पाकिस्तानमधील गाढवांना सध्या सोन्याचे दिवस आले आहेत. एकेकाळी पाकिस्तानमध्ये एक गाढव काही हजारात मिळत असे. या गाढवांचा उपयोग आजही पाकिस्तानमध्ये वाहतुकीची साधने चालवण्यासाठी करण्यात येतो. मात्र आता याच गाढवांना लाखात किंमत मिळत आहे. ही किंमत लाखावर पोहचण्याचे कारण म्हणजे, पाकिस्तानचा मित्र देश चीन. चीनमध्ये गाढवांची चामडी आणि शारीरिक अवयव यापासून सौंदर्य प्रसाधने तयार केली जातात. यासाठी तिथे गाढवांची मोठी मागणी आहे. ही मागणी चीन पाकिस्तान आणि अफ्रिकन देशांकडून पुरी करत असे. मात्र आता अफ्रिकन देशांनी चीनमध्ये होणा-या गाढवांच्या निर्यातीवर बंदी घातली. याचा परिणाम म्हणजे, एकमात्र पाकिस्तान हा देश चीनला गाढवं पुरवू लागला. यामुळेच पाकिस्तानमध्ये एका गाढवाला तीन लाख किंवा त्याहून अधिक किंमत मिळू लागली आहे. (Pakistan’s Donkeys)
ज्यांच्याकडे गाढवं आहेत, त्यांना लाखो रुपये मिळत असले तरी पाकिस्तानमध्ये ज्यांचा उद्योग या गाढवांवर चालतो, त्यांना मोठा फटका बसू लागला आहे. कारण त्यांना ही लाखो रुपयांची गाढवे घेणे आता शक्य नाही. चीनमध्ये पाठवण्यात येणा-या या गाढवांच्या किंमतीत आणखीही वाढ होण्याची शक्यता आहे. कारण चीनमध्ये सौंदर्य प्रसाधनांच्या उद्योगात वाढ असून त्यात हजारो गाढवांची रोजची कत्तल करण्यात येते. पाकिस्तानमधील गाढवांना यामुळे सोन्याचे दिवस आले आहेत. ज्यांच्याकडे गाढवे पाळली आहेत, असे पाकिस्तानी या गाढवांची डोळ्यात तेल घालून राखण करीत आहेत. (Pakistan’s Donkeys)
पाकिस्तानमधील गाढवे चर्चेत आली आहेत. या गाढवांना चीनमधून लाखो रुपये खर्चून खरेदी कऱण्यात येते. त्यामुळेच पाकिस्तानात गाढवांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. चीनमध्ये गाढवाची कातडी वैद्यकीय आणि सौंदर्य उत्पादनांमध्ये वापरली जात आहे. चीनमध्ये आता पाकिस्तानमधून सर्वाधिक निर्यात या गाढवांची करण्यात येते. एका गाढवाला साधरण तीन लाख किंवा त्याहून अधिक किंमत मिळते. या गाढवांची निर्यात आणि त्यासंबंधी व्यवहार करणा-यांची मोठी संख्या पाकिस्तानमध्ये वाढली आहे. गाढवांना शोधून आणणे आणि त्यांची बोली लावणे यासाठीही मोठा खर्च करण्यात येत आहे. या सर्वांवर पाकिस्तानमधील काही नागरिकांनी टिका केली आहे. मोठ्या प्रमाणात गाढवे चीनला पाठवली तर पाकिस्तानमधून काही वर्षात गाढवं नामशेष होतील असा धोकाही व्यक्त करण्यात आला आहे. (Pakistan’s Donkeys)
पाकिस्तानच्या कराचीच्या लियारी जिल्ह्यात गाढवांच्या खरेदीसाठी साप्ताहिक बाजार भरवण्यात येतो. यात चीनला गाढवे पाठवणा-या एजंटीच जास्त गर्दी असते. गाढवांची मागणी एवढी आहे की, या गाढवांची बोली लावण्यात येते. ही बोली काही लाखांचा आकडा पार करते. ही रक्कम सर्वसामान्यांना देता येत नाही. त्यामुळे बाजारात गाढवं खरेदीसाठी आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना मात्र एवढी रक्कम देता येत नाही. परिणामी गाढवांची गाडी चालवणा-या अनेक पाकिस्तानी नागरिकांनी आपला हा धंदा बंद करुन अन्य काम सुरु केले आहे. चीनमधील अजिओ ही कंपनी गाढवाच्या त्वचेपासून काढलेल्या कोलेजनपासून सौंदर्य उत्पादने तयार करते. या कंपनीचा व्यवसाय गेल्या दशकभरात झपाट्याने वाढत आहे. 2013 आणि 2016 दरम्यान अजिओ चे वार्षिक उत्पादन 3,200 ते 5,600 टन वार्षिक 20 टक्क्यांनी वाढले. 2016 ते 2021 दरम्यान अजियाओ उत्पादनात 160 टक्के वाढ झाली आहे. सध्याचा कल असाच सुरू राहिला तर 2027 पर्यंत त्यात 200 टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. म्हणजेच त्यासाठी तेवढ्या मोठ्या प्रमाणात गाढवांची मागणी वाढणार आहे. (Pakistan’s Donkeys)
======
हे देखील वाचा : पाकिस्तानच्या संसदेत मांजरींची युक्ती
======
या सर्वात पाकिस्तानमधील गाढवांना मागणी आली. तिथे एकेकाळी 8,000 ते 12,000 रुपयांना विकली जाणारी गाढवे आता 30 ते 35 हजार रुपयांना विकली जात आहेत. पाकिस्तानमध्ये गाढवांची संख्या 660,000 आहे. अशाच पद्धतीनं गाढवं चीनला पाठवत राहिल्यास पाकिस्तानमधून गाढवं नामशेष होण्याची भीतीही व्यक्त होत आहे. मात्र या सर्वात पाकिस्तानी गाढवांच्या मालकांना लाखो रुपयांची किंमत महत्त्वाची आहे. पाकिस्तानमधील उद्योग धंदे कमी होत असतांना तेथील गाढवांच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे काही शेतक-यांनी गाढवांची फार्मिंग सुरु केले आहे. त्यासाठी या शेतक-यांना चीननं अर्थसहाय्यही दिलं आहे. एकूण पाकिस्तानमधील गाढवे सध्या चीनमुळे का होईना चर्चेत आली आहेत. (Pakistan’s Donkeys)
सई बने