Home » ऑनलाईन बनावट नोकरी ऑफरच्या संदर्भात गृहमंत्रालयाकडून मार्गदर्शक सुचना जारी

ऑनलाईन बनावट नोकरी ऑफरच्या संदर्भात गृहमंत्रालयाकडून मार्गदर्शक सुचना जारी

by Team Gajawaja
0 comment
OTP Scam Alert
Share

सध्या बदलत्या जीवनशैलीसह व्यवहार ही डिजिटल पद्धतीनेच बहुतांश वेळा केले जात आहेत. अशातच गेल्या काही काळापासून नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करण्याचे ही प्रमाण फार वाढले आहे. त्यामुळे वेळोवेळी सरकारकडून नागरिकांना बनवाट आणि खोट्या मेसेजला बळी पडू नका असे आवाहन केले जाते. याच पार्श्वभूमीवर आता नागरिकांना ऑनलाईन जॉब ऑफर देत फसवणूक करण्याचा नवा फंडा फसवणूकदारांनी काढला आहे. याच्या माध्यमातून नागरिकांचे पैसे उकळण्याचा त्यांच विचार आहे. (Online Job Fraud)

यामुळेच केंद्रीय गृहमंत्रालयाने एक मार्गदर्शक सुचना जारी केली आहे. जेणेकरुन तरुणांनी अशा ऑफर्सला बळी पडू नये आणि ते कशा पद्धतीने ओळखायचे हे सुद्धा सांगितले आहे.गृहमंत्रालयाने बनावट नोकरी संदर्भात आपली फसवणूक होऊ नये म्हणून एक ट्विट केले होते. त्यामध्येच त्यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत.

ऑनलाईन जॉब ऑफरच्या फसवणूकीपासून कसे दूर रहाल
-ऑनलाईन जॉब ऑफरमध्ये अगदी सहजपणे अपॉइंटमेंट लेटर दिले जाते. इंटरव्यू घेणारा व्यक्ती तुमच्याशी बोलल्यानंतर काही वेळातच तुम्हाला नोकरीसाठी होकार देतो.
-फेक जॉब ऑफरमध्ये नेहमीच अपॉइंटमेंट लेटरमध्ये प्रोफाइल आणि कामाबद्दल अधिक स्पष्ट केलेले नसते.
-ज्या ईमेल आयडीच्या माध्यमातून अपॉइंटमेंट लेटर आले आहे ते अनप्रोफेशनल पद्धतीने लिहिलेले असते
-ईमेल पाठवणारा तुमच्याकडे खासगी माहिती मागतो
-जॉब ऑफरसाठी पैशांची मागणी केली जाते

Online Job Fraud
Online Job Fraud

हे देखील वाचा- दिवाळीच्यावेळी काहीवेळेस विक्री केला जातो बनावट मावा, अशा पद्धतीने तपासून पहा

गृह मंत्रालयाच्या साइबर क्राइम विंगला द्या सुचना
केंद्रीय गृहमंत्रालयाने अपील केले आहे की, जर एखाद्यासोबत ऑनलाईन फसवणूक झाल्यास किंवा अशा प्रकारची ऑफर मिळाल्यास लगेच मंत्रालयाच्या साइबर क्राइम विंगला याची सुचना द्या, यासाठी राष्ट्रीय साइबर गुन्हे रिपोर्टिंग पोर्टल www.cybercrime.gov.in वर लॉग-इन करुन तक्रार दाखल करु शकता.

दरम्यान, गेल्याच काही महिन्यांपूर्वी हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थानसह २३ राज्यातील लोकांना चुना लावल्याच्या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांनी सुद्धा लोकांना नोकरी देतो म्हणून सांगत त्यांच्याकडून पैसे लाटले होते. नोकरीच्या शोधात जर तुम्ही असाल तर अशा गोष्टींना बळी पडू नका.(Online Job Fraud)

आरोपींना अटक केल्यानंतर त्यांनी ते दिल्लीत बनावट कॉल सेंटर चालवायचे असे सांगितले. येथे इंटरनेटच्या माध्यमातून नोकरी शोधणाऱ्यांची माहिती एकत्रित केली जायची. त्यानंतर त्या लोकांना संपर्क करुन एअरलाइन्समध्ये उत्तम पगाराची नोकरी देतो म्हणून सांगायचे. त्यांचा इंटरव्यू सुद्धा व्हाचा आणि नंतर बनावट ऑफर लेटर कुरियरच्या माध्यमातून घरपोच पाठवले जायचे. अशाच नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तिला दिलासा मिळायचा पण त्यांना पुन्हा ही लोक फोन करुन विविध कारणांसाठी पैसे भरावे लागतील असे सांगायचे. एखाद्याकडून बक्कळ रक्कम उकळल्यानंतर हे आरोपी आपला मोबाईल क्रमांक बंद करायचे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.