पद्म पुरस्कार हा भारताच्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक भव्य-दिव्य सन्मान असतो. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना या पुरस्काराने गौरविण्यात येतं. यंदा क्रीडा क्षेत्रात आणि खासकरून क्रिकेटमधल्या भारताच्या दोन दिग्गज कॅप्टन्सचा पद्मश्रीने सन्मान करण्यात आला आहे. ते म्हणजे Hitman रोहित शर्मा आणि धाकड हरमनप्रीत कौर… पुरुष आणि महिला क्रिकेटविश्वात या दोन्ही कॅप्टन्सनी ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली. भारतीय क्रिकेटविश्वाला एक नवीन आयाम देणाऱ्या या दोन्ही क्रिकेटस्टार्स चा सन्मान मुळातच भारताचा सन्मान आहे. रोहित शर्माच्या धुवांधार कॅप्टन्सीमध्ये भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी तर जिंकलीच, पण यासोबतच टी20 वर्ल्ड कप सुद्धा तब्बल १७ वर्षांनी जिंकला. २०२३ च्या वनडे वर्ल्ड कपचं पराभवाचं दु:ख तर प्रत्येक भारतीयाला होतं. पण त्यावर चॅम्पियन्स ट्रॉफी आणि टी20 वर्ल्ड कप विजयाचा मुलामा रोहितच्या नेतृत्वात चढला आणि भारत सगळ्याच फॉरमॅटमध्ये भारत वरचढ ठरला.

सध्या पहायचं झालं तर रोहित शर्माकडे भारताच्या कोणत्याही फॉरमॅटची कॅप्टनशिप नाही, पण तरीही रोहित शर्माने आतापर्यंत भारतीय क्रिकेटसाठी जे काही करून ठेवलं आहे, ते कुणालाच करता येणार नाही. भारताने टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहित शर्माने टी २० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. पुढे रोहित शर्माने भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून दिली असली तरी त्याला कोच गौतम गंभीर यांनी कर्णधारपदावरून काढून टाकले होते. त्यापूर्वी रोहित शर्माकडून कसोटी संघाचे कर्णधारपद काढून घेतले आणि त्याला संघाबाहेरही केले. आता रोहित शर्मा हा एक फक्त खेळाडू म्हणूनच सध्या भारताच्या संघात आहे. पण रोहित शर्माचं हे कतृत्व कोणीही विसरू शकणार नाही. कॅप्टनसी गेली तरी त्याचा फॉर्म डगमगला नाही. त्यामुळेच रोहित शर्माला हा पद्म सन्मान मिळणार आहे. आता तो २०२७ च्या वर्ल्ड कप पर्यंत खेळणार का? याकडेच सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून आहे.
हे देखील वाचा
Rohit Sharma : रोहित शर्माच्या ‘त्या’ पोस्टमागील खरे कारण आले समोर
दुसरीकडे भारताची धाकड गर्ल कॅप्टन हरमनप्रीत कौरचा पद्मश्रीने सन्मान करण्यात आला आहे. तिच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने इतिहासातला पहिला वहिला वर्ल्ड कप जिंकला. आजपर्यंत भारत ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता, तो तिच्या कॅप्टन्सीमध्ये खरा झाला. याआधी वूमन्स वर्ल्ड कपमध्ये भारत दोनवेळा फायनलपर्यंत पोहोचला होता. पण हरमनप्रीतने भारताचं स्वप्न सत्यात उतरवलं. याआधी भारताने तिच्या कॅप्टन्सीमध्ये तीन वेळा एशिया कप जिंकण्याचाही पराक्रम केला होता. याआधी रोहित शर्माचा अर्जुन पुरस्कार आणि खेलरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला होताआणि हरमनप्रीतला अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

आजपर्यंत क्रिकेटमध्ये भारताच्या १५ जणांचा पद्मश्री, ९ जणांचा पद्मभूषण, १ पद्मविभूषण आणि १ भारतरत्न असे सन्मान मिळालेले आहेत.
- भारतरत्न
सचिन तेंडूलकर
- पद्मविभूषण
सचिन तेंडूलकर
- पद्मभूषण
सी के नायडू
लाला अमरनाथ
विनू मांकड
चंदू बोर्डे
दिनकर देवधर
सुनील गावसकर
कपिल देव
महेंद्रसिंग धोनी
राहुल द्रविड
- पद्मश्री
गुरबचन सिंग
राहुल द्रविड
सौरव गांगुली
अनिल कुंबळे
महेंद्रसिंग धोनी
हरभजन सिंग
विरेंद्र सेहवाग
व्ही. व्ही. लक्ष्मण
झुलन गोस्वामी
मिथाली राज
गौतम गंभीर
युवराज सिंग
जहीर खान
विराट कोहली
आर. अश्विन
रोहित शर्मा*
हरमनप्रीत कौर*
