Home » Omicron – या ‘पाच’ गोष्टींचा दररोजच्या जेवणात समावेश करून ओमायक्रॉन व्हेरिएंटवर करा घरच्याघरी मात!

Omicron – या ‘पाच’ गोष्टींचा दररोजच्या जेवणात समावेश करून ओमायक्रॉन व्हेरिएंटवर करा घरच्याघरी मात!

by Correspondent
0 comment
ओमायक्रोन omicron
Share

ओमायक्रॉन (Omicron)

सध्या भारतातील नागरिकांच्या चिंतेत ओमीक्रोन किंवा ओमायक्रॉन (Omicron) नावाच्या नव्या व्हेरिएंटने भर घातली आहे. जगभरात कोरोनाने गेली दोन वर्षे हाहाकार माजवला आहे. अशातच अलीकडे सगळं सुरुळीत होत असतानाचे चित्र पहायला मिळत असतानाच आता ओमायक्रॉन व्हेरिएंटने जगाच्या चिंतेत भर घातली आहे. त्यामुळे प्रत्येक देशाने आपापल्या सुरक्षेत वाढ केली आहे. प्रत्येकजण आपली स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊ लागला आहे.

सध्या प्रत्येकजण शरीराची प्रतिकार शक्ती वाढवू लागला आहे. आज आपण याच पार्श्वभूमीवर कोणते पदार्थ जेवणात खाल्ल्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते, हे पाहणार आहोत.

१) अंडे आणि नॉनव्हेज:- नियमित आहारात मासे, अंडे आणि मांस यांचा समावेश करा. यामुळे शरीर आतून गरम होईल आणि मजबूत होईल. त्यामुळे अंगात हिट तयार झाल्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होईल.

२) व्हिटॅमिन सी युक्त फळे:- रोजच्या आहारात ताजी फळे आणि अनप्रोसेस्ड फूडचा समावेश करा. यातून फायबर, प्रोटीन, मिनरल्स, व्हिटॅमिन, अँटीऑक्सिडेंट मिळाल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

३) डाळी आणि नट्स:- पूर्वीपासूनच आपण आपल्या आहारात डाळींचा समावेश करत आहोत कारण आपण सर्वांना डाळ ही आरोग्यास फायदेशीर असते हे माहीतच आहे. पण जर आपण आहारात भाज्या, बीन्ससारख्या शेंगा, अनप्रोसेस्ड मका, बाजरी, गहू, ओट्स, बटाटा, मुळा, बीटचा समावेश करायला हवा. तसेच डाळी, बदाम, अक्रोड यांचेही सेवन करायला हवे.

हे ही वाचा: तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण पेरू खाण्याचे ‘एवढे’ आहेत फायदे!

४) खोबरेल तेल किंवा नारळपाणी:- नारळपाणी आपल्या आरोग्यास नेहमीच रोगप्रतिकार शक्ती वाढण्याचे काम करते. पण दिवसाची सुरूवात ऑर्गेनिक खोबरेल तेलाने ऑईल पुलिंग करून करा. तसेच नारळपाणी प्या आणि जेवणात खोबरेल तेल वापरण्याचा प्रयत्न करा. अँटीवायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुण असलेले खोबरेल तेल आणि नारळपाणी याचा वापर केल्यास ते रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करते.

५) ग्रीन टी आणि तुळशीचे सेवन:- आहारात मोरिंगा, तुळस, स्पायरुलिना, लिंबू, ग्रीन टी इत्यादीचा समावेश करा. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. परिणामी कोरोना. ओमायक्रॉन (Omicron) आणि हंगामी आजार दूर राहतील.

-निवास उद्धव गायकवाड

इतर लेख: तुम्हालाही पोटाची चरबी कमी करायची असेल तर वापरा ‘या’ सोप्प्या टिप्स; चार नंबरची टीप तर आहे खूपच सोप्पी.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.