जगातील प्रत्येक देशात कोणत्याही गुन्ह्यासाठी शिक्षा देण्याचा कायदा आहे. गुन्हेगाराला त्याच्या गुन्ह्यासाठी जन्मठेप, फाशीची शिक्षा, दंड आणि अनेक प्रकारच्या शिक्षा निश्चित केल्या आहेत. त्याच वेळी, तुम्ही एखाद्या भयंकर गुन्ह्यासाठी मानवांना मृत्युदंड देण्याबद्दल ऐकले असेल. पण तुम्ही कधी ऐकले आहे का, की एखाद्या प्राण्याला त्याच्या गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हे ऐकून तुम्हाला थोडं विचित्र वाटलं असेल, पण हे खरं आहे. सुमारे १०६ वर्षांपूर्वी अमेरिकेत ही शिक्षा सुनावण्यात आली होती आणि त्यावेळी एका हत्तीला फाशीची शिक्षा देण्यात आली होती. (Elephant Hanged)
ही घटना १३ सप्टेंबर १९१६ रोजी अमेरिकेच्या टेनेसी राज्यात घडली होती. फाशीची शिक्षा झालेल्या हत्तीचे नाव ‘मेरी’ होते. हत्तीला सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेमागे एक विचित्र कारण होते, जे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. आणि त्या हत्तीने केलेल्या गुन्ह्याला तुम्ही गुन्हाही मानणार नाही, कारण अशा घटना खूप ऐकायला मिळतात. खरं तर, ‘चार्ली स्पार्क’ नावाचा माणूस टेनेसीमध्ये ‘स्पार्क्स वर्ल्ड फेमस शो’ नावाचे सर्कस चालवत असे. त्या सर्कसमध्ये मेरी नावाच्या आशियाई हत्तीसह अनेक प्राणी होते. (Elephant Hanged)
सांगितले जाते की, मेरीच्या माहुतने काही कारणास्तव सर्कस सोडले. त्याची जागा दुसऱ्या माहूतने घेतली. नवीन माहूतला मेरीबद्दल फारशी माहिती नव्हती आणि त्याने तिच्यासोबत फार कमी वेळ घालवला होता, त्यामुळे माहूत मेरीवर नियंत्रण ठेवू शकला नाही. दरम्यान, सर्कसच्या प्रचारासाठी शहरात एक परेड आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये मेरीसह अनेक प्राणी आणि सर्कस कलाकार सहभागी झाले होते. (Elephant Hanged)
हे देखील वाचा: इच्छा असूनही ‘या’ समुद्रात बुडू शकत नाही कोणतीही व्यक्ती, कसं काय?
त्याच वेळी, परेडच्या दरम्यान मेरीला काहीतरी खायला दिसले, ज्यासाठी ती वेगाने पुढे जाऊ लागली. नवीन माहुतने तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण मेरी थांबली नाही. यादरम्यान नवीन माहुतने तिला रोखण्यासाठी तिच्या कानामागे भाला खुपसला. त्यामुळे मेरीला राग आला आणि तिने माहुतला आपल्या पायाने चिरडले. माहूतचा मृत्यू होताच सर्वत्र गोंधळ सुरू झाला. (Elephant Hanged)
यामुळे लोक मृत्युदंडाची मागणी करू लागले. वृत्तपत्रांमध्ये मेरीच्या नावाने लेख छापले गेले, ज्यामध्ये तिला मृत्युदंडाची शिक्षा देण्याची बातमी छापली गेली. लोकं सर्कसचा मालक चार्ली स्पार्कला धमकी देऊ लागली की, जर त्याने मेरीला मृत्युदंडाची शिक्षा दिली नाही तर शहरात कुठेही सर्कस होणार नाही. त्याच वेळी लोकांनी मेरीला मारण्यासाठी अनेक योजना तयार करण्यास सुरुवात केली. ज्यामध्ये मेरीला करंटद्वारे मृत्युदंडाची शिक्षा देण्याचे प्लॅन बनले, तर कधी ट्रेनसमोर चिरडण्याची चर्चा झाली. (Elephant Hanged)
वाढता गोंधळ पाहून सरकारला मेरीला फाशीची शिक्षा देण्याचा निर्णय घ्यावा लागला. यासाठी त्यांनी १०० टन वजन उचलणाऱ्या क्रेनची व्यवस्था केली. १३ सप्टेंबर १९१६ रोजी हजारो लोकांसमोर हत्तीला फाशी देण्यात आली. त्यावेळी अमेरिकेत मोठ्या संख्येने लोकांनी हत्तीला फाशीच्या शिक्षेचे समर्थन केले होते. पण आजच्या काळाबद्दल बोलायचे झाले, तर इतिहासातील प्राण्यांबद्दलचे हे मानवतेचे सर्वात क्रूर उदाहरण मानले जाते. (Elephant Hanged)
आजच्या काळात अनेक प्राण्यांकडून असे गुन्हे घडले आहेत, पण त्यांना शिक्षा होत नाही. कारण कायदा असे मानतो की, प्राणी नकळत किंवा स्वतःच्या बचावासाठी इतरांवर हल्ला करतो. मेरीलाच घ्या, जर माहूतने तिच्यावर भाल्याने हल्ला केला नसता, तर ही घटना घडली असती का? त्याच प्रकारे, जर तुम्ही प्राण्यांना इजा करत नसाल, तर ते तुमच्यावर हल्ला करणार नाहीत. (Elephant Hanged)