Home » ओशो फक्त सेक्स वरच बोलले का ?

ओशो फक्त सेक्स वरच बोलले का ?

by Team Gajawaja
0 comment
Osho Rajneesh
Share

ओशो रजनीश जितक प्रभावशाली तितकच वादग्रस्त व्यक्तिमत्त्व ! प्रभावशाली का, कारण २१ व्या शतकात त्यांच्याइतके क्रांतिकारी विचार मांडणारा एकही तत्वज्ञ झाला नाही. आणि वादग्रस्त का ? कारण त्यांनी सेक्सवर मांडलेले विचार आणि त्यांच्या अमेरिकेतल्या कम्युनवर झालेले आरोप आणि त्यांना झालेली अटक ! पण प्रश्न असा आहे की, इतका मोठा फिलोसॉफर, तार्किक व्यक्ती फक्त सेक्स वरच बोलला होता का ? आणि सेक्सवर त्यांनी असं काय म्हटलं होत, ज्यामुळे त्यांचे इतके विरोधक निर्माण झाले. पहायला गेलं हिंदू धर्मात त्यांचे बरेच विरोधक आहेत. पण हिंदू धर्मासाठी त्यांनी जितकं मोठ योगदान दिल आहे, तसं योगदान गेल्या काही वर्षात स्वत: धर्माचा प्रचार करणाऱ्या बाबा आणि पंडितांनाही देता आलं नाही. (Osho Rajneesh)

आधी Philosophy चे प्रोफेसर आणि नंतर थेट जगातल्या सर्वश्रेष्ठ Philosophers पैकी एक असा ओशोंचा प्रवास ! त्यांच्या विचारांमुळेच जगभरातली लोक खासकरून वेस्टर्न लोकं त्यांच्याशी जोडली गेली. आपल्या पुण्यातूनच ओशोंनी प्रवचन द्यायला सुरुवात केली. त्यांनी धार्मिक थोतांड, अंधश्रद्धा, जागतिक राजकारण यावर निर्भीडपणे आपले विचार मांडले. धर्मगुरुं, पंडित, मौलविंपासून पोपपर्यंत धर्माच्या ठेकेदारांना खुल्या चर्चेचं त्यांनी आव्हानं दिल होत. यामुळे जगभरातले राजकारणी आणि धर्मगुरु त्यांच्या विरोधातच होते. ९० देशांमध्ये त्यांच्यावर बंदी घालण्यात होती. पण त्यांची सर्वात जास्त बदनामी करण्यात आली सेक्स या विषयावरून. (Social News)

60 च्या दशकात जिथे सेक्स हा विषय कोणी बाहेर बोलूसुद्धा शकत नव्हत, त्याकाळात ओशोंनी सेक्सवर एक धडधडीत ‘संभोग से समाधी की ओर’ या विषयाचं प्रवचन दिल. संपूर्ण देशात त्यावेळी खळबळ उडाली होती. ज्यामुळे त्यांच्यावर एक Tag लागला तो म्हणजे ‘सेक्स गुरु’ ! आता पहिलं ओशोंच्या दृष्टीकोनातून सेक्स म्हणजे काय हे समजून घेऊया. ओशोंनी सेक्स विषयी अध्यात्मिक,तात्विक आणि मौलिक मांडणी केली होती. सेक्स ही केवळ शारीरिक क्रिया नसून तो ध्यानधारणेचा एक मार्ग आहे, असं ते म्हणायचे. आता ध्यानधारणा म्हणजे काय ? तर ज्या अवस्थेत आपला मेंदू आणि मन शून्यावस्थेत असतो, त्यावर विकार आणि विचारांचा प्रभाव उरत नाही, फक्त वर्तमानातला तेवढा एक सेक्सचा क्षण, तो सर्वोच्च सुखाचा क्षण आपण जगतो, त्या अवस्थेला ओशोंनी ध्यानधारणेची अवस्था सांगितलं आहे. त्या अवस्थेचं वर्णन ओशोंनी ‘डिव्हाइन एनर्जी’ म्हणजे अलौकिक शक्ती असंही केलं आहे. या शून्य क्षणाची ज्या माणसाला सर्वार्थाने जाणीव होते, तो समाधीवस्था प्राप्त होऊ शकतो. म्हणूनच त्यांच्या प्रवचनाचं शीर्षक ‘संभोग से समाधी की ओर’ असं होत. (Osho Rajneesh)

भारताला ‘Sex’ या गोष्टीचं प्रचंड विकृत आकर्षण आहे. त्यामुळेच कदाचित आपण आज जगातला सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहोत. भारतात सेक्स करण्यात धन्यता मानणारी लोकं सेक्स समजून घेण्यात नाक मुरडतात आणि ही सर्वात गंभीर बाब आहे, आणि याच परस्परविरोधी विचारसरणीला तडा देण्याचं काम आणि सेक्सला एक वेगळ्या स्वरूपात सांगण्याचं काम ओशोंनी केलं. आपल्या देशात आजही बलात्काराचे गुन्हे घडतात. याचं प्रमुख कारण म्हणजे सेक्स ही गोष्ट नेमकी काय आहे, हेच आपल्या समाजाने समजून घेतलेलं नाही. यासाठीच सध्या शाळेत लैंगिक शिक्षणाचे धडे दिले जातात. अगदीच लहान वयातील मुला-मुलींना गुड टच bad टच शिकवलं जात. हेच ओशोंनी अध्यात्मिक आणि तात्विक रुपात आपल्या प्रवचनात मांडल होत. पण त्याचा मर्म लोकांनी समजून घेतला नाही आणि थेट ओशोंना सेक्स गुरु जाहीर करून टाकलं. ओशोंनी कामवासना ग्लोरीफाय केली असं काहींचं म्हणण होत. पण जी गोष्ट नैसर्गिक आहे, ज्यामुळे आत्म्याला, मनाला शांती मिळते, ज्या गोष्टीमुळे एक जीव जन्माला येतो, ती गोष्ट ग्लोरिफाय कोण करू शकत, हा मोठा प्रश्न आहे.
ओशो एका ठिकाणी म्हणाले होते, (Social News)

The people who call me ‘sex guru’ are obsessed with sex. I have not talked about sex more than I have talked about meditation, love, God, prayer, philosophy but nobody seems to be interested in God, love, meditation, prayer, philosophy . If I say anything about sex, immediately they jump upon it.

मराठीचे प्रसिद्ध विचारवंत आणि लेखक शिवाजीराव भोसले ह्यांनी एकदा म्हटलं होतं की, केवळ ‘संभोग से समाधी की ओर’ ह्या प्रवचनांसाठी ओशो नोबेल पारितोषिक मिळवण्यास पात्र आहेत. आता वरती सांगितल्या प्रमाणे ओशो यांचं हिंदू धर्मासाठी काय योगदान आहे हे जाणून घेऊया. आजचा काळ हा पाखंडी बाबांच्या उत्कर्षाचा काळ आहे. भारतात इतके बाबा, गुरु, सद्गुरू झाले आहेत की ज्यांची गणती नाही आणि त्यांचे असंख्य भक्त जे रोज त्यांच्या दरबारात हजर असतात. हे बाबा त्यांना रामकथा, कृष्णकथा किंवा इतर कथा ऐकवतात, नंतर काहीतरी जादू करून त्यांची मनं जिंकतात. पण यामध्ये त्यांनी धर्मासाठी नेमकं काय केलं असा प्रश्न पडतो. गीता सांगतात पण गीतेचा सार, गीतेचा मर्म कोणीही सांगत नाही. पण ओशो यांच्या विपरीत होते. ते धर्मसंस्था मानत नव्हते. पण हिंदू धर्माचे असं साहित्य त्यांनी वर आणलं, जे या बाबा आणि गुरूंनी आपल्याला कधीच सांगितलं नाही. सर्वप्रथम आपल्या’ गीता दर्शन’ या प्रवचनांच्या माध्यमातून त्यांनी गीतेचा सार लोकांना सांगितला. पतंजली योग सूत्रचं महत्त्व त्यांनी लोकांपर्यंत आणि आपल्या शिष्यापर्यंत पोहोचवलं. ध्यान करण्याचे कित्येक नवीन प्रकार तयार केले. भारतात एक ऋषी अष्टावक्र होऊन गेले आहेत, जे आज अनेकांना माहित नाहीत. त्यांनी सांगितलेली गीता ओशोंनी ‘अष्टावक्र महागीता’ या स्वरूपात लोकांना सांगितली. ‘विज्ञान भैरव तंत्र’ सारखा महत्त्वपूर्ण ग्रंथ जो जवळपास भारताच्या साहित्य संस्कृतीतून नष्ट होणार होता, तो ओशोंनी बाहेर काढला आणि जगाला सांगितला. (Osho Rajneesh)

========

हे देखील वाचा : अरे देवा ! ही भ्रष्टाचाराची परिसीमा

========

शिव सूत्रमध्ये भगवान शंकराचं मूळ स्वरूप ओशोंनी मांडल. कृष्ण स्मृती, ‘कृष्ण – द Man And his Philosophy’ हे ओशोंचं पुस्तक त्यांनी भगवान कृष्ण यांच्यावर केलेल्या प्रवचनांवर आधारित आहे. कृष्ण एका वेगळ्या दृष्टीकोनातून ओशोंनी जगाला सांगितला. ते उपनिषद आणि वेदांवरही बोलले. सर्वात महत्त्वाच म्हणजे अमेरिकेत जाऊन एक शहर उभारून त्यांना रजनीशपुरम हे भारतीय नाव देण, ही साधी गोष्ट नाही. इतकं सगळं आजच्या पाखंडी बाबांना कदाचित माहितही नसावं. ओशोंनी हजारो प्रवचन दिली आणि त्यातून शेकडो पुस्तके निर्माण झाली. कृष्ण, जीसस, नानक, भगवान बुद्ध, कबीर, महावीर, लाओ त्सू, मीराबाई अशा असंख्य ज्ञानी पुरुषांविषयी व स्त्रियांविषयी ओशोंनी अतिशय सुंदररित्या सांगितलं आहे. महत्त्वाचं काय की, जो मनुष्य जगभरातल्या विषयांवर बोलतो, जो जन्मावर बोलतो, मृत्यूवर बोलतो, जो आयुष्यावर बोलतो, तो साहजिकच सेक्सवरही बोलणार. पण राज्यकर्त्यांना हे विचार मान्य होणार नाहीत. कारण असे विचार अंमलात आणायचे म्हणजे धर्मसंस्था, समाजसंस्था पार ढवळून निघतील. त्यामुळे ओशो किंवा त्यांच्यासारखे जितके तत्वज्ञ झाले आहेत, हे सोसायटीला पटत आणि पचत नाहीत. (Social News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.