Online Photo-Video Stocking : आजकाल बहुतांशजण फोटो-व्हिडीओ क्लिक केल्यानंतर सोशल मीडियावर अपलोड करतात. अशातच फोटो-व्हिडीओ क्लिक करतेवेळी आणि अपलोड करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी. जर तुम्ही काही गोष्टींची काळजी न घेतल्यास समस्येत अडकू शकता. खरंतर, तुम्ही ऑनलाइन सेल्फी स्टॉकिंगचे शिकार होऊ शकता. यापासून दूर राहण्यासाठी तातडीने फोनमधील काही सेटिंग्स बदलल्या पाहिजेत.
जीपीएस बंद केल्यास काय होईल?
फोटो-व्हिडीओ क्लिक करताना फोनमधील जीपीएस बंद करणे अत्यंत गरजेचे आहे. यामागे तुमच्या सुरक्षिततेचा मुद्दा आहे. असे न केल्यास फसवणूकदार तुमच्यापर्यंत सहज पोहोचू शकतात. जसे की, तुम्ही कुठे आहात आणि काय करत आहात या सर्वाची माहिती हॅकर्सला मिळू शकते. ज्यावेळी तुम्ही फोनमध्ये फोटो-व्हिडीओ क्लिक करता त्यावेळी जीपीएस ऑन असते. यावेळी latitude and longitude लोकेशनही हॅकर्सला कळू शकते. यालाच ऑनलाइन स्टॉरिंग बाय सेल्फी फोटो-व्हिडीओ असे मह्टले जाते. यापासून दूर राहण्यासाठी फोटो-व्हिडीओ क्लिक करताना अथवा ऑनलाइन अपलोड करताना जीपीएस बंद ठेवा. (Online Photo-Video Stocking)
प्रायव्हेसी सेटिंग्स महत्वाची
-आपल्या प्रोफाइलवर कधीच संपूर्ण माहिती शेअर करू नका. पब्लिकली शेअर करण्यात आलेल्या माहितीवरुन तुम्हाला नुकसान पोहोचू शकते.
-तुम्ही विश्वास ठेवत असलेल्या व्यक्तींपर्यंतच तुमच्या पोस्ट मर्यादित ठेवा. प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या वेगवेगळ्या प्रायव्हेसी सेटिंग्स असतात. त्या समजून घेऊन करा.
-फोटो-व्हिडीओ अपलोड करताना त्यामध्ये लोकेशन टॅग लावू नका. याशिवाय बॅकग्राउंडमध्ये असा कोणताही लिहिलेला बोर्ड अथवा फोटो दाखवू नका ज्यामुळे तुमचे लोकेशन कळू शकेल.
-मुलांचेही शाळेतील गणवेशातील फोटो अपलोड करु नका. यामुळे ऑनलाइन स्टॉकिंगचा धोका वाढला जाऊ शकतो.