पु. ल. देशपांडे अर्थात पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजे मराठी साहित्यविश्वाला पडलेले सुंदर स्वप्न. संपूर्ण साहित्यविश्वात सुवर्ण अक्षरात नाव कोरून ठेवले तरी देखील पु ल यांच्या कर्तृत्वासमोर ते कमीच असेल. पु. ल यांची कीर्ती केवळ महाराष्ट्रापुरतीच मर्यादित नाही तर संपूर्ण जगभरात त्यांचा नावलौकिक आहे. विनोदी लेखक, कवी, शिक्षक, अभिनेते, पटकथालेखक, संगीतकार, गायक, नकलाकार, नाटककार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, वक्ते असे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे. त्यांना कायम त्यांच्या आद्याक्षरांवरून ‘पु.ल.’ म्हणून ओळखले जाते. (P. L. Deshpande)
उद्या १२ जून रोजी पु.ल. देशपांडे यांची २६ वी पुण्यतिथी आहे. १२ जून २००० रोजी पुण्यामध्ये पु.ल यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले. आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने जाऊन घेऊया त्यांच्या जीवनप्रवासाबद्दल. पु.ल.देशपांडे यांचा जन्म मुंबईतील गावदेवी या भागात गौड सारस्वत ब्राह्मण कुटुंबामध्ये ८ नोव्हेंबर १९१९ रोजी झाला. त्यांचे आजोबा वामन मंगेश दुभाषी हे एक कवी आणि साहित्याचे जाणकार होते. त्यांचे बालपण जोगेश्वरी येथील सारस्वत कॉलनीत गेले. पु ल यांनी पार्ले टिळक विद्यालयात शालेय शिक्षण घेतले. (Marathi NEws)
पुलंना घरात खूप वाचन करायला आणि रेडिओवरील संगीत ऐकायला मिळाले. त्यांच्या घरी संगीताच्या बैठकाही होत असत. ते घरीच बाजाची पेटी शिकले. टिळक मंदिरात एकदा बालगंधर्व आले असताना पु.लं.नी त्यांना पेटी वाजवून दाखवली. बालगंधर्वांनी शाबासकी दिली होती. वयाच्या पाचव्या वर्षी शाळेत हावभावासहित खणखणीत आवाजात पु. ल. यांनी पहिले भाषण केले होते. हे भाषण त्यांच्या आजोबांनी लिहून दिलेले आणि त्यांनी पाठ केलेले होते. सात वर्षे अशी भाषणे केल्यानंतर वयाच्या बाराव्या वर्षापासून पु. ल. देशपांडे स्वतःची भाषणे स्वतःच लिहायला लागले. एवढेच नाही तर ते इतरांनाही भाषणे आणि संवाद लिहून देऊ लागले. (Top Stories)
मुंबईतील इस्माईल युसुफ कॉलेजातून इंटर आणि सरकारी लॉ कॉलेजमधून एल्एल.बी. ची पदवी घेतली आणि कलेक्टर कचेरी प्राप्तीकर विभागात काही काळ नोकरी केली. त्यापूर्वी ते पेट्रोल रेशनिंग ऑफिसमध्ये कारकून आणि ओरिएंटल हायस्कूलमध्ये शिक्षक होते. पुढे पु. ल पुण्याला आले. तिथे आल्यावर त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए.आणि नंतर एम.ए. केले. १९३७ पासून नभोवाणीवर पुल मोठ्या नाटिकांत भाग घेऊ लागले. त्या वर्षी त्यांनी अनंत काणेकरांच्या ‘पैजार’ या श्रुतिकेत काम केले. (Marathi Todays Headline)
===========
हे देखील वाचा : इंडिगोची एअर हॉस्टेस ते यशस्वी पायलट : खुशबू प्रधानच्या जिद्दीच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी
===========
२०१४ मध्ये प्रकाशित झालेले ‘बटाट्याची चाळ’ हे त्यांचे विनोदी पुस्तक प्रसिद्ध आहे. १९४८ साली पुल यांनी ‘तुका म्हणे आता’ हे नाटक आणि ‘बिचारे सौभद्र’ हे प्रहसन लिहिले. १९४७ ते १९५४ या काळात त्यांनी चित्रपटांमध्ये आणि चित्रपटांसाठी काम केले. ‘वंदे मातरम’, ‘दूधभात’ आणि ‘गुळाचा गणपती’ या चित्रपटांत अष्टपैलू कामगिरी केली. १९४७ सालच्या ‘कुबेर’ चित्रपटाला त्यांनी संगीत दिले. १९४७ मध्ये ‘कुबेर’ या चित्रपटाद्वारे पुलंनी संगीतकार म्हणून चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. संगीताचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी वसंतराव देशपांडे, पंडित भीमसेन जोशींसारख्या दिग्गजांना हार्मोनियमवर साथ दिली. (Marathi Latest News)
इंद्रायणीकाठी भक्त तुझा रंगे, नाच रे मोरा यांसारखी त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी आजही लोकांच्या स्मरणात आहे. ‘गुळाचा गणपती’ हा दिग्दर्शन,संगीत, अभिनय हा त्यांचा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटातील ‘इथेच टाका तंबू’, ‘सुवर्ण द्वारावतीचा राजा’ यांसारखी गाणी विशेष लोकप्रिय झाली. या सगळ्या गाण्यांना त्या काळात पुलंच्या हार्मोनियमची साथ होती. साधी, सरळ, समजावयास सोपी अशी गाणी आणि तितकेच साधे पण श्रवणीय असे पुलंनी दिलेले संगीत त्या काळात लोकप्रिय ठरले. कुबेर, मानाचे पान, गुळाचा गणपती, जागा भाड्याने देणे आहे हे त्यांचे चित्रपट विशेष लक्षात राहिले. (Todays Marathi NEws)
पु.ल. देशपांडे यांनी १९४३ पासून लिखाणास सुरुवात केली. सुरुवातीला ते अभिरुची या मासिकातून लिखाण करायचे. पुढे इतरही अन्य नियतकालिकांमधून त्यांचे लिखाण प्रसिद्ध होऊ लागले. त्यांना नाटकाचीही आवड होती. त्यामुळे त्यांनी नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. नाट्यक्षेत्रातील यशामुळे पु. ल. देशपांडे यांना चित्रपटातदेखील काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी ‘पुढचे पाऊल’ या मराठी चित्रपटात नायकाची भूमिका साकारली होती. गुळाचा गणपती या चित्रपटाची त्यांनी कथा लिहिली. एवढेच नव्हे तर त्यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शक, संवादलेखक म्हणून भूमिका पार पाडली होती. (Top Marathi NEws)
पु.ल. देशपांडे यांनी अनेक अजरामर नाटकं लिहिली. काही इंग्रजी नाटकांचे त्यांनी मराठीत रुपांतर केले. १९४८ साली त्यांनी ‘तुका म्हणे आता’ हे पहिले नाटक लिहिले. हे नाटक अयशस्वी ठरले. नंतर १९५२ साली त्यांनी लिहलेले ‘अंमलदार’ हे नाटक कमालीचे लोकप्रिय ठरले. त्यांचे तुझे आहे तुजपाशी, भाग्यवान, सुंदर मी होणार, ती फुलराणी, नवे गोकुळ, पहिला राजा, पुढारी पाहिजे, भाग्यवान, राजा ईडिपस, वटवट वटवट आदी नाटकं चांगलेच लोकप्रिय ठरले. (Top Marathi Headline)
पु. ल. देशपांडे यांनी अनेक व्यक्तिचित्रे लिहिली. यामध्ये त्यांनी १९६२ साली लिहलेल्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाची आजही कमालीची लोकप्रियता आहे. १९६५ मध्ये या पुस्ताकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला होता. पुढे त्यांनी विनोदी लिखाण सुरु केले. खोगीरभरती, नस्ती उठाठेव, बटाट्याची चाळ , गोळाबेरीज, असा मी असामी, हसवणूक, एका रविवारची कहाणी, बिगरी ते मॅट्रिक, मुंबईकर, पुणेकर का नागपूरकर?, म्हैस, मी आणि माझा शत्रुपक्ष, पाळीव प्राणी, काही नवे ग्रहयोग, माझे पौष्टिक जीवन, उरलासुरला ही काही त्यांची विनोदी लेखसंग्रहं आहेत. (P. L. Deshpande Information)
पु.ल. देशपांडे यांनी काही प्रवासर्णनेदेखील लिहलेली आहेत. अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्यांच्या देशा, वंगचित्रे ही त्यांची प्रवासवर्णनं खूप प्रसिद्ध आहे. पु.ल यांच्या लिखाणामुळे अनेक पिढ्या घडल्या. कोणत्याही पिढीमधील अशी एकही व्यक्ती नाही जी पुलंना त्यांच्या लिखाणाला ओळखत नाही. मराठी साहित्याला जागतिक स्तरावर नेण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. १९६६ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९६७ सालच्या नांदेड येथील मराठी नाट्यसंमेलनाचे पु.ल. देशपांडे अध्यक्ष होते. पु.ल. देशपांडे यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर त्यांचे दोन लग्न झाले होते. १९४० च्या सुरवातीलाच त्यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले. त्या कर्जत येथील दिवाडकर कुटुंबीयांतील होत्या. त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव सुनिता ठाकूर होते. त्या मुळच्या रत्नागिरीच्या होत्या. (Social Updates)
===========
हे देखील वाचा : कुडाळ गवळदेव : पुरुष मंडळींकडून साजरी होणारी वटपौर्णिमेची अनोखी परंपरा
===========
पु.ल. देशपांडे यांचे काही गाजलेले किस्से
* हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना काही कारणाने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते ऐकताच पु.ल म्हणाले,”त्यांच्या खोलीच्या दरवाज्यावर आता ‘गर्वसे कहो हम हिंदुजा में है’ असं लिहायला हरकत नाही”.
* साहित्य संघात एका रटाळ नाटकाच्या प्रयोगादरम्यान पु. ल. देशपांडे यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं होतं. त्यावेळी नाटकाच्या पहिल्या अंकादरम्यान पडद्यामागे काहीतरी पडल्याचा आवाज आला. त्यावेळी त्यांच्या शेजारी बसलेला एक प्रेक्षक म्हणाला,”काय पडलं हो?”. त्यावेळी पु.ल. देशपांडे म्हणाले,”नाटक…दुसरं काय?”.
* पु.ल. देशपांडे एकदा प्रवासादरम्यान असताना त्यांना त्यांचा एक चाहता भेटला आणि त्यांना म्हणाला की,”माझी फक्त दोन व्यक्तींवर श्रद्धा आहे. एक ज्ञानेश्वर आणि दुसरे तुम्ही. माझ्या खोलीतही ज्ञानेवश्वरांच्याबाजूला तुमचाही फोटो लावला आहे. त्यावर पु.ल म्हणाले,”असं काही करू नका.. नाहीतर लोक विचारतील ज्ञानेश्वरांनी ज्यांच्याकडून वेद म्हणून घेतले तो रेडा हाच आहे का?”.
* पु. लं. देशपांडे एकदा मिठाई घेण्यासाठी चितळ्यांच्या दुकानात गेले. त्यावेळी ते म्हणाले की मिठाई खोक्यात बांधून द्या. दरम्यान दुकानदार म्हणाला की,”खोक्याचा चार्ज पडेल”. त्यावर पुलं म्हणाले,”अरे वा…म्हणजे मिठाई फुकट?”.
* पुलंच्या ओळखीच्या एक मुलीचे लग्न ठरले. योगायोगाने माहेरचे आणि सासरचे आडनाव एकच होते. हे कळल्यावर पु.लं. म्हणाले “बाकी काही म्हणा, पण मुलीने घराण्याचे नाव राखलं हो”.
* एका समारंभात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पुलंची गाठ पडली. बाबासाहेब बोलण्याच्या ओघात बोलुन गेले. “तुमच्या घरी काय, तुम्ही आणी सुनीताबाई सारखे खो खो हसत असणार”. ह्यावर गंभीरपणे पु.ल. ही त्यांना म्हणाले. “तुमच्या घरी सुद्धा बायको तुमच्यावर तलवरीचे सारखे वार करतेय आणि तुम्ही ते ढाल हाती घेउन चुकवताहात, असंच सारखं चित्र असतं का हो?”
* एका संगीत कार्यक्रमात सुधीर गाडगीळ त्यांची मुलाखात घेत होते. प्रेक्षकांच्या पहिल्या रांगेत बसून पु.लं. ही मुलाखात ऎकत होते. हसत खेळत चाललेल्या त्या मुलाखतीत गाडगीळांनी माणिक वर्मा यांना, त्यांच्या पतीबद्दल प्रश्न विचारला, “तुमची अन, त्यांची पहिली भेट नेमकी कुठं झाली होती?” लग्नाला खुप वर्षे होऊनही माणिक वर्मा या प्रश्नाला उत्तर देताना टाळाटाळ करीत होत्या. ते पाहुन पहिल्या रांगेतील पु.लं. उत्स्फुर्त्पणे मोठ्यानं म्हणाले, “अरे सुधीर, सारखं सारखं त्यांच्या ‘वर्मा’वर नको रे बोट ठेवुस!”
* एकदा पु.लं. ना एक कुकरी सेट गिफ्ट म्हणुन मिळाला. तो सेट सुनिता देशपांडे आपल्या भाचीला दाखवत होत्या. सुनिताबाईंचा ‘सर्व काही जपुन ठेवण्याचा ” स्वभाव माहित असल्यामुळे भाची सुनिताबाईंना म्हणाली ” अगं, एवढा सुदंर सेट फुटु नये या भितीने तु तो कधी वापरणारच नाहीस का?” त्यावर पु.लं. पटकन म्हणाले “हो तर !! सुनीता मला कधी ऑमलेट सुद्धा करुन देत नाही … अंडी फुटतील म्हणुन !!!”
* पु.लं. चा वाढदिवस होता, एका मार्केट यार्डाच्या व्यापारी चाहत्याने त्यांच्या गळ्यात सफरचंदाचा हार घातला. पु.लं. त्या वजनाने थोडे झुकले. हे बघुन व्यापारी म्हणाला “काय राव, काय झाले येवढे”? पु.लं. म्हणाले, “बरे झाले तुम्ही फणसाचे व्यापारी नाही” घरात हशा पिकला होता !
===========
हे देखील वाचा : Nicholas Aujula : ही भयानक भविष्यवाणी खरी झाली तर !
===========
पु.ल. देशपांडे यांना पुरस्कार आणि सन्मान
साहित्य अकादमी पुरस्कार (“व्यक्ती आणि वल्ली”साठी)- १९६५
पद्मश्री- १९६६
संगीत नाटक अकादमी पुरस्कार- १९६७
संगीत नाटक अकादमी फेलोशीप- १९७९
कालीदास सन्मान- १९८७
पद्मभूषण- १९९०
पुण्यभूषण”- १९९२
महाराष्ट्र भूषण पुरस्कार- १९९६
रवींद्र भारती विद्यापीठ(१९७९), पुणे विद्यापीठ(१९८०) आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ(१९९३) कडून मानाची डी. लिट. पदवी
महाराष्ट्र गौरव (बहुरूपी) पुरस्कार