि मेटल डिटेक्टरचा वापर केला जात आहे. (Pakistan)
हे देखील वाचा- नॉर्थ कोरियाकडून स्पाय सॅटेलाइट लॉन्च करणार
भारताला खुली धमकी
एका बाजूला पाकिस्तानचे माजी राजकीय नेते पुंछ दहशतवादी हल्ल्याचा बचाव करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला सध्याचे सैन्य अधिकारी भारताला हल्ल्याची धमकी देत आहे. मेजर जनरल अहमद शरीफ यांनी असे म्हटले की, जर गरज पडल्यास तर त्यांची सेना भारतात घुसून हल्ला करेल. त्यांचा एक व्हिडिओ सुद्धा सध्या व्हायरल होत असून त्यात ते हे पत्रकारांना सांगत आहेत. ते असे बोलतायत की, गरज पडल्यास आम्ही दुश्मनांशी लढण्याासाठी त्यांच्या येथे जाऊ शकतो. जर भारताने यावर काही पावले उचलली तर आम्ही सुद्धा याचे प्रतिउत्तर देऊ.