प्रत्येक देश आपल्या संरक्षणासाठी सैन्याच्या क्षमतेत गरजेनुसार वाढ करतात. आपल्या देशाच्या बाजूस असलेल्या अन्य देशांबद्दल बोलायचे झाल्यास चीन आणि पाकिस्तान सुद्धा क्षेपणस्र आणि अण्वस्रांनी सुसज्ज आहे. जगभरातील घातक हत्यारांची माहिती देणारी माहिती NTI.ORG च्या मते जाणून घ्या चीन आणि पाकिस्तानसह काही देशांचे आपले क्षेपणास्राचे बेस कुठे आहे त्याबद्दल अधिक. (Pakistan-China Missiles)
जगातील सर्वाधिक शक्तीशाली देश अमेरिकेला सुद्धा टक्के देणारा चीनचा प्रभाव संपूर्ण आशियाई महासागरात दिसून येते. एनटीआच्या बेवसाइटच्या नुसार, चीनचे ४ क्षेपणस्र बेस आहेत.त्यामधील २ अॅक्टिव्ह, एक ऑपरेशनल आणि एकाचे बांधकाम होणे बाकी आहे. या चारही बेसमध्ये क्षेपणस्र ठेवण्यात आली आहे. चारहींची नावे जियुक्वान स्पेस लॉन्च सेंटर, ताइयुआन स्पेस लॉन्च सेंटर, शिचांग स्पेस लॉन्च सेंटर आणि हॅनान स्पेस लॉन्च सेंटर अशी आहेत.

इजिप्शियन क्षेपणस्र बेस गेबेल हमजा टेस्ट रेंज आहे. याचे लोकेशन, परिसर आणि स्टेटस बद्दल माहिती नाही. मात्र क्षेपणस्र येथूनच लॉन्च केली जात असल्याचे सांगितले जाते. दुसऱ्या बाजूला उत्तर कोरियाचे जवळ घातक हत्यारांचा भरपूर साठा आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या भेटीपूर्वी तेथील तानाशाह किम जोंग उन याला क्षेपणस्राबद्दल किती प्रेम आहे हे सर्वांनाच माहिती आहे. उत्तर कोरियाचे क्षेपणस्र बेस Komdŏk-सान येथे आहे ते ह्वाडे-कुन, उत्तरी हॅमग्योंच्या माउंट Komdŏk येथे आहे. (Pakistan-China Missiles)
हे देखील वाचा- हैदराबाद ऐवजी कश्मीर पाकिस्तानला दिला जाणार होता, पण असे काय झाले सर्वकाही बदलले
त्याचसोबत आपल्या देशाला पाकिस्तानपासून धोका अधिक आहे. कारण १९६५, १९७१, आणि १९९९ मध्ये पाकिस्तानाने भारतावर हल्ला करत आपली काय भुमिका आहे हे स्पष्ट केले आहे. एनआयटीच्या मते पाकिस्तानातील क्षेपणस्रांचे बेस पंजाब मधील सरगोधा येथे आहे. येथे २ रनवे, एअरक्राफ्ट प्रसार एरिया आणि हत्यारांचा साठा करण्याचा परिसर आहे. तर इज्राइल हा आपल्या सैन्य क्षमतेसह आधुनिक तंत्रज्ञानासाठी ओळखला जातो. इज्राइल क्षेपणस्र बनवणारी मिलिट्री इंडस्ट्रीज, रामात हॅशरन मध्ये आहे. यामध्ये जवळजवळ ३२०० कर्मचारी काम करतात.
दरम्यान, ही क्षेपणस्र ही अशीच ठेवली जात नाहीत. तर त्यांना ठेवण्यासाठी एक खास जागा ही तयार केली जाते. सर्वसाधारपणे ही अशी ठिकाणं असतात जी रहिवाशी ठिकाणांपासून दूर असतात. दरम्यान ही अत्यंत गुप्त असतात आणि येथे लोकांना प्रवेश निषिद्ध असतो.