पाकिस्तान चार वर्षानंतर फाइनेंशियल अॅक्शन टास्क फोर्स म्हणजेच FATF च्या ग्रे लिस्टमधून बाहेर आला आहे. ग्लोबल वॉचडागच्या या निर्णयामुळे पाकिस्तानमधी लोक अत्यंत आनंदात आहेत. लोकांकडून जागतिक संस्थेच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. एफटीएफ जगभरात दहशतवाद, मनी लॉन्ड्रिंग आणि टेरर फंडिंगकडे लक्ष देते. ही संस्था अशा देशांवर नजर ठेवते जेथे दहशतवादी संघटना अधिक असतात आणि मनी लॉन्ड्रिंगचे काम सामान्यरुपात चालते. (Pakistan FATF)
काय आहे FATF ची ग्रे लिस्ट?
FATF अशा देशांना ग्रे लिस्टमध्ये ठेवते ज्यांच्यावर ते करडी नजर ठेवतात. ते असे देश अशतात ते एफएटीएफच्या निगराणीत आंतरराष्ट्रीय मनी लॉन्ड्रिंग आणि टेरर फंडिंग थांबवण्यासाठी अयशस्वी ठरतात. अशातच ही संस्था त्या देशांना ग्रे लिस्टमध्ये टाकते.
२१ ऑक्टोंबर पर्यंत पाकिस्तान ग्रे लिस्टमध्ये होता. आता एफएटीएफच्या निगराणीखाली जवळजवळ २३ देश आहेत. या देशांमध्ये फिलिपींस, सीरिया, यमन, संयुक्त अरब अमीरात, युगांडा, मोरक्को, जमैका, कंबोडिया, बुर्किना फासो, दक्षिण सूडान आणि बारबाडोस, केमॅन आइलँन्डस आणि पनामा मधील टॅक्स हेवनचा समावेश आहे.

ग्रे लिस्टमधील देशांकडून काय आहे अपेक्षा?
FATF कडून दिल्या गेलेल्या नियमांनुसार या देशांना वागावे लागते. असे करण्यास देश अयशस्वी झाल्यास त्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकले जाते. प्रत्येक लिस्ट मध्ये ठेवणे किंवा हटवण्यासंदर्भात वेळोवेळी आढावा घेतला जातो. जेव्हा एखाद्या देशाला ग्रे लिस्टमध्ये टाकले जाते तेव्हा त्याची तपासणी ही संस्था करते. अशा देशांना आपली माहिती त्यांना द्यावी लागते. काही चुकत असेल तरीही ही संस्था सांगते आणि त्याचे पालन करणे अनिवार्य असते. (Pakistan FATF)
हे देखील वाचा- रशिया VS युक्रेन ; युद्धामुळे सुरक्षेसाठी बंकर खरेदीची घाई
पाकिस्तानने काय केले होते?
पाकिस्तानने आपली रणनितीत सुधार केला आहे. जून २०१८ आणि जून २०२१ मध्ये दिल्या गेलेल्या निर्देशनांचे पाकिस्तानने पालन केले आहे. ठरवून दिलेल्या वेळेपूर्वी पाकिस्तानने आपला टास्क पूर्ण केला आहे. पाकिस्ताने आपल्या ३४ चुका सुधारल्याचे सांगितले गेले आहे. अशातच आता पाकिस्तानची जगासमोरची प्रतिमा किती बदलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
भारताने काय दिली प्रतिक्रिया?
भारताने असे म्हटले आहे की, FATF च्या तपासानंतर आता पाकिस्तानने काही दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई करण्यास भाग पाडले आहे. यामध्ये 26/11 मधील हल्ल्यातील दोषींची नावे आहेत. भारताचे असे म्हणणे आहे की, पाकिस्तानने आपल्या देशातील दहशतवाद्यांच्या विरोधात अधिक कठोरपणे काम केले पाहिजे. टेरर फंडिंगवर सुद्धा बंदी आणली पाहिजे.