Home » पाकिस्तानात म्हशींपेक्षा सिंहांची स्वस्तात विक्री, पण देशावर का आलीय अशी वेळ?

पाकिस्तानात म्हशींपेक्षा सिंहांची स्वस्तात विक्री, पण देशावर का आलीय अशी वेळ?

by Team Gajawaja
0 comment
Pakistan crisis
Share

भारताच्या शेजारील देश पाकिस्तानातील सध्याची परिस्थिती ही काहीशी बिकट असल्याचे संपूर्ण जगाला माहिती आहे. लाख प्रयत्न केले तरीही देश आपल्या आर्थिक संकटातून बाहेर पडायचे नावच घेत नाही आहे. येथे महागाईच्या दराने तर उच्चांकच गाठला आहे. याचा थेट परिणाम खाण्यापिण्याच्या गोष्टीवरच नव्हे तर जनावरांच्या किंमतीवर ही पडला आहे. याच दरम्यान, पाकिस्तानातील एक हैराण करणारी गोष्ट समोर आली आहे. समोर आलेल्या बातमीनुसार, पाकिस्तानात एका सिंहाची किंमत ही म्हशीच्या किंमतीपेक्षा कमी आहे. म्हणजेच जर तुम्हाला पाकिस्तानात म्हैस ही अत्यंत कमी पैशात खरेदी करता येऊ शकते.(Pakistan crisis)

नक्की काय आहे प्रकरण?
समा टीव्हीच्या रिपोर्टनुसार, लाहौर सफारी प्राणीसंग्रहालयाचे प्रशासन आपल्याकडील काही अफ्रिकन सिंहाची विक्री करण्यास तयार झाले आहेत. यासाठी त्यांची किंमत १,५०,००० रुपये ठेवण्यात आली आहे. तर पाकिस्तानात जर ऑनलाईन मार्केटप्लेसवर एका म्हशीची किंमत पाहिल्यास ३,५०,००० रुपये ते १० लाख रुपयांदरम्यान आहे. म्हणजेच सिंहाची किंमतीपेक्षा म्हशीची सर्वाधिक किंमत आहे.

लाहौर सफारी प्राणीसंग्रहालयाचे व्यवस्थापन यांच्याकडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आपल्या १२ सिंहांची विक्री करण्याची अपेक्षा केली जात आहे. विक्रीसाठी तीन सिंहीणी आहेत, त्यांना खाजगी गृहनिर्माण योजना किंवा पशुसंवर्धन उत्साही लोकांना परवडणाऱ्या किमतीत विकल्या जाऊ शकतात.

हे देखील वाचा- अवघ्या सात वर्षात नाशिकमध्ये उभं केलं मानव निर्मित जंगल; आता जंगलात आढळतात बिबटे, मोर, तरस

Pakistan crisis
Pakistan crisis

का आली आहे अशी वेळ?
समी टिव्हीच्या रिपोर्ट्सनुसार, प्रामीसंग्रहालयाचील जानेवारांच्या देखरेखीसाठी लागणारा खर्च आणि अन्य खर्च पूर्ण करण्यासाठी सिंहांची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना कमी किंमतीत विक्री केली जात आहे कारण त्यांची देखभाल करणे मुश्किल होत आहे. महागाईच्या कारणास्तव प्राणीसंग्रहालयासाठी फंडची गरज आहे. अशातच सिंहांची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.(Pakistan crisis)

हे देखील वाचा- पाकिस्तानातील हिरामंडी कसा बनला वेश्याव्यवसायाचा अड्डा? ज्यावर भंसाली तयार करतायत वेब सीरिज

लाहौर मधील प्राणीसंग्रहालयात पाकिस्तानातील अन्य प्राणीसंग्रहालयाच्या तुलनेपेक्षा अधिक मोठे आहे. १४२ एकर जमिनीवर विस्तरालेल्या या प्राणीसंग्रहालयात विविध जनावरे आहेत. दरम्यान, त्याचा अभिमान फक्त त्याच्या 40 सिंहांच्या जातींवर आहे. या प्रकरणाबाबत प्राणिसंग्रहालय प्रशासनाचे म्हणणे आहे की ते नियमितपणे उत्पन्नासाठी काही सिंहांची विक्री करतात. गेल्या वर्षीही सफारी प्राणिसंग्रहालयात मर्यादित जागेचे कारण देत १४ सिंहांची विक्री झाली होती.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.