डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतली आणि काही क्षणातच ऑर्डर टू डिपोर्ट लागू केली आहे. म्हणजेच अमेरिकेतील बेकायदेशीर स्थलांतरितांना अटक करुन त्यांना त्यांच्या देशात परत पाठवायला सुरुवात केली आहे. अमेरिकेच्या इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट विभागानं पहिल्याच दिवशी 538 बेकायदेशीर स्थलांतरितांना अटक करुन त्यांची लष्करी विमानानं रवानागीही केली आहे. यातील बहुतांश हे धोकादायक गुन्हेगार होते. त्यांच्यावर खून, मारामारी, बलात्कार अशा गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान बेकायदेशीर स्थलांतरावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. यानुसार त्यांनी आपल्या कारवाईला सुरुवात केली आहे. राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यावर त्यांनी लगेच अमेरिकेत प्रवेशाचे नियम बदलण्याचे अनेक आदेश जारी केले आहेत. (Donald Trump)
याबरोबरच दक्षिणेकडील सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करुन या भागात अधिक सैन्य तैनात केले आहे. अमेरिकेत बेकायदेशीर स्थलांतरितांची मोठी संख्या आहे. या स्थलांतरिकांमध्ये अनेक गुन्हेगार असल्याचा कायम आरोप ट्रम्प यांनी केला आहे. यामुळे अमेरिकेतील कायदा सुरक्षेला धोका असल्याचेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले आहे. आता ट्रम्प यांनी याच बेकायदेशीरपणे रहाणा-या स्थलांतरितांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यापासून ही कारवाई करण्यात येत आहे. सध्या जेवढ्या स्थलांतरिताना अटक करुन लष्करी विमानातून पाठवण्यात आले आहे. यासोबत 373 जणांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती आहे. त्यांच्यावर बलात्कार, खून आणि अपहरणाचे आरोप आहेत. याशिवाय यात एक संशयित दहशतवादी आहे तर ट्रेन डी अरागुआ टोळीचे चार सदस्यही आहेत. या अटक झालेल्यांना लष्करी विमानातून नेमकं कुठे हद्दपार करण्यात आले आहे, याची अद्याप माहिती नाही. एकाही गुन्हेगाराला त्यांच्या देशात येऊ देऊ इच्छित नसल्याचे ट्रम्प यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले होते. त्यानुसारच अमेरिकेतील बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध सिनेटने विधेयक मंजूर करण्यात आले आहे. हे विधेयक 64-35 मतांनी मंजूर झाले. (International News)
या विधेयकाला ‘लेकन रिले अॅक्ट’ असे नाव देण्यात आले आहे. या कायद्याचे नाव जॉर्जियातील 22 वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनी रिले हिच्या नावावर ठेवण्यात आले आहे. 22 फेब्रुवारी 2024 रोजी व्हेनेझुएलातील एका बेकायदेशीर स्थलांतरिताने लाक्वान रिलेची ती कॉलेज कॅम्पसमध्ये जॉगिंग करत असतांना हत्या केली होती. तेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली होती. आता यासंदर्भात कायदाच करण्यात आला आहे. या कायद्यानुसार, दुकानांमधून वस्तू चोरल्याचा, एखाद्याला जखमी केल्याचा किंवा एखाद्याला मारल्याचा आरोप असलेल्या स्थलांतरितांना पोलिसांना ताब्यात घेतील. आणि त्या स्थलांतरिताला त्याच्या देशात पाठवण्यात येईल. हा कारवाई सुरु केल्यावर यासंदर्भात माहिती देतांना व्हाईट हाऊसनं ही एक छोटीशी झलक असल्याचे सूचक वक्तव्य केल्यानं अमेरिकेतील स्थलांतरितातंमध्ये खळबळ उडाली आहे. याशिवाय ट्रम्प यांनी जो बिडन यांच्या कार्यकालात अमेरिकेत आलेल्या सर्वच स्थलांतरितांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याचेही आदेश दिले आहेत. अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणारे अनेक परदेशी लोक राष्ट्रीय आणि सार्वजनिक सुरक्षेसाठी गंभीर धोका निर्माण करतात. बरेच जण निष्पाप अमेरिकन लोकांविरुद्ध घृणास्पद कृत्ये करतात. (Donald Trump)
================
हे देखील वाचा : Prayagraj : मस्क्युलर बाबा आणि एमटेक बाबा
Donald Trump : पुतिनच्या वाटेवर ट्रम्प !
===============
याचील बरेच जण हेरगिरी आणि दहशतवादाशी संबंधित करवाया करतात. हे सर्वजण अमेरिकेच्या सुरक्षतेसाठी धोकायक असून त्यांना त्वरित अटक करण्यात यावी असे, आदेशात नमूद करण्यात आले आहे. यासोबत ट्रम्प यांनी संबंधित अधिका-यांना कुठल्या देशातील नागरिक अधिक गुन्हेगारीमध्ये आहेत, याची यादीही करण्यास सांगितले आहे. ट्रम्प यांनी आपल्या आदेशात अमेरिकन नागरिकांनाही आवाहन केले आहे. आपल्या आसपास अन्य देशातील संशयित असतील तर त्यांनी त्वरित पोलीसांबरोबर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. तसेच अमेरिकेत आलेल्या परदेशींनी येथील मुळ संस्कृतीचा मान ठेवावा, अमेरिकन संस्कृतीवर कोणी टिका केली तर त्यांच्यावरही कारवाई होईल, असेही ट्रम्प यांच्या आदेशात नमुद करण्यात आले आहे. या कामात ट्रम्प यांनी आपल्या सैन्याचीही मदत घेतली आहे. पुढचे काही महिने ही मोहीम चालणार आहे. (International News)
सई बने