Online Fraud : येत्या 19 ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. यावेळी गिफ्ट पाठवले जातात. अशातच ऑनलाइन पद्धतीने सणासुदीच्या काळात खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी. अन्यथा फार मोठे नुकसान होण्याची शक्यता वाढली जाते. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया….
सणावेळी नागरिकांची होणारी फसवणूक
सायबर हल्लेखोरांकडून सणासुदीच्या काळात नागरिकांना लुटण्याचा प्रयत्न केला जातो. अशातच ऑनलाइन पद्धतीने खरेदी करताना नागरिकांना बंपर डिस्काउंच्या नावाखाली फसवणूक केली जाऊ शकते. अथवा फसवणूकीसाठी वेगवेगळे मार्गही वापरले जातात. सध्या इंडिया पोस्टच्या नावाने एक मेसेज नागरिकांना पाठवला जात आहे. त्यामध्ये तुम्हाला पार्सलची डिलिवरी येणार आहे असे सांगितले जाते. पण पत्ता व्यवस्थितीत नसल्याने डिलिवरी करण्यास अडथळा येतोय असेही सांगतात. या मेसेजसोबत एक लिंकही दिली जाते. त्या लिंकवर क्लिक केल्यास तुमचा पत्ता अपडेट होईल असे सांगत नागरिकांना लुटण्याचा प्रयत्न केला जातो.
डिलिवरीसाठी शुल्क
लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमचा फोन हॅक होऊ शकतो. याशिवाय रिडिलिव्हरीसाठी 50 रुपयांपर्यंतची रक्कम भरण्यासही सांगितले जाते. यामुळे काहीजण अधिक विचार न करता पेमेंट करता. यावेळी डेबिट अथवा क्रेडिट कार्ड्सच्या माध्यमातून पेमेंट करण्यासाठी त्यासंदर्भातील माहिती भरल्यानंतर फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला तुमचा खासगी डेटा हाती लागतो. या सर्व गोष्टी तुमच्या नकळत केल्या जाऊ शकतात. अशाप्रकारे सायबर हल्लेखोर नागरिकांची सणासुदीला फसवणूक करतात. (Online Fraud)
रक्षाबंधनाला फसवणुकीपासून दूर राहण्यासाठी पुढील काही गोष्टी लक्षात ठेवा.
-कोणत्याही अज्ञात मेसेज अथवा ईमेलवर लगेच विश्वास ठेवू नका
-कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नका
-खासगी माहिती कोणत्याही वेबसाइटवर अपलोड करू नका
-अज्ञात व्यक्तीसोबत ओटीपी अथवा पिन क्रमांक शेअर करू नका
-सायबर संदर्भातील तक्रारीसाठी cybercrime.gov.in या वेबसाइटला भेट द्या