Home » मेड इन चायनामुळे ओझोन थरालाही धोका

मेड इन चायनामुळे ओझोन थरालाही धोका

by Team Gajawaja
0 comment
Space Debris
Share

स्पेस डेब्रिज म्हणजे काय याची आपल्याला माहिती आहे का. स्पेस डेब्रिज म्हणजे अंतराळातील कचरा. हा कचरा फार धोकादायक असतो. पृथ्वीच्या कक्षेतील बंद रॉकेट, त्यांचे तुकडे या सर्वाचा या स्पेस डेब्रिजमध्ये समावेश होतो. अवकाशातील या कच-याचे ढिगाऱ्यांमध्ये विघटन करणे फार अवघड असते. अलिकडेच अवकाशातील या कच-याचे विघटन आणि त्यामुळे भविष्यात होणारा धोका यावर चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र हे सर्व सुरु असतांना चीननं त्यात भर टाकली आहे. आपण चीनच्या कुठल्याही वस्तूची शाश्वती नसल्याची सांगतो. चीनी वस्तू बहुतांशी कामचलाऊ असतात. अगदी थोड्या काळापुरता त्यांचा वापर होतो. पण असेच कामचलाऊ रॉकेट चीननं अवकाशात पाठवलं. या रॉकेटचा वरचा भाग अवकाशात गेल्यावर तुटला आहे. आणि आता या अवशेषाचे बारीक तुकडे सर्वत्र पसरले आहेत. (Space Debris)

ही घटना अत्यंत गंभीर आहे. कारण हे तुकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात झाले आहेत की त्यामुळे चक्क पृथ्वीच्या ओझोन थरालाच धोका निर्माण झाला आहे. ओझोन थर हा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून १५ ते ३५ किलोमीटर उंचीवर असलेल्या स्ट्रॅटोस्फियरमध्ये उच्च ओझोन एकाग्रतेचा प्रदेश आहे. ओझोनचा थर अदृश्य ढाल म्हणून काम करतो आणि सूर्यापासून येणाऱ्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट (UV) किरणांपासून पृथ्वीचे संरक्षण करतो. मात्र चिनी यानाचे तुकडे या ओझोन थराचे नुकसान करीत असल्याचे आढळून आले आहे. याशिवाय स्पेश स्टेशनलाही हे तुकडे केव्हाही बंद पाडू शकतात याची भीती आता शास्त्रज्ञाना त्रस्त करीत आहे. या चीनी रॉकेटच्या तुकड्यांनी पृथ्वीभोवतालच्या ओझेन थराला किंचीतही नुकसान झाले तर पृथ्वीवरची ही कोरोना नंतरची सर्वात मोठी गोष्ट ठरणार आहे. (Space Debris)

चीनला अन्य देशांबरोबर स्पर्धा करायला आवडते. आपणच जगात सर्वोच्च स्थानावर आहे, यासाठी हा देश काहीही करु शकतो. एलॉन मस्क यांच्या स्टारलिंक उपग्रहांबरोबर स्पर्धा करण्यासाठी चीननंही आपली उपग्रह अंतराळात पाठवले आहेत. चीनने ६ ऑगस्ट २०२४ रोजी लाँग मार्च ६A रॉकेटने आपला इंटरनेट उपग्रह प्रक्षेपित केला. चीनने एकाच वेळी १८ उपग्रह प्रक्षेपित केले होते. चीनच्या या उपग्रहाकडे संपूर्ण जगाचे लक्ष होते. आपण एक विक्रम केला असल्याचे चीनी अंतरिक्ष संस्था जाहीर करणार एवढ्यातच या चीनी उपग्रहांची वाईट बातमी आली. कारण जे उपग्रह चीननं अंतराळात पाठवले त्यांचा चक्क कचरा झाला आहे.

==============

हे देखील वाचा : हि-यांचा ग्रह !

===============

कारण उपग्रह अंतराळात गेल्यावर काही क्षणातच या रॉकेटचे तुकडे पृथ्वीच्या खालच्या कक्षेत म्हणजेच लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये पसरले आहेत. या रॉकेटचे सुमारे ३०० तुकडे अतंराळात पसरले आहेत. ही संख्या मोठी असून यामुळे जगभरातील अंतराळ संशोधनामध्ये पुढे असलेल्या सर्वच देशांना धडकी भरवली आहे. कारण चीनच्या या रॉकेट्या तुकड्यांमुळे अनेक देशांच्या उपग्रहांना आणि अंतराळ केंद्रांना धोका निर्माण झाला आहे. हे रॉकेटचे तुकडे एकाच दिशेने अवकाशात एकत्र तरंगत आहेत. त्यातील ५० तुकडे हे अत्यंत धोकादायक कक्षेत आले आहेत. हा रॉकेटचा कचरा ७.५ किलोमीटर प्रतिसेकंद वेगाने पुढे जात आहे. या तुकड्यांचा फक्त उपग्रहांनाच नाही तर ओझोनच्या थरालाही हानी पोहचवू शकतो, अशी भीती आता शास्त्रज्ञांना आहे. चीनच्या या कृतीमुळे जगभरातील शास्त्रज्ञ संतप्त झाले आहेत. यासंदर्भात चीनकडून अधिकृत कुठलिही घोषणा झालेली नसली तरी ओझेन थराचे नुकसान हे समस्त पृथ्वीवासीयांसाठी मोठ्या संकटाची चाहूल ठरणार आहे. (Space Debris)

स्पेस डेब्रिजच्या नियोजनाचे काम अलिकडील वर्षापासून जगभरातील अंतराळ संशोधन उत्सुक देशांनी हाती घेतले आहे. ऑक्टोबर १९५७ मध्ये स्पुतनिक १ या पहिल्या कृत्रिम उपग्रहाच्या प्रक्षेपणानंतर पृथ्वीच्या कक्षेत अवकाशातील ढिगारा जमा होऊ लागला. नंतर जेव्हा अंतराळ संशोधनात वाढ झाली तेव्हा या कच-याचा ढिगच जमा झाल्याचे चित्र निर्माण जाले. १९८० च्या दशकात, नासा आणि इतर यूएस गटांनी ढिगाऱ्यांच्या वाढीला मर्यादा घालण्याचा प्रयत्न केला. नोव्हेंबर २०२२ पर्यंत, यूएस स्पेस सर्व्हिलन्स नेटवर्कने पृथ्वीच्या वरच्या कक्षेत २५८५७ कृत्रिम वस्तू असल्याचे सांगितले आहे. या सर्वांचा धोका उपग्रहांना असल्यामुळे हा कचरा कसा दूर करायचा यासंदर्भात अनेक उपाय सुचवण्यात येत आहेत. त्यात आता चीनी कच-याची भर पडली आहे. (Space Debris)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.