भारतातील असे काही रहस्य आहेत ज्याची उत्तर अद्याप ही कोणाला मिळालेली नाहीत. काही धार्मिक ठिकाणं सुद्धा अशाच पद्धतीची असून त्याबद्दल अधिक संशोधन होणे शिल्लक आहे. या रहस्यांमधीलच एक असलेल्या आणि देशातील सर्वाधिक श्रीमंत मंदिरांपैकी तिरुवनंतपुरमचे श्री पद्मनाभ स्वामी मंदिराचा (Padmanabhaswamy temple) सातवा दरवाजा. श्रीमंत मंदिरांच्या कारणामुळे नेहमीच चर्चेत राहिलेल्या या मंदिरामध्ये एक गेट आहे. हा गेट आजवर खोलण्यात आलेला नाही आणि असे म्हटले जाते की, जर तो गेट खोलल्यास त्यामध्ये ऐवढा खजिना निघेल की भारत पुन्हा श्रीमंत होऊ शकतो.
खरंतर मंदिरातील या खजिन्याबद्दल खुप दावे केले जातात. त्यामुळे तुम्हाला ही प्रश्न पडला असेल की, ऐवढा खजिना असेल तर मंदिराचा हा दरवाजाचा का खोलला जात नाही. परंतु हा गेट खोलणे ही काही सोप्पी गोष्ट नाही आणि त्यावर सातत्याने चर्चा केली जाते. अशातच हा गेट कोणत्या प्रकारे बंद करण्यात आला आणि त्याची काय खासियत आहे अशा सर्व प्रश्नांची आज आपण उत्तर पाहूयात.
काय आहे या मंदिराची कथा?
भगवान विष्णू यांचे हे मंदिर ६ व्या शतकातील क्वाणाकोरच्या राजाने बनवले होते. ज्याचा उल्लेख ९ व्या शतकातील ग्रंथात केला जातो. असे म्हटले जाते की, या राजांनी या मंदिरात आपला सर्व खजिना लपवला आहे. आता राजघराणेच या मंदिराची देखरेख करते. या मंदिरात ७ तहखाने आहेत ज्यामधील ६ तहखाने उघडण्यात आलेत. त्यामधून काही बहुमूल्य सामान ही मिळाले आहे. मात्र सातवा गेट खोलणे बाकी आणि आता तो खोलण्यावर बंदी आहे.
कसा आहे हा गेट?
या गेटबद्दल बोलायचे झाल्यास असे म्हटले जाते की, याची देखरेख साप करतात आणि कोणालाही तो दरवाजा खोलण्यास देत नाही. मान्यतांनुसार, एकदा तो खोलण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण साप चावल्याने त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. खरंतर हा दरवाजा स्टीलचा तयार करण्यात आला आहे आणि त्यावर दोन सापाचे डिझाइन बनवण्यात आले आहे. या दरवाजासंदर्भात असे ही म्हटले जाते की, याला कोणत्याही प्रकारचे टाळं लावण्यात आलेले नाही आणि तो खोलण्याची एक वेगळीच पद्धत आहे. असे मानले जाते की, तो नागासंबंधित मंत्रानेच खोलला जाऊ शकतो. परंतु तो खोलणे खुप कठीण आहे.(Padmanabhaswamy temple)
कोण खोलू शकतो हा गेट?
या गेटसाठी असे म्हटले जाते की. तो खोलण्याचे काम सिद्ध व्यक्ती करु शकतो आणि आतापर्यंत असा व्यक्ती मिळालेला नाही. या गेट खोलणे कठीण असल्याने तो अद्याप उघडण्यात आलेला नाही. खुप परवानग्यानंतर तो खोलला जाऊ शकतो. बहुतांशजण त्याला शापित तहखाना असे ही म्हणतात.
हे देखील वाचा- जगातील सर्वाधिक सुंदर महिला क्लियोपेट्रा जिचा मकबरा आणि मृत्यू यामागील रहस्य नक्की काय आहे?
काय असू शकते या तहखान्यात?
या तहखान्याबद्दल असे बोलले जाते की, या मध्ये भरपूर सोने असू शकते. कारण जेव्हा ६ वा गेट खोलला तेव्हा खुप सोने मिळाले होते. रिपोर्ट्सनुसार, पद्मनाभ स्वामी मंदिराच्या ६ व्या तहखानात्यात आतापर्यंत १,३२,००० कोटी रुपयांची संपत्ती मिळाली आहे. यामध्ये सोन्याच्या मुर्त्या, हिरे, दागिने यांचा समावेश आहे. काही इतिहासकार असा अंदाज लावतात की, यामध्ये ऐवढे सोने आहे की देशाच्या महसूलात खुप वाढ होऊ शकते. असे मानले जाते की. मंदिरात असलेल्या खजिन्याची एकूण किंमत १ ट्रिलियन डॉलर पेक्षा ही अधिक आहे.