Home » जून महिन्यात प्रदर्शित होणार ‘या’ धमाकेदार वेब सीरिज

जून महिन्यात प्रदर्शित होणार ‘या’ धमाकेदार वेब सीरिज

जून महिन्याची सुरुवात झाली असून ओटीटी प्लॅटफॉर्मवर एकापेक्षा एक धमाकेदार सीरिज प्रदर्शित होणार आहेत. याचीच लिस्ट आपण पाहणार आहोत.

by Team Gajawaja
0 comment
OTT Platform Web Series
Share

OTT Platform Web Series: मे महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही वेब सीरिज प्रदर्शित झाल्या. पण बहुप्रतिक्षित अशा काही वेब सीरिज जून महिन्यात प्रदर्शित होणार आहेत. जाणून घेऊया यंदाच्या महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या वेब सीरिजची लिस्ट सविस्तर….

द लीजेंड ऑफ हनुमान सीझन 4
द लीजेंड ऑफ हनुमान सीझन 4 सीरिज येत्या 5 जूनला डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. ही एक अॅनिमिटेड वेब सीरिज आहे. याचा गेल्या काही दिवसांपूर्वी ट्रेलर लाँच करण्यात आला होता. तो पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये सीरिजची उत्सुकता अधिक वाढली होती.

स्वीट टूथ सीझन 3
स्वीट टू सीझनचा तिसरा सीझन लवकरच लाँच होणार आहे. ही सीरिज नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे. या सीरिजच्या कथेत एका जगात व्हायरसमुळे नागरिकांचा मृत्यू होत असल्याचे दाखवले आहे. यामुळे अर्ध्याहून अधिक लोकसंख्या कमी झाल्याचे दिसते. याशिवाय एका लहान मुलाचे शरिर हरणाचे असून उर्वरित शरिर व्यक्तीचे आहे.

गुल्लक सीझन 4
गुल्लकचे आधी तीन सीझन प्रदर्शित झाले आहेत. अशातच चौथ्या सीझनची प्रेक्षकांकडून वाट पाहिली जात आहे. दोन वर्षानंतर गुल्लक सीरिज येत्या 7 जूनला प्रदर्शित होणार आहे. सीरिजची कथा एका सामान्य परिवारावर आधारित आहे.

हाउस ऑफ ड्रॅगन 2
गेल्या काही दिवसांपूर्वीच हाउस ऑफ ड्रॅगन 2 चा अधिकृत ट्रेलर जिओ सिनेमावर प्रदर्शित करण्यात आला होता. यामध्ये आठ एपिसोड असणार आहेत. सीरिज इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड, बंगाली आणि मराठी भाषामध्ये पाहता येणार आहे. (OTT Platform Web Series)

कोटा फॅक्ट्री सीझन 3
पंचायतमधील सचिव म्हणजेच जितेंद्र कुमार याची वेब सीरिज कोटा फॅक्ट्रीचा सीझन तिसरा याच महिन्यात प्रदर्शित होणार आहे. हा सीझन प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे. कोटा फॅक्ट्री सीझन तिसरा येत्या 20 जूनला प्रदर्शित होणार आहे.


आणखी वाचा :
अनन्या पांडेसोबतच्या ब्रेकअपवर पहिल्यांदाच बोलला आदित्य रॉय कपूर, म्हणाला…
‘मसान’ सह विक्की कौशलचे हे सिनेमे तुम्ही पाहिलेयत का?

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.