Home » Operation Sindoor : ‘सिंदूर’चं महत्व काय?

Operation Sindoor : ‘सिंदूर’चं महत्व काय?

by Team Gajawaja
0 comment
Operation Sindoor
Share

22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताच्या 2६ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आता यालाच प्रत्युत्तर देत भारतीय वायु सेनेने ७ मे च्या मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदुर’ राबवलं. यात पाकिस्तानच्या 9 दहशतवादी तळावर हल्ला केला गेला, या कारवाईमध्ये 60 पेक्षा जास्त दहशदवादी ठार झाले. अशी माहिती देण्यात आलीये. पण या खास मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव देण्यामागे नेमकं कारण काय ? आणि यानिमित्ताने भारतीय संस्कृतीतील सिंदूरच नेमकं महत्त्व काय ? हे सर्व जाणून घेऊया या व्हिडीओच्या माध्यमातून….. (Operation Sindoor)

नमस्कार ….

७ मे च्या मध्यरात्री झालेल्या भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव देण्यात आलं होतं. मात्र हे केवळ एका मोहिमेच नाव नसून, या नावामागे अनेक अर्थ दडलाय. पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी सामान्य पर्यटकांना लक्ष केलं. सोबतच पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळी झाडली होती. यावरून एकच लक्षात येत ते म्हणजे हा हल्ला केवळ देशावर नाही तर त्यामागे धार्मिक दृष्टिकोनही होता. (Marathi Latest News)

दहशतवाद्यांचा हेतू केवळ लोकांना जिवानिशी मारण्याचाच नव्हता, तर भारतीय संस्कृती आणि देशातील एकता यावर हल्ला करण्याचा होता.दरम्यान या भ्याड हल्ल्यावेळी महिलांचं कुंकू म्हणजेच त्यांच्या पतीला लक्ष करण्यात आलं. त्यामुळे अनेक निष्पापांचं कुंकू अर्थात सिंदूर पुसलं गेलं. या महिलांना काही प्रमाणात न्याय मिळावा यासाठी या मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव देण्यात आल्याचं म्हटलं जातं आहे.

Operation Sindoor

दरम्यान भारतीय संस्कृतीत प्रथा आणि परंपरांना खूप महत्त्व आहे. विविध प्रथा परंपरा या भारतीय संस्कृतीचं अंग आहेत. याच परंपरेतील एक म्हणजे सिंदूर किंवा कुंकू लावणं. भारतीय संस्कृतीत विशेषत: हिंदू धर्मातील महिला केसांमध्ये सिंदूर भरतात. ती एक प्राचीन परंपरा आहे, जी स्त्रियांच्या सौभाग्याच प्रतीक मानली जाते. द्रविड संस्कृतीत ही प्रथा अधिक प्रसिद्ध होती आणि ती हळूहळू संपूर्ण भारतात पसरली. दरम्यान सिंदूर लावण्याचेसुद्धा वेगवगेळे प्रकार देशात अस्तित्त्वात आहेत. (Marathi Trending News)

उत्तर भारतात लग्नाच्या वेळी भांगेत सिंदूर भरण्याची प्रथा आहे तर दक्षिणेकडे विवाहित स्त्रिया भांगेत कुंकू भरण्याऐवजी कपाळावर कुंकू लावतात. इथे महत्त्वाचा भाग म्हणजे भारतीय संस्कृतीत कपाळावर गंध, टिळा लावणं ही परंपरा स्त्री व पुरुष दोघांमध्येही सामान्य असली तरी कुंकू लावणं हे सौभाग्याचं लक्षण मानलं जातं. विवाहित स्त्रियांनी लाल कुंकू लावण्याची प्रथा आपल्याकडे आहे. दरम्यान महिलांनी केसात सिंदूर लावण्यामागे केवळ धार्मिक कारण नाही तर वैज्ञानिक कारणही आहे. शास्त्रानुसार हळद आणि चुना यापासून सिंदूर बनवलं जातं आणि ते लावल जातं. यामध्ये बुध धातू आढळतो, ज्यात ताणतणाव कमी करण्याची क्षमता असते. याशिवाय रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही ते फायदेशीर ठरतं. (Marathi Top News)

आता या ऑपरेशनच्या नावांबद्दल जाणून घेऊया .. कुठल्याही मोहिमेला नाव का महत्वाचं असतं? तर हे नाव गुप्ततेसाठी, कारवाईची ओळख ठेवण्यासाठी वापरलं जातं. हे नाव सैनिकांमध्ये आत्मविश्वास वाढवतं आणि आपल्या मोहिमेचं उद्दिष्ट स्पष्ट करतं. भारतीय लष्करात ऑपरेशनचं नाव लष्करी मुख्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ठरतं. कधी-कधी हे नाव डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी किंवा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्या सल्ल्यानुसारही ठरतं. आता ही नाव कशी दिली जातात उदाहरणार्थ – ऑपरेशन विजय, ऑपरेशन पराक्रम किंवा ऑपरेशन सिंदूर. (Social News)

=======

हे देखील वाचा :  Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला धडकी!

Operation Sindoor : अटलजी यांच्या उत्तराने पाकिस्तानची चांगलीच तंतरली होती

=======

तर हे नाव ठरवताना काही गोष्टींचा विचार केला जातो उदाहरणार्थ ऑपरेशनचा उद्देश काय आहे ? त्या अनुषंगाने नाव ठरवल जात उदा. “विजय” म्हणजे विजय मिळवणे. गोपनीयता म्हणजेच नाव ऐकून मिशनबद्दल अधिक माहिती समजू नये, याचीसुद्धा यावेळी काळजी घेतली जाते. कधी सांस्कृतिक किंवा धार्मिक संदर्भ वापरले जातात जसं की “सिंदूर”. 1999 साली झालेलं ऑपरेशन विजय, 1984 साली अमृतसरमधील गोल्डन टेम्पलमधील दहशतवाद्यांवर कारवाई म्हणून केलेलं ऑपरेशन ब्लू स्टार. आणि आता पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी केलेल ऑपरेशन सिंदूर! म्हणूनच या मिशनला “ऑपरेशन सिंदूर” असं नाव देणं, ही केवळ एक लष्करी रणनीती नव्हती – ती भारतीय संस्कृतीच्या मुळावर झालेल्या हल्ल्याला दिलेलं सडेतोड आणि भावनिक उत्तर होतं. हा हल्ला केवळ दहशतवाद्यांवर नव्हता… हा होता त्या प्रत्येक स्त्रीसाठी, जिचं सिंदूर – जिचं सौभाग्य – एका क्षणात हिरावून घेतलं गेलं. (Marathi Top International News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.