Home » पाकिस्तानची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अमेरिका मदत करणार

पाकिस्तानची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अमेरिका मदत करणार

by Team Gajawaja
0 comment
Pakistan Economic Crisis
Share

पाकिस्तानात डबघाईला गेलेल्या अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आता अमेरिका पुढे येणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्याकडून पाकिस्तानला त्यांच्या आर्थिक स्थितीतून बाहेर काढण्यास मदत केली जाणार आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, बिडेन यांनी देशाला मिळणारी आर्थिक मदत दुप्पट करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. राष्ट्राध्यक्ष बिडेन वर्ष २०२४ च्या आर्थिक वर्षासाठी पाकिस्तानला ८२ मिलियन डॉलरची मदत करणार आहे. ही मदत पाकिस्तानात आलेला पुर, उर्जेचा पुरवठा आणि आपत्कालीन क्षमतांच्या तयारीसाठी दिली जाणार आहे. मदतीची रक्कम वाढवण्याच्या बिडेन यांच्या या निर्णयामुळे प्रत्येकजण हैराण झाला आहे. गेल्याच वर्षात बिडेन यांच्या प्रशासनाकडून पाकिस्तानला काही मिलियन डॉलरच्या मिलिट्रीची मदत दिली गेली होती. ही मदत एफ-१६ च्या अपग्रेडेशनच्या नावाने देशाला देण्याची घोषणा केली होती. (Pakistan Economic Crisis)

परराष्ट्र विभागाकडून असे सांगण्यात आले आहे की, पाकिस्तानला दिली जाणारी मदत ही खासगी सेक्टरच्या आर्थिक प्रगतीला वाढवणार आहे, लोकशाही संघटना मजबूत करतील, लैंगिक समानता आणि महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देईल. निश्चित रुपात परकीय चलन आणि पैशांच्या कमतरतेचा सामना करत असलेल्या पाकिस्तानला ही रक्कम फार फायदेशीर ठरणार आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या मते सध्या या प्रस्तावाला काँग्रेसकडे मंजूरीसाठी पाठवण्यात आले आहे. प्रस्ताव अर्थसंकल्पाचा हिस्सा आहे. अर्थसंकल्पात जो प्रस्ताव दिला गेला आहे त्यानुसार २०२४ च्या आर्थिक वर्षासाठी ८२ मिलियन डॉलरची मदत मिळणार आहे. तसेच आर्थिक वर्ष ऑक्टोंबर पासून सुरु होणार आहे. ही मदत निधी पाकिस्तानला इकोनॉमिक सपोर्ट फंड कॅटेगरी अंतर्गत देऊ केली जाणार आहे. वर्ष २०२२२ मध्ये ३९ मिलियनची मदत केली गेली.

पाकिस्तानला इंटरनॅशनल नारकोटिक्स अॅन्ड लॉ इन्फोर्समेंट कॅटेगरी अंतर्गत १७ मिलियन डॉलरच्या मदतीचा प्रस्ताव सुद्धा दिला गेला आहे. तसेच ३.५ मिलियन डॉलरची मदत इंटरनॅशनल मिलिट्री एज्युकेशन आणि ट्रेनिंग अंतर्गत देण्याचा विचार केला जात आहे. ऐवढेच नव्हे तर बिडेन प्रशासनाने पाकिस्तानला ग्लोबल हेल्थ प्रोग्राम कॅटेगरी अंतर्गत ३२ मिलियन डॉलरच्या मदतीचा प्रस्ताव ही ठेवला आहे. पाकिस्तान सध्या मोठ्या प्रमाणात पैशांच्या संकटाशी सामना करत आहे. IMF कढून सुद्धा आता पर्यंत मदतीचे कोणतीही आश्वासन मिळालेले नाही.(Pakistan Economic Crisis)

हे देखील वाचा- कालव्यांचे शहर झाले कोरडे…

पाकिस्तानचे परकीय चलन ऐवढे खाली गेले आहे की, आता केवळ काही आठवड्यांपूर्तीच्या आयातीचा पैसा शिल्लक राहिला आहे. आयएमएफस बेलआउट पॅकेजवर ९ वेळा बातचीत झाली पण त्यात काही तोडगा निघाला नाही. त्यांनी पाकिस्तानला सात अरब डॉलरचा पॅकेजच्या मदतीसाठी काही वेळा बैठक ही घेतली. गेल्या एका वर्षापासून या दिलासा पॅकेज देण्यामध्ये खुप वेळ लागत आहे. जर सर्वकाही ठिक असते आणि बातचीत एका निष्कर्षावर पोहचली असती तर देशाला लगेच १.२ अरब डॉलरची मदत मिळू शकत होती. पाकिस्तानला दोन्ही बाजूंनी मिळणारी रक्कम अद्याप मिळालेली नाही. याच कारणास्तव पाकिस्तानची स्थिती अधिक बिघडली गेली आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.