Online Investment Fraud : शेअर मार्केटमधअये पैस लावणे सामान्य बाब झाली आहे. सध्या न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये खूप पैसे लावले जात असून कमाई देखील केली जात आहे. दरम्यान, पैसे लावताना काही गोष्टींची काळजी घ्यावी. अन्यथा न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजचे बनावट अॅप आणि वेबसाइटच्या माध्यमातून तुमची फसवणूक होऊ शकते.
टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्ट्सनुसार, नुकत्याच एका ऑनलाइन ट्रेडिंग फेक अॅपच्या माध्यमातून नागपूर येथील एका 41 वर्षीय व्यावसायिकाची फसवणूक झाली. न्यूयॉर्क स्टॉक एक्सजेंचमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली व्यक्तीची 87 लाख रुपयांची फसणूक करण्यात आली आहे.
कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका
पीडित व्यक्तीला गुंतवणूक करण्याची लिंक सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म फेसबुकवरुन मिळाली होती. यामुळेच व्यक्तीने त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला होता. ज्या पोर्टलच्या माध्यमातून गुंतवणूक केली तेथेच त्याचे पैसे बुडाले गेले. खरंतर व्यक्तीने newyorkstockexchangev.top या वेबसाइटच्या माध्यमातून पैसे गुंतवले होते.
रिपोर्ट्सनुसार, पीडित व्यक्तीला आधी ट्रेडिंगसाठी ऑनलाइन आयडी देण्यात आला. यानंतर 50 हजार रुपयांनी ट्रेडिंग सुरु केली आणि 10 मिनिटांमध्ये त्याला 1.42 लाख रुपयांचा फायदा झाल्याचे दाखवले. अशातच व्यक्तीने अधिक पैसे गुंतवले. पण गुंतवलेले सर्व पैशांची त्याची फसवणूक झाल्याचे नंतर त्याला कळले. (Online Investment Fraud)
ऑनलाइन फसवणूकीपासून असे राहा दूर
-कोणत्याही स्टॉक एक्सजेंचमध्ये गुंतवणूक करण्याआधी ट्रेडिंग प्लॅटफॉर्म तपासून घ्या
-ट्रेडिंग प्लॅटफॉर्मची माहिती मिळवल्यानंतर पोर्टल आणि कंपनीत पैसे गुंतवा
-ट्रेडिंग अॅपच्या अधिकृत वेबसाइटवर गुंतवणूकीची संपूर्ण माहिती घ्या.
-उत्तर रेटने इंटरेस्ट मिळतोय म्हणून विश्वास ठेवू नका.
-नेहमीच लक्षात ठेवा की, वेबसाइटच्या सुरुवातीला HTTPS असे लिहिलेले असते.
-पेमेंट करताना नेहमीच सावध राहा.