कुठल्याही देशाचे सैनिक हे त्या देशासाठी एखाद्या ढालीसारखे असतात. आपल्या देशावर येणारे प्रत्येक संकट ते आधी स्वतःच्या अंगावर झेलतात आणि त्यापासून देशातील नागरिकांचे रक्षण करतात. पण जर देश पाकिस्तान असेल तर काय बोलायचे. कारण पाकिस्तान सरकारनं केलेल्या कर्माची फळे त्यांना परत मिळायला सुरुवात झाली आहे. दहशतवाद्यांना शाही वागणूक देणा-या या देशातील दहशतवाद्यांची हत्या होत आहे. (Pakistan)
एकीकडे बुलचीस्ताना आर्मीनं पाकिस्तानी सैन्यावर आक्रमण करायला सुरुवात केली आहे. जाफर एक्सप्रेसचे अपहरण करत 214 सैनिकांना मारल्याचा दावा बलूच आर्मीनं केला आहे. त्यापाठोपाठही दहा स्फोट करत बलुचिस्तानमधील पाकिस्तानी सैनिकांना मारण्यात आले. तर दुसरीकडे तालिबान सैन्यही पाकिस्तानी सैनिकांना धमकावत आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानी सैनिकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. अनेक भागात तैनात असलेल्या सैनिकांनी शस्त्र खाली ठेवून लढाईला नकार दिल्याची माहिती आहे. तर काही सैनिक हे ड्युटीवरुनच गायब झाले आहेत. अशा गायब झालेल्या सैनिकांची संख्या वाढत असून हे सैनिक सौदी अरेबिया, कतार, कुवेत यासारख्या देशांचा आसरा घेत आहेत. त्यामुळे पाकिस्तानमध्ये भविष्यात सुरक्षेचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. आधीच पाकिस्तानमध्ये अनेक अतिरेकी संघटना आहेत. या अतिरेकी संघटना लष्कराचा ताबा घेण्याची शक्यताही काही तज्ञांनी व्यक्त केली आहे. एकूण तेथील अराजक स्थितीमध्ये आणखी भर पडण्याची शक्यता आहे. (International News)
पाकिस्तान सरकारनं आपल्याचा पायावर मोठी कु-हाड मारुन घेतली आहे. अनेक वर्ष दहशतवाद्यांना या देशानं आपला देश खुला केला होता. दहशतवाद्यांना सुरक्षा देणा-या पाकिस्तानची सुरक्षाच आता वा-यावर आहे. कारण येथील सैनिकांमध्ये मोठी घबराट पसरली असून अनेक पाकिस्तानी सैनिक नोकरीचा राजीनामा देत आहेत. बलूच आर्मीनं केलेल्या जाफर एक्सप्रेसच्या अपहरणानंतर पाकिस्तानी सैनिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पाकिस्तानी सरकारनं या अपहरण नाट्यातील सर्व सैनिकांची सुखरुप सुटका केल्याचा दावा केला तरी, या दाव्याची पुष्टी करणारा एकही सबळ पुरावा त्यांनी दिला नाही. उलट बलूच आर्मीनं आपण सर्व सैनिकांची हत्या केल्याचे जाहीर केले. यामुळे घाबरलेल्या पाकिस्तानी सैनिकांवर बलूच सैन्यानं आणखी एक हल्ला करत 100 हून अधिक सैनिकांना एका बॉम्बस्फोटात मारले. या सर्वात तालिबाननंही पाकिस्तानी सैनिकांवर हल्ले करायला सुरुवात केली. (Pakistan)
आधीच थकीत पगाराच्या समस्येनं त्रस्त असलेल्या पाकिस्तानी सैनिकांनी यापासून वाचण्यासाठी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गेला आठवड्याभरात हजारो पाकिस्तानी सैनिकांनी आपल्या सेवेचा राजीनामा दिल्याची माहिती आहे. पाकिस्तानी सैनिक आपल्या नोकरीचा राजीनामा देत, अरेबिया, कतार, कुवेत आणि युएईमध्ये जात आहेत. या देशात मजुरी करु पण आपल्या देशातील सैनिकाची नोकरीही नको, या भूमिकेवर ते ठाम आहेत. पाकिस्तानमधील सैन्यात हे राजीनामा देण्याचे लोण एवढे पसरले आहे की, त्यामुळे वरिष्ठ अधिका-यांनी चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तानमध्ये अनेकवेळा गृहयुदधाचा भडका उडतो, अशावेळी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांना अडवण्याचे काम लष्कराला करावे लागते. गेल्याच वर्षी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले. यात एका आठवड्यातच पाकिस्तानचे 24 कोटी रुपयांचे नुकसान झाले. (International News)
==============
हे देखील वाचा : Donald Trump : ऑर्डर टू डिपोर्ट
Donald Trump : पुतिनच्या वाटेवर ट्रम्प !
===============
पाकिस्तानसारख्या देशासाठी हा आकडा मोठा आहे. शिवाय या आंदोलकांनी पोलीसांवरही हल्ला केला होता. त्यामुळे लष्कराला बोलावण्यात आले होते. आत्ताही पाकिस्तानमधील गृहयुद्धाचा कधी भडका उडेल याची खात्री नाही. अशीच परिस्थिती पुन्हा आली तर पुरेशा सैनिकांअभावी आंदोलकांना रोखणे पोलीसांना कठिण जाणार आहे. एकेकाळी ज्या बुलचिस्तानच्या नागरिकांवर पाकिस्तानी सैनिक अत्याचार करीत होते, तेच बलूच नगरिक आता या सैनिकांना लक्ष करीत आहेत. बलूच आर्मीनं आत्तापर्यंत अनेक पाकिस्तानी सैनिकांना मारले असून हजारोंना जायबंदी केले आहे. त्यातच बलूच आर्मीने मोठ्या प्रमाणात आत्मघातकी बॉम्बर टिम उभारल्याची माहिती पुढे आली आहे. हे आत्मघातकी बॉम्बर फक्त पाकिस्तानी सैनिकांना टार्गेट करत आहेत. त्यामुळे घाबरलेल्या पाकिस्तानी सैनिकांनी राजीनामा देऊन देशातून पळ काढायला सुरुवात केली आहे. (Pakistan)
सई बने