पाकिस्तानातील असे काही हुकूमशाह झाले ज्यांचा जन्म खरंतर भारतात झाला. मात्र देशाची विभागणी झाली तेव्हा ते पाकिस्तानात गेले. वेळेनुसार ते स्वत: मध्ये दुश्मनाचा राग भरुन घेत गेले आणि असे काही कट रचले ज्यामुळे भारताला नेहमीच नुकसान होत राहिले. पाकिस्तानातील पहिले राष्ट्रापती इस्कंदर मिर्जा, सेना प्रमुख परवेज मुशर्रफ आणि परमाणू कार्यक्रमाचे हेड डॉ. अब्दुल कादिर ही अशी काही नावे आहेत जे भारताच्या भूमीवर जन्मले मात्र तरीही देशाच्या विरोधात नेहमीच कट रचत राहिले. (Pakistan Dictators)
इस्कंदर मिर्जा
पश्चिम बंगाल मधील मुर्शिदाबाद मध्ये जन्मलेले इस्कंदर मिर्जा हे पाकिस्तानचे राष्ट्रपती झाले. पण जेव्हा भारत आणि पाकिस्तानची विभागणी झाली तेव्हा तत्कालीन पंतप्रधान मोहम्मल अली जिन्ना यांनी त्यांच्याकडे संरक्षण सचिवाची जबाबदारी दिली. त्यांच्या या निर्णयानमंतर देशात सैन्याचे शासन सुरु झाले. १९५६ मध्ये पाकिस्तानचे पहिले राष्ट्रपती झआले. इस्कंदर पाकिस्तानच्या इतिहासातील असे राष्ट्रपती होते ज्यांनी काही पंतप्रधानांना बरखास्त केले होते.
पाकिस्तानने जेव्हा जम्मू-कश्मीर मध्ये हल्ला केला तेव्हा इस्कंदर मिर्जा यांचे नाव कट रचणारे प्रमुख असल्याच्या रुपात समोर आले. जगभरात पाकिस्तानच्या या पावलाची टीका केली गेली.
परवेज मुशर्रफ
११ ऑगस्ट १९४३ रोजी जुन्या दिल्लीत जन्मलेले परवेज मुशर्रफ यांची ओळख सर्वाधिक ताकदवान हुकूमशाह म्हणून केली जाते. दिल्लीत वाढलेले मुशर्रफ भारताताचे दुश्मन क्रमांक १ ठरले होते. भारतात अशांति निर्माण व्हावी म्हणून त्यांनी काही कट रचले होते. १९४७ मध्ये जेव्हा विभागणी झाली तेव्हा परवेज केवळ ४ वर्षांचे होते. त्यांच्या परिवाराने पाकिस्तानाची निवड केली आणि भारत सोडून ते कराचीत स्थायिक झाले.
वयाच्या २१ व्या वर्षात मुशर्रफ पाकिस्तानातील सैन्यात ज्युनिअर अधिकाऱ्याच्या रुपात भरती झाले. षडयंत्र रचणे आणि युद्धातील प्रमुख भुमिका निभावण्यासाठी त्यांच्यावर पाकिस्तान सरकार खुश झाली आणि त्यांना लगेच प्रमोशन दिले. १९७१ च्या युद्धात त्यांची महत्त्वपूर्ण भुमिका होती. १९९८ मध्ये कारगिल युद्धाचा कट रचला.
आपल्या बायोग्राफीत त्यांनी स्पष्टपणे याचा उल्लेख केला होता की, त्यांनी कारगिलवर ताबा मिळवण्याची शपथ घेतली होती. १९९९ मध्ये तख्तापालट केल्यानंतर ते हुकूमशाह झाला. (Pakistan Dictators)
हेही वाचा- पाकिस्तानी लेखक-पत्रकार तारिक फतेह यांचा जीवनप्रवास
अब्दुल कादिर खान
मध्य प्रदेशातील भोपाळ मध्ये जन्मलेले डॉ. अब्दुल कादिर खानच्या कारणास्तव पाकिस्तान परमाणू हत्यारे बाळगणारा सातवा देश ठरला. त्यांची ओळख पाकिस्तानातील प्रसिद्ध परमाणू वैज्ञानिक म्हणून झाली. त्यांना पाकिस्तानातील परमाणू कार्यक्रमाचे संस्थापक म्हटले गेले. १९५१ मध्ये डॉ. खान तीन भाऊ, दोन बहिणी आणि आईसह पाकिस्तानात गेले. परमाणू हत्यारे ठेवण्याच्या कारणास्तव पाकिस्तानने अभिमान ही बाळगला होता. याच कारणास्तव पाकिस्तानाने काही वेळेस कट रचण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या या कामावर आनंदित होत पाकिस्तानने त्यांनी तीन प्रेसिडेंशियल अवॉर्डने गौरवले. निशान-ए-इम्तियाज आणि हिलाल-ए-इम्तियाजने त्यांना सन्मानित केले. डॉ. खान यांनी केवळ पाकिस्तानला परमाणून हत्याराने सुसज्ज असलेला देश बनवलेच आणि त्याचसोबत लीबिया, उत्तर कोरियाला सुद्धा परमाणू हत्यारे बनवण्यासाठी काही सामग्री उपलब्ध करुन देण्यात मदत केली.