Home » Osman Hadi : ग्रेटर बांगलादेश आणि हादीची हत्या

Osman Hadi : ग्रेटर बांगलादेश आणि हादीची हत्या

by Team Gajawaja
0 comment
Osman Hadi
Share

आपल्या शेजारचा बांगलादेश पुन्हा एकदा पेटला आहे. याला निमित्त झाले आहे ते युवानेता शरीफ उस्मान हादी याची झालेली हत्या. हादी हा बांगलादेशचा तरुण नेता होता, त्याच्या भाषण शैलीममुळे लाखो तरुणांच्या गळ्यातील तो ताईत झाला होता. याच हादीनं त्याच्या एका सभेमध्ये ‘ग्रेटर बांगलादेश’ चा नकाशा दाखवला होता. त्यामुळेच त्याची हत्या झाल्याची चर्चा सुरु झाली आणि यातूनच पुन्हा बांगलादेश पेटला, सोबतच तिथे हिंदूविरोधात हिसंक आंदलन सुरु झाले. त्यामुळेच हे ‘ग्रेटर बांगलादेश’ म्हणजे काय याचीही चर्चा आहे. ( Osman Hadi ) 

Osman Hadi

बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसाचारात सुरु झाला आहे. निवडणूक प्रचारादरम्यान गुरुवारी रात्री तरुण नेते शरीफ उस्मान हादी यांच्यावर गोळीबार झाला. यात हादी हा गंभीर जखमी झाल्यानं त्याला अधिक उपचारासाठी सिंगापूरला नेण्यात आले. सिंगापूरच्या रुग्णालयात उपचार घेत असताना हादी याचे निधन झाले. ही बातमी बांगलादेशमध्ये समजताच सर्वत्र पुन्हा दंगलीसारखा हिंसाचार सुरु झाला आहे. हादी यांच्या मृत्यूनंतर सुरु झालेल्या या हिंचाचारात भारतविरोधात घोषणा देण्यात येत आहेत. तसेच हादी यांची हत्या ही भारतानंच घडवून आणल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याला कारण ठरला आहे, हादी यांनी एका सभेत दाखवलेला ग्रेटर बांगलादेशचा नकासा. यापूर्वी २०२४ मध्ये शेख हसीना सरकारविरुद्ध झालेल्या बंडाचे नेतृत्व करणाऱ्या विद्यार्थी नेत्यांनीही अशाच प्रकारे ग्रेटर बांगलादेशचे नकाशे वाटले होते. हा ग्रेटर बांगलादेश म्हणजे काय आणि ही कल्पना कुठून आली हे आधी जाणून घेतले पाहिजे. ग्रेट बांगलादेश ही वादग्रस्त संकल्पना आहे. कारण यामध्ये भारताच्या बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि संपूर्ण ईशान्य भारतातील पूर्व आणि ईशान्य भारतातील मोठा भाग आणि म्यानमारचे अरकान राज्य हे तथाकथित ग्रेटर बांगलादेशचा भाग म्हणून दर्शविले जाते. बांगलादेशमध्ये अनेक नेते सध्या याच ग्रेटर बांगलादेशचे समर्थन करीत आहेत. ( Osman Hadi ) 

ग्रेटर बांगलादेश ही संकल्पना १९७१ च्या बांगलादेश मुक्ती युद्धाच्या आणि सांस्कृतिक-ऐतिहासिक बंगाल सल्तनतच्या संदर्भात आहे. काही गटांनी हा एक वादग्रस्त आणि राष्ट्रवादी विचार मांडला आहे. ढाका येथील काही इस्लामिक गट आणि “सुलतानत-ए-बांगला” आणि “तुर्की युथ फेडरेशन” सारख्या संस्थांनी या ग्रेटर बांगलादेश संकल्पनेला खतपाणी घातले. परिणामी आता बांगलादेशमधील युवा नेते या ग्रेटर बांगलादेश या संकल्पनेला सत्यात उतरवायचे आहे, असा वादग्रस्त दावा करीत आहेत. ग्रेटर बांगलादेश ही एक फूट पाडणारी कल्पना आहे यामुळेच भारतातूनही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. बांगलादेशातील ‘सल्तनत-ए-बांगला’ ही संघटना ग्रेटर बांगलादेशला पाठिंबा देत आहे. हा एक इस्लामिक गट आहे. या संघटनेने जाहीरपणे १४ एप्रिल रोजी ढाका विद्यापीठात ग्रेटर बांगलादेशचा नकाशा प्रदर्शित केला होता. मात्र युनूस सरकारनं यासंदर्भात कुठलिही कारवाई केली नाही. त्यामुळे सध्याच्या बांदलादेश सरकारचा या ग्रेटर बांगलादेशला पाठिंबा असल्याचीही चर्चा आहे.

=======

हे देखील वाचा : Bangladesh : भारतही त्या भीतीच्या छायेखाली !

=======

२०१८ मध्ये, रब्बीर हुसेन भुईयान यांनी प्रथम ‘ग्रेटर बांगलादेश’ नकाशा तयार केला. २०२४ मध्ये हसीना सरकारविरोधात झालेल्या उठावातही याच ग्रेटर बांगलादेशचे नकाशे दाखवण्यात आले होते. ज्या शरीफ उस्मान हादीच्या हत्येनंतर बांगलादेश आता पेटला आहे, हा हादी २०२४ च्या विद्यार्थी उठावादरम्यान प्रसिद्धीला आला. यावेळी हादी याने जी भाषणे दिली होती, त्यामुळे हिंसाचार अधिक उफाळून आल्याचा ठपका ठेवण्यात आला होता, पण हादीवर कोणतीही पोलिसी कारवाई झाली नव्हती. आता हाच हादी गोळीबारात ठार झाला असून त्याच्या हत्येनंतर बांगलादेशमध्ये सुरु असलेला हिंसाचार थांबायचे नाव घेत नाही. हादीनं भारतातील प्रदेश ग्रेटर बांगलादेशच्या नकाशाला जोडले, याचा राग ठेऊन भारतानंच हादीला मारल्याचा संशय तेथील तरुण वर्ग करीत आहे. वास्तवात शरीफ उस्मान हादी याच्या भाषणामध्ये अनेकवेळा भारतविरोधी भावना होती. बांगलादेशमधील हिंदूच्या विरोधात झालेल्या हिंसाचारही त्याच्याच इशा-यावरुन झाल्याचा आरोप आहे. पुढील वर्षी १२ फेब्रुवारी रोजी बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांपूर्वी, बांगलादेश पुन्हा एकदा अस्थिर करण्यासाठीच हादी याची हत्या करण्यात आल्याची चर्चा आहे. बांगलादेशमध्ये मुहम्मद युनूस सरकार सध्या पाकिस्तानच्या सोबत चालत आहे.  त्यामुळे युनूस यांची सत्ता कायम ठेवण्यासाठी पाकिस्ताननेच हादी याला गोळ्या घातल्याचा संशय आहे. ( Osman Hadi ) 

सई बने…


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.