आपल्या देशात महर्षि दधिची होते, ज्यांनी देवतांच्या कल्याणासाठी ना केवळ आपल्या देहाचा त्याग केला तर या देहाचा वापर करण्याची सुद्धा परवानगी दिली होती. मृत्यूनंतर देवतानी त्यांच्या अस्थिपासून वज्र तयार केले आणि त्यामुळे असुरांचा संहार करु शकतात. खरंतर मृत्यूनंतर आपल्या शरिरातील अवयवांमुळे बहुतांश लोकांचे कल्याण होऊ शकते. अशातच अवयवदान हे महादान असल्याचे म्हटले जाते. आपल्या काही प्रमुख नेत्यांनी सुद्धा आपल्या निधनानंतर आपले शरिर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात दान केले होते. ज्यामुळे केवळ गरजवंतांना त्यांचे अवयवच नव्हे तर मेडिकल सर्च मध्ये उपयोगी पडू शकतात. (Organ Donation)
या नेत्यांमध्ये बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योति बसू, माजी लोकसभा स्पीकर सोमनाथ चटर्जी, जन संघाचे नानाजी देशमुख यांनी आपल्या मृत्यूनंतर आपला मृतदेह मेडिकल रुग्णालयाला सोपवला होता. मरण्यापूर्वी त्यांची अशा प्रकारची व्यवस्था केली होती की, त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी परिवारातील लोकांनी ती दान करावी. तसेच डोळे सुद्धा दान केले.
अमिताभ बच्चन ते गंभीर पर्यंतची मंडळी करणार अवयवदान
या व्यतिरिक्त देशातील काही प्रसिद्ध व्यक्ती आपल्या मृत्यूनंतर आपला मृतदेह दान देण्याचे शपथ पत्र सुद्धा भरले आहे. ज्यामध्ये प्रियंका चोपडा, अमिताभ बच्चन, जया बच्चन, नवजोत सिंह सिद्धू, आमिर खान, ऐश्वर्या राय बच्चन, सुनील शेट्टी, किरण शॉ मजुमदार, सलमान खान, नंदिता दास आणि गौतम गंभीर यांचा सुद्धा समावेश आहे.
ज्योति बसु यांनी काय केले होते
ज्योति बसु यांचे निधन जानेवारी २०१० मध्ये आजारपणामुळे कोलकाता येथे झाले होते. त्यांच्या शरिरातील अवयवांनी काम करण्यास बंद केले होते. १७ जानेवारी २०१० मध्ये त्यांना मृत घोषित करण्यात आले होते. जेव्हा त्यांच्या पार्थिव शरिराची अंतयात्रा काढली तेव्हा कोलकातामधील रस्त्यांवर खुप गर्दी झाली होती. २४ वर्षापर्यंत बंगालचे मुख्यमंत्री राहिलेले बसु यांचे शव भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे मुख्यालयात सुद्धा दर्शनासाठी ठेवले होते.
त्यांनी निधनापूर्वी एका शपथपत्रावर स्वाक्षरी केली होती. त्यामध्ये त्यांचे पार्थिव शरीर मेडिकल रिसर्चसाठी एसएसकेएम रुग्णालय कोलकाता यांना दिले जाईल आणि तर डोळे सुश्रुत आय फाउंडेशन यांना दान दिले होते. रुग्णालयात त्यांचा मेंदू आतासुद्धा सांभाळून ठेवण्यात आला आहे. मृत्यूच्या वेळी बसु हे ९६ वर्षाचे होते. (Organ Donation)
हे देखील वाचा- ९० वर्षाच्या वृद्धाने १५०० फूटावरुन मारली उडी, कारण ऐकून व्हाल हैराण
नानाजी देशमुख यांचे पार्थिव शरिर एम्स रुग्णालयाला दिले
समाजसेवी आणि राजकिय नेते चंदिकादास अमृतराव देशमुख म्हणजेच नानाजी देशमुख यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ते भारतीय जनसंघाचे नेते होते आणि राज्यसभेचे सदस्य होते. त्यांना देशातील सर्वोच्च सम्मान भारत रत्नने गौरवण्यात आले होते. त्यांचे निधन २७ फेब्रुवारी २०१० मध्ये चित्रकूट ग्रामोदय युनिव्हर्सिटीच्या परिसरात झाले, ज्याची त्यांनीच स्थापना केली होती. वृ्द्धापकाळात त्यांना काही गंभीर आजारांनी पछाडले होते. त्यांच्या निधनानंतर आपले शरिर नवी दिल्लीतील एनजीओ दधिची देहदान संस्थेला दिला होता. त्यानंतर ते रिसर्चसाठी एम्सला दिले गेले.
साहित्यकार शेखर जोशी
नुकतेच दिवंगत झालेले साहित्यकार शेखर जोशी यांनी आपल्या मृत्यूपूर्वी आपले शरिर गरजवतांच्या मदतीसाठी आणि रिसर्चसाठी द्यावे असे म्हटले होते. ९० वर्षीय शेखर जोशी यांच्या निधनानंतर गाजियाबाद मधील एका रुग्णालयाला याच महिन्यातील सुरुवातीला त्यांच्या इच्छानुसार ग्रेटर नोएडातील शारदा मेडिकल युनिव्हर्सिटीला दिले गेले.