Operation Sindoor Planning : अवघ्या 25 मिनिटांमध्ये ऑपरेशन सिंदूरच्या मदतीने दहशतवाद्यांची 9 तळ उद्ध्वस्त करण्यात आली. खरंतर, पाकिस्तान गाढ झोपेत असताना भारतीय सैन्याने एअर स्ट्राइक करत दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला चढवला. यामध्ये लष्कर-ए-तैयबा, जैश ए-मोहम्मद आणि हिज्बुल मुजाहिद्दीनच्या तळांचा समावेश होता. या तिन्ही दहशतवादी संघटना सातत्याने भारताच्या विरोधात दहशतवादी कारवाया करत होती. पण यंदाचा भारताकडून करण्यात आलेला हल्ला एवढा भयंकर होता की, ते पुन्हा भारताच्या विरोधात दहशतवादी हल्ला करण्याचा विचार देखील करणार नाहीत.
या ट्रिपल हल्ल्याचे पडसाद इस्लामाबाद येथे ही उमटले आहेत. पाकिस्तानची आता जळफळाट होऊ लागली आहे. भारताने हल्ला केल्यानंतर पाकिस्तानने प्रतिक्रिया देत म्हटले की, आम्हाला कारवाईचा अधिक आहे. पण पाकिस्तानकडे ना एवढी हिंम्मत ना सैन्य शक्ती आहे, त्यामुळे शहबाज आणि मुनीर केवळ डॅमेज कंट्रोलमध्ये व्यस्त आहेत.
कसा तयार करण्यात आला ऑपरेशन सिंदूर प्लॅन?
पंतप्रधान नरेंद्र मदी सातत्याने संपूर्ण ऑपरेशनवर लक्ष ठेवून होते घरात तयार करण्यात आलेल्या वॉररुममधून हल्ल्यावर त्यांचे लक्ष होते. एनएसए डोवाल यांच्याकडून पंतप्रधानांना सातत्याने सविस्तर माहिती देत होते. सूत्रांनुसार, ऑपरेशन सिंदूरचे प्लॅनिंग 1 मे रोजी तयार करण्यात आले होते. यावेळी RAW ने हल्ल्यासाठी 21 दहशतवाद्यांच्या तळांची माहिती दिली होती. त्यापैकी 9 तळांना निवडण्यात आले. यानंतर ऑपरेशनची तारीख 7 मे ठरवण्यात आली. यावेळी चार दिवसांसाठी ऑपरेशनसंबंधित सर्व अधिकारी साऊथ ब्लॉकमध्ये होते. जेणेकरुन कोणतीही माहिती लीक होऊ नये. (Operation Sindoor Planning)
=======================================================================================================
हेही वाचा :
Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला धडकी!
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी करणाऱ्या सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग आहेत तरी कोण?
=======================================================================================================
सैन्याची पत्रकार परिषद
ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर त्याची सविस्तर माहिती एनएसए डोवाल यांनी पंतप्रधानांना दिली. याशिवाय पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हल्ल्याची माहिती दिली. हल्ल्यापूर्वी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी UNSC च्या स्थायी सदस्य देशांमधील पराष्ट्रांना फोन करत संवाद साधला होता. याशिवाय हल्ल्यानंतर चारही स्थायी सदस्यांव्यतिरिक्त UNSC च्या 11 अस्थायी सदस्यांनाही माहिती दिली की, भारत दहशतवादाचा नाश करण्यासाठी प्रतिबद्ध आहे. एवढेच नव्हे, दहशतवादाच्या विरोधात अशाच प्रकारचे सडेतोड उत्तर दिले जाईल. दरम्यान, 22 एप्रिलला पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारताने याचे परिणाम भोगण्यास तयार रहा असा इशारा दिला होता.