Online Safety Tips : हॅकर्सपासून बँक खात्याची सुरक्षितता करणे अत्यंत महत्वाचे असते. यासाठी काही गोष्टी प्रत्येक नागरिकाने लक्षात ठेवावेत. अलीकडल्या काळात नागरिकांची फसवणूक केल्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. अशातच बँक खात्याची सिक्युरिटी कशी करावी, यावेळी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. याशिवाय कोणत्या सेटिंग्स बँक खात्यासंदर्भात बदलाव्यात हे देखील पाहणार आहोत.
बँक खाते सुरक्षित ठेवण्यासाठी खास टिप्स
मजबूत पासवर्ड
बँक खात्याच्या सुरक्षिततेसाठी पासवर्ड वेळोवेळी बदलावा. दोन ते तीन महिन्यांनी नवा पासवर्ड सेट करताना त्यामध्ये अक्षरे, चिन्ह आणि क्रमांकाचा वापर करावा.
टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन
व्हॉट्सअॅप किंवा जीमेलच्या माध्यमातून युजर्सच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाते. यासाठी खास फीचरही येते. पण आता काही बँकांनी देखील खाते सुरक्षित ठेवण्यासाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनचे फीचर ग्राहकांना देण्यास सुरुवात केली आहे.
सॉफ्टवेअर अपडेट
काहीवेळेस सॉफ्टवेअर किंवा अॅपमध्ये काही बग येतात. यामुळे सुरक्षितता लगेच मोडली जाऊ शकते. याच कारणास्तव बँक किंवा काही कंपन्या बग्स दूर करण्यासाठी सॉफ्टेवेअर किंवा अॅप अपडेट जारी करते. याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला भारी पडू शकते. (Online Safety Tips)
प्रायव्हेसी सेटिंग्स अपडेट करा
प्रत्येक अॅपसाठी काही प्रायव्हेसी सेटिंग्स दिल्या जातात. प्रायव्हेसी सेटिंग्समध्ये सेटिंग आपल्या हिशोबाने बदलू शकता. जेणेकरुन हॅकर्सपासून दूर राहू शकता.