भारताने ७ मे च्या रात्री पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. हवाई दलाने याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव दिले आहे. हवाई दलाच्या दसॉल्ट राफेल विमानांनी SCALP-EG क्षेपणास्त्राच्या मदतीने या लक्ष्यांना लक्ष्य केले आहे. भारतीय लष्कराने मिसाईल स्ट्राईक करून पाकिस्तानसह दहशतवाद्यांना दणाणून सोडले आहे. साखरझोपेमधे असताना भारताने ही मोठी कारवाई केली. पहलगाम हल्ल्याच्या १६ दिवसानंतर भारताने या हल्ल्याचा बदला घेतला. (Rafale)
पाकिस्तानविरोधात जी कारवाई करण्यात आली, यात भारतीय लष्कराने पाकिस्तानातील ९ ठिकाणी मिसाईल अटॅक केला. या हल्ल्यासाठी ७ मे २०२५ रोजी रात्री १२:३७ ही वेळ निश्चित करण्यात आली होती. बहावलपूर, चक आमरू, भिंबेर, मुरीदके, मुझफ्फराबाद, कोटली, सियालकोट, गुलपूर आणि बाग या ठिकाणी हे हल्ले करण्यात आले. येथे जैश-ए-मोहम्मदचे लाँच पॅड होते. ही तीच ठिकाणे आहेत जिथून भारतावर दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन आणि अंमलबजावणी केली जात होती.(Rafale Feature)
या ऑपरेशन सिंदूरमध्ये (Operation Sindoor) मोठी भूमिका वाजवली ती भारतीय वायुसेनेच्या राफेल विमानांनी. या विमानांनी शत्रूंच्या ठिकाणांवर अचूक मारा करत आपले काम चोख पार पाडले. या विमानांच्या जोरावरच भारताने एवढे मोठे यश संपादन करत शत्रूचा खात्मा केला. भारतीय वायुसेनेने हल्ला करण्यासाठी राफेल लढाऊ विमानांचा वापर केला. या विमानांनी SCALP क्रूझ क्षेपणास्त्रे आणि हॅमर बॉम्बने आतंकवाद्यांचे अड्डे जमीनदोस्त केले. हा हल्ला भारतीय हवाई क्षेत्रातूनच करण्यात आला. (Operation Sindoor News)
राफेल विमानं म्हणजे आपल्या वायुदलाची शान आहेत. आपल्या वायुदलाला पर्यायाने संरक्षक दलाला या विमानांमुळे अधिक बळकटी आली आहे. याच राफेल विमानांनी पहलगाममध्ये मृत पावलेल्या आपल्या भारतीय नागरिकांना न्याय मिळवून दिला आहे. सप्टेंबर २०१६ मध्ये भारतीय हवाई दलाच्या लढाऊ क्षमतांना बळकट करण्यासाठी भारताने फ्रान्सबरोबर ३६ राफेल विमाने ५९,००० कोटींना खरेदी करण्याचा करार केला होता. ज्या राफेल विमानांमुळे आपण एवढी अत्युच्च कामगिरी संपन्न केली त्या विमानांची वैशिष्ट्ये कोणती जाणून घेऊया. (Top Marathi News)
=======
हे देखील वाचा : Mock Drill : देशात होणाऱ्या मॉक ड्रिलची इत्यंभूत माहिती
=======
राफेल विमानाची वैशिष्ट्ये
* राफेल लढाऊ विमानाला ‘सुपरस्टार ऑफ द स्काय’ म्हटलं जातं. कारण इतर लढाऊ विमानांच्या तुलनेत राफेल अधिक शक्तीशाली आहे.
* राफेल लढाऊ विमानांमध्ये एसएनईसीएमए मधील २ एम८८-२ इंजिने आहेत. प्रत्येक इंजिन हे ७५ केएन थ्रस्टचे आहे. राफेल असं लढाऊ विमान आहे, जे प्रत्येक मोहीमेवर पाठवलं जाऊ शकतं.
* राफेल लढाऊ विमाने ही हवेत इंधन भरू शकतात. ही विमाने एकमेकांना इंधने भरण्यास मदत करू शकतात. हे विमान एका मिनिटात ६० हजार फूट उंचीपर्यंत जाऊ शकतं. याची इंधन क्षमता १७ हजार किलो आहे. (Marathi Trending News)
* राफेल विमान हरतऱ्हेच्या हवामानात एकाच वेळी अनेक कामं करण्यास सक्षम आहे. त्यामुळे ते मल्टिरोल फायटर एअरक्राफ्ट म्हणूनही ओळखलं जातं.
* दृष्टिपथात नसलेल्या लक्ष्याचा भेद करण्यासाठी या विमानातून मेटिओर क्षेपणास्त्र नेले जाऊ शकते. मेटिओर हे क्षेपणास्त्र दृष्टिक्षेपापलिकडचे लक्ष्य हवेतून हवेत भेदू शकते. १०० किलोमीटर लांब असलेले शत्रूचे विमान भेदू शकते.
* शत्रूच्या शक्तीस्थळांवर अचूक प्रहार करुन स्वत:चा बचाव करण्याचं तंत्रज्ञान राफेलमध्ये आहे, जे इतर कुठल्याही लढाऊ विमानात नाही.
* राफेलचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते एक ‘मल्टीरोल फायटर विमान’ आहे. राफेल एकटा तब्बल आठ विमानांची कामं करु शकतो. म्हणून या विमानाला मल्टीरोल फायटर विमान म्हणतात.
* राफेलमध्ये स्काल्प क्षेपणास्त्र ठेवता येईल. हे जमिनीवर लांब पल्ल्यावर हल्ला करू शकते. ३०० किलोमीटरच्या परिघात लक्ष्य भेदण्यास हे क्षेपणास्त्र सक्षम आहे. (Marathi Latest News)
* राफेल विमानांमध्ये स्काल्प मिसाईल आहे, जे हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम आहे. राफेलची मारक क्षमता ३७०० किलोमीटरपर्यंत आहे, तर स्काल्पची रेंज ३०० किलोमीटर आहे.
=======
हे देखील वाचा : Walk : सकाळी अनवाणी गवतावर चाला आणि ‘हे’ चमत्कारिक फायदे मिळवा
=======
* प्रत्येक आस्म क्षेपणास्त्राला जीपीएस आहे आणि इमेजिंग टरमिनल गायडन्स आहे. अगदी अचूकतेने १० मीटर्सपर्यंतचे लक्ष्य भेदू शकते.
* राफेल विमानांना होलोग्राफिक कॉकपिट आहे. राफेल एका वेळी ८ लक्ष्य साध्य करू शकते. या विमानांमध्ये टिकण्याची क्षमता प्रचंड आहे.
* राफेल विमान हे अँटी शिप हल्ल्यापासून अणुबॉम्ब हल्ल्यापर्यंत, क्लोज एअर सपोर्ट आणि लेजर डायरेक्ट लॉन्ग रेंज मिसाईल अॅटॅकमध्येही अव्वल आहे. (Social News)
* राफेल विमान २४,५०० किलोपर्यंत वजन घेऊन जाऊ शकतं आणि ६० तासांचं अतिरिक्त उड्डाणही करु शकतं. राफेल विमानाचा वेग २,२२३ किलोमीटर प्रति तास आहे.
* या विमानात २५ किलोमीटर वायरींग असून ३० हजार प्रिसिशन पार्ट्स आहेत. असंख्य इलेक्ट्रॉनिक सर्किट या विमानात आहेत.
* राफेलच्या कॉकपीटजवळ एक छोट्या बॉलच्या आकाराचा ऑप्टीकल कॅमरा बसवलेला आहे. रडारने शोधलेल्या टार्गेट्सचा शोध या कॅमेऱ्याच्या मदतीने घेता येतो. हा कॅमेरा म्हणजे राफेलची दुर्बिण आहे. राफेल विमान कितीही वेगात असेल, तरी हा कॅमेरा लक्ष्याचे अचूक फोटो काढू शकतो.
* स्पेक्ट्रा हे राफेलचं सुरक्षा कवच आहे. स्पेक्ट्रा शत्रूचे रडार जॅम करतं. त्यामुळे शत्रूच्या रडारला राफेलचा शोध लावता येत नाही.
* विमानाच्या दिशेने येणाऱ्या क्षेपणास्त्राची माहिती सुद्धा स्पेक्ट्रा सिस्टिमकडूनच मिळते. रडार जॅम केल्यानंतरही एखादे क्षेपणास्त्र विमानाच्या जवळ आले, तर विमानातून निघणारे इलेक्ट्रो मॅग्नॅटिक प्लस विमानाच्या दिशेने येणाऱ्या क्षेपणास्त्राची दिशा बदलतात. (Rafel Jet News)
स्काल्प मिसाईलची वैशिष्ट्ये
* राफेलमधील स्काल्प मिसाइलने ही कामगिरी फत्ते करण्यात आली. या स्काल्प मिसाइलची अनेक वैशिष्ट्ये आहेत. स्काल्प हे हवेतून जमिनीवर मारा करणारे मिसाईल आहे. ३०० किलोमीटर अंतरापर्यंतच्या लक्ष्यावर अचूक प्रहार करण्याची या मिसाईलची क्षमता आहे. (Top Stories)
* स्काल्प मिसाईलने आपली क्षमता सिद्ध केली आहे. शत्रुच्या प्रदेशातील पुल, रेलरोड, ऊर्जा प्रकल्प, धावपट्टी, बंकरही उद्धवस्त करु शकतो. जमिनीलगत उड्डाण करण्याच्या क्षमतेमुळे स्काल्प शत्रुच्या हवाई सुरक्षा यंत्रणेला चकवा देऊ शकते.
* स्काल्प मिसाईल यूके वायुदल आणि फ्रेंच वायुदल वापरतात. खाडी युद्धात हे मिसाईल वापरण्यात आले आहे. (Marathi)
=======
हे देखील वाचा : Virginia Giuffre : ब्रिटीश राजघराण्याला हादरवणारे स्कॅंडल !
=======
* स्काल्प हे लांब पल्ल्याचे हवेतून जमिनीवर मारा करणारे क्रूझ क्षेपणास्त्र आहे. त्याचा पल्ला ४०० किमी पर्यंत आहे. १३०० किलो वजनाचे हे क्षेपणास्त्र ४०० किलो स्फोटके घेऊन जाते. ५.१ मीटर लांब आणि ६३० मिमी जाडीच्या या क्षेपणास्त्रात मायक्रोटर्बो TRI-60-30 इंजिन बसवलेले आहे.
* क्षेपणास्त्र अचूक वार करेल यासाठी त्यात ट्रिपल नेव्हिगेशन सिस्टम आहे. त्याला इनर्शियल नेव्हिगेशन, GPS आणि टेरेन रेफरन्स नेव्हिगेशनद्वारे मार्गदर्शन केले जाते. इमेजिंग इन्फ्रारेड सीकर आणि स्वतःहून लक्ष्याची ओळख करण्याची क्षमता हे त्याला खूप खास बनवते. या क्षेपणास्त्राला जैमरच्या मदतीने चकवा देणे अत्यंत कठीण आहे. (Marathi Top News)