एक असा माणूस ज्याला घरच्या बिकट परिस्थितीमुळे कॉलेजचं शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. पण काही वर्षातच त्याने इतके पैसे कमवायला सुरुवात केली की दर महिन्याला नोटांचे बंडल बांधण्यासाठी त्याला रबर बँडवरच 2 लाख रुपये खर्च करावे लागायचे. एकदा त्याच्या मुलीला थंडी वाजत होती म्हणून त्याने जवळपास करोडो रुपयांच्या नोटा फक्त शेकोटीसाठी जाळल्या होत्या. एवढंच काय, त्याच्याकडे इतके पैसे आले होते की त्याच्या कमाईतले 10% म्हणजे जवळपास 17 हजार कोटी रुपये उंदरांच्या कुरतडण्यामुळे किंवा बुरशी वगैरे लागल्यामुळे खराब व्हायचे. जगातल्या आतापर्यंतच्या सगळ्यात मोठ्या ड्रग माफियाबद्दल, “किंग ऑफ कोकेन” पाब्लो एस्कोबारबद्दल. एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा जगातला सगळ्यात मोठा ड्रग माफिया आणि श्रीमंत माणूस कसा बनला हे जाणून घेऊ. (Pablo Escobar)
कोलंबियाच्या एका छोट्याशा खेड्यात 1 डिसेंबर 1949 ला पाब्लो एस्कोबारचा जन्म झाला. 1 डिसेंबर ही तारीख लक्षात ठेवा ती महत्त्वाची आहे. खरंतर पाब्लोचं स्वप्न होतं की तो अभ्यास करून देशाचा प्रेसिडेंट बनेल. पण त्याचे वडील शेतीतून इतके पैसे कमवू शकत नव्हते की पाब्लोला शिक्षण देता येईल. त्याची आई स्कूल टीचर होती, त्यामुळे तिच्या पैशांवर पाब्लोचं शाळेतील शिक्षण कसंबसं झालं, पण पुढे कॉलेजची महागडी फी त्याच्या कुटुंबाला परवडणारी नव्हती. मग पाब्लो एमिलियो एस्कोबार गाव्हिरियाने कुटुंबाची परिस्थिती पाहिली त्यामागचं कारण समजून घेतलं आणि एक शपथ घेतली की मी वयाच्या 22 व्या वर्षी करोडपती बनून दाखवणार. जर त्याने हे कोणाला तेव्हा बोलून दाखवलं असतं, तर लोकांना वाटलं असतं तो ढगात गोळ्या मारतोय पण तो हे खरंच करणार होता. (Top Stories)
पाब्लोने कॉलेजच्या वेळीच गुन्हेगारीच्या जगात पाऊल ठेवलं. पैसा कमवण्यासाठी तो स्मशानात जायचा आणि तिथल्या कबरींवरचे दगड चोरून विकायचा.पण यातून फार पैसे मिळत नव्हते, म्हणून त्याने लक्झरी गाड्या चोरायला सुरुवात केली. 1974 मध्ये पाब्लोने एक गाडी चोरली, ज्यामुळे तो पहिल्यांदा तुरुंगात गेला. त्याने गुन्हेगारीची सुरुवात गरीबीमुळे केली होती, पण आता त्याला असे पैसे कमवताना मज्जा येत होती. तुरुंगात त्याने विचार केला की असं काहीतरी करायला हवं ज्याने एकाच वेळी खूप सारे पैसे मिळतील. आणि त्याच्या डोक्यात विचार आला किडनॅपिंगचा. जेल मधून बाहेर आल्यानंतर त्याला एक मोठं टार्गेट मिळालं. त्याने कोलंबियन बिझनेसमन डिएगो एचआरव्हीला किडनॅप करण्याचा प्लॅन बनवला. आणि त्याने मोठी हिंमत दाखवत एकट्याने डिएगोच्या सिक्युरिटीशी दोन हात करत त्याला किडनॅप केलं. त्याने त्याच्या कुटुंबाकडून 50,000 डॉलर्सची खंडणी मागितली आणि ती त्याला मिळालीसुद्धा. या मोठ्या किडनॅपिंगनंतर कोलंबियन गुन्हेगारी जगतात त्याची दहशत पसरली, थोडक्यात सर्वांना काळालं की मार्केटमध्ये नवा भाई आला आहे. (Pablo Escobar)
लवकरच संपूर्ण कोलंबियामध्ये तो पॉप्युलर किडनॅपर झाला. जेव्हा त्याचं हे किडनॅपिंग करियर सुरू होतं तेव्हा त्याला व्हाइट पाऊडरबद्दल म्हणजे कोकेनबद्दल कळलं. त्याला कळलं की 10 किडनॅपिंगमधून जेवढा पैसा मिळतो, तेवढा पैसा तर एका छोट्या कोकेनच्या पॅकेटच्या डिलिव्हरीतून मिळतो. हा धंदा शिकण्यासाठी तो एक एका ड्रग डीलिंगच्या गॅंगमध्ये सामील झाला आणि मोठमोठ्या ड्रग डीलर्सबरोबर काम करू लागला. एकदा 14 किलो ड्रग्स डिलिव्हर करताना त्याचं एका एका ड्रग माफियाशी भांडण झालं. त्याचं नाव होतं फॅबिओ रेस्ट्रेपो, मेडलिनमधला सगळ्यात शक्तिशाली ड्रग लॉर्ड. फॅबिओने पाब्लोची लायकी काढली होती, तेव्हा पाब्लोला राग आला. त्याने फॅबिओला कॉलर धरून मारहाण केली. तिथे 10-12 लोक होते, पण पाब्लो एकटाच त्यांच्याशी भिडला. रागाच्या भरात त्याने बंदूक उचलली आणि फॅबिओला ठार केलं. हा पाब्लोचा पहिला खून होता. इतक्या मोठ्या ड्रग माफियाला मारल्यामुळे त्याचं ड्रग इंडस्ट्रीत नाव झालं.(Top Stories)
पाब्लो कोकेनच्या धंद्यात इतक्या झपाट्याने पैसे कमवू लागला की त्याचा दबदबा सगळीकडे पसरला. मार्च 1976 मध्ये त्याने 15 वर्षांच्या मुलीशी लग्न केलं. त्याच वर्षी त्याने मेडलिन कार्टेल नावाची गॅंग तयार केली. पाब्लो हा पहिला ड्रग डिलर होता जो थेट अमेरिकेच्या सीमेत खुसून ड्रग्स विकायचा. हळूहळू अमेरिकेतील लोकांना कोकेनचं इतकं व्यसन लागलं की पाब्लोचं कार्टेल महिन्याला 70-80 टन कोकेन यूएसमध्ये विकू लागलं. मग काय लहानपणी त्याने घेतलेली शपथ त्याने पूर्ण केली होती. 80 च्या दशकात पाब्लो इतका श्रीमंत झाला की त्याच्याकडे 20 हेलिकॉप्टर्स, 2 पाणबुड्या आणि 32 ट्रक होते. त्याच्याकडे 142 विमानं होती, जी ड्रग्स स्मगलिंगसाठी वापरली जायची. तो पायलटला एका फ्लाइटसाठी 1 लाख डॉलर्स द्यायचा. म्हणजे त्याकाळत पायलटला per flight 8 लाख रुपये मिळायचे. (Pablo Escobar)
त्या काळात कोलंबियात फक्त दोन लेअर जेट होते, त्यापैकी एक पाब्लोच्याकडे होतं. हे जेट तो स्वतः उडवायचा, त्यात ढीगभर कॅश आणि कोकेन असायचं. हे विमान कोलंबियातून यूएसला ड्रग्स डिलिव्हर करायचं. ड्रग्स तस्करीत तो इतका हुशार होता की कोणी विचार सुद्धा करू शकत नाही अशी तो smuggling करायचा. काही काळ तो माशांच्या पोटात कोकेन ठेवून तस्करी करायचा, पण ही माहिती लीक झाल्यामुळे माल पकडला जायचा. मग त्याने नुकसान टाळण्यासाठी आणि पोलिसांना चकमा देण्यासाठी एक आयडिया शोधली. तो काय करायचा? आपण जी जीन्स घालतो, ती जीन्स कोकेनच्या लिक्विड सोल्यूशनमध्ये बुडवायचा. कोकेन जीन्समध्ये शोषलं जायचं. मग सुकलेली जीन्स बॉक्समध्ये पॅक करून एक्सपोर्ट करायचा. देशात त्याचे लोक जीन्स केमिकलमध्ये बुडवून कोकेन काढायचे. (Top Stories)
ही ट्रिक बराच काळ चालली, पण ही माहिती सुद्धा लिक झाली. मग त्याने काय केलं? त्याने जीन्स एक्सपोर्ट करणं सुरु ठेवलं फक्त कोकेन आता जीन्समध्ये नव्हतं, तर बॉक्सच्या पुठ्ठयांमध्ये होतं. जीन्स ऐवजी तो या बॉक्स कोकेनच्या लिक्विड सोल्यूशनमध्ये बुडवून सुकवायचा आणि त्यात जीन्स पॅक करायचा. पोलिस जीन्स तपासायचे, जिथे कोकेन नसायची, आणि ते बॉक्स फेकून द्यायचे. पाब्लोचे लोक कचऱ्यातून ते बॉक्स उचलायचे आणि त्यातून कोकेन काढायचे. अशा वेगवेगळ्या आयडियाजमुळे तो रोज 15 टन कोकेन यूएसला पाठवायचा. त्याने धंद्यात एक नियम बनवला होता – “प्लाता ओ प्लोमो”, म्हणजे “पैसा किंवा गोळी”. याचा साधा अर्थ असा की, जर तुम्ही माझ्या धंद्यात अडथळा आणलात, तर एकतर माझ्याकडून लाच घ्या, मी इतकी लाच देईन की तुमच्या सात पिढ्या बसून खातील; नाहीतर मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला ठार करेन. (Pablo Escobar)
पाब्लोने इतका काळा पैसा कमावला की त्याला ठेवायला जागाच नव्हती. त्याने 800 पेक्षा जास्त घरं बांधली, जिथे तो पैसे ठेवायचा. जेव्हा ही घरं कमी पडू लागली, तेव्हा त्याने जमीन खणून पैसे ठेवायला सुरुवात केली. त्याच्या श्रीमंतीचा अंदाज यावरून लावता येईल की एकदा त्याच्या मुलीला थंडी वाजत होती, तेव्हा त्याने थंडीपासून वाचवण्यासाठी 16 कोटी रुपयांच्या नोटा जाळून शेकोटी केली होती.
पाब्लोने “हसिएन्डा नेपल्स” नावाचं आलिशान घर बांधलं होतं. त्यात त्याने एक पूर्ण प्राणिसंग्रहालय बनवलं होतं. त्यात चित्ते, पक्षी, हिप्पोपोटेमस, जिराफ असे अनेक प्राणी होते, जे कोलंबियाच्या प्राणिसंग्रहालयातही नव्हते. या घरात विमानतळ,कृत्रिम तलाव, सगळ्या सुखसोयी होत्या. पाब्लोला खूप पैसा मिळाला होता, पण त्याला हे माहीत होतं की सुरक्षित राहायचं तर सरकार त्याच्या खिशात हवी. त्याने कोलंबियन सरकारला 10 बिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास 80 हजार कोटी रुपये देण्याची ऑफर दिली. ज्याने देशाचं कर्ज फिटेल, पण बदल्यात त्याने धंद्याला सपोर्ट मागितला. सरकारने हा प्रस्ताव नाकारला, जे योग्य होतं. मग पाब्लोने राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. त्याने रॉबिन हूडसारखी प्रतिमा बनवण्यासाठी चर्च, गार्डन्स, फुटबॉल स्टेडियम, हॉस्पिटल, शाळा बांधल्या. गरीबांना मोफत पैसे वाटायला सुरुवात केली. (Pablo Escobar)
या चांगल्या कामांमुळे 1982 मध्ये पाब्लोला कोलंबियन संसदेत सदस्य म्हणून निवडलं गेलं. पण दोन वर्षांनी 1984 मध्ये त्याला विरोधी पक्षांनी त्याच्या गुन्हेगारी कृत्यांचा पर्दाफाश केल्यामुळे राजीनामा द्यावा लागला. तरीही त्याने आणखी जोशात सुरू ठेवला. 1989 मध्ये फोर्ब्सने पाब्लोला जगातला सातवा सर्वात श्रीमंत माणूस घोषित केलं, त्याची नेटवर्थ 25 बिलियन डॉलर्स होती. राजकारणात तो मैत्री करण्यासाठी गेला, पण तिथे त्याचे शत्रू तयार झाले. लुईस कार्लोस गॅलन सेर्मेंटो जे एक प्रेसिडेंट उमेदवार होते. ते त्याचे शत्रू बनले 18 ऑगस्ट 1989 रोजी पाब्लोने त्यांची गोळ्या घालून हत्या केली.
27 नोव्हेंबर 1989 रोजी पाब्लोने प्रेसिडेंट उमेदवार सीझर गाव्हिरियाला मारण्यासाठी एव्हिएन्का फ्लाइट 203 मध्ये बॉम्बस्फोट घडवला, ज्यात 107 लोक होते. सुदैवाने गाव्हिरिया त्या फ्लाइटमध्ये नव्हते. (Top Stories)
=================
हे देखील वाचा : Success Story : ‘मसाला ते लज्जतदार लोणच्यांपर्यंत’, वाचा पुण्यातील बेडेकर कुटुंबाची यशोगाथा
=================
पाब्लोने शत्रूंना मारण्यासाठी स्वतःची आर्मी बनवली होती, ज्यावर त्याने 1 अब्ज रुपये खर्च केले. त्याने त्याच्या आयुष्यात 4000 लोक मारले, त्यात 200 जज आणि 1000 पोलीस व सरकारी अधिकारी होते. 1992 मध्ये कोलंबियात 28,237 खून झाले, ज्यामुळे कोलंबिया “मर्डर कॅपिटल ऑफ द वर्ल्ड” बनला. आंतरराष्ट्रीय दबावामुळे तत्कालीन प्रेसिडेंट सीझर गाव्हिरियाने पाब्लोला शरण येण्याची वॉर्निंग दिली. तेव्हा पाब्लोने सरकारसमोर दोन अटी ठेवल्या, 1) कोलंबियाने यूएसशी एक्स्ट्राडिशन करार रद्द करावा, आणि दुसरं तो स्वतःच्या बनवलेल्या तुरुंगात राहील आणि तिथे पोलिसांना येण्याची बंदी असेल. सरकारने दबावाखाली हे मान्य केलं. त्याने “ला कॅथेड्रल” नावाचं स्वत:चं जेल बांधलं, जे 5 स्टार हॉटेलपेक्षा कमी नव्हतं. स्विमिंग पूल, थिएटर, क्लब, धबधबे, विमानतळ, त्यात सगळं होतं. त्याच्या या जेलमधून पाब्लोने धंदा सुरू ठेवला. शेवटी सरकारने त्याच्या विरुद्ध स्ट्रीक्ट action घेण्याचा निर्णय घेतला. पण पोलिस येत असल्याची खबर लागताच पाब्लो साथीदारांसह फरार झाला. पुढचे दोन वर्ष कोणीच त्याला शोधू शकलं नाही. मग यूएस आणि कोलंबियन सरकारने “सर्च ब्लॉक” नावाची 600 जणांची टीम बनवली. जी 24 तास पाब्लोच्या शोधात होती. (Pablo Escobar)
आणि 1 डिसेंबर 1993, पाब्लोच्या 44 व्या वाढदिवशी जेव्हा तो त्याच्या कुटुंबाशी फोनवर बोलत होता. सर्च ब्लॉकने त्याचा फोन ट्रेस केला तो मेडलिनमधल्या एका घरात लपला होता. त्याला सर्च ब्लॉकच्या टीमने घेरलं. त्याला कळालं तेव्हा त्याने गोळीबार करत पळण्याचा प्रयत्न केला. पण एका ऑफिसरने त्याला तीन गोळ्या मारून ठार केलं. त्याचा पैसा कुठे कुठे लपवलेला आहे, हे फक्त त्यालाच माहीत होतं. त्याच्या भाच्याने नंतर सांगितलं की त्याला पाब्लोच्या घरात भिंतीत 18 मिलियन डॉलर्स सापडले. त्याने अजून किती पैसा कुठे लपवलेला आहे, कोणालाच माहीत नाही.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics