सध्याच्या हायटेक काळात ऑनलाईन डेटिंग आणि लग्न अगदी सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. या गोष्टी करण्यासाठी काही डेटिंग साइट्स सुद्धा आहेत. याचा वापर करुन लोक आपल्या पसंदीचे मित्रमैत्रणी बनवू शकतात अथवा पार्टनरची निवड करतात. याची सुरुवात डेटिंग अॅपवर प्रोफाइल तयार करणे, फोटो अपलोड करण्यापासून होते. परंतु या दरम्यान बहुतांश लोक काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. अशातच तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. (Online Dating App)
डेटिंग अॅपवर सर्फिंग करताना सर्वात प्रथम लोक तुमचे प्रोफाइल पाहतात. अशातच तुम्ही लहानशी चूक सुद्धा समस्या उद्भवू शकतात. यामुळेच आम्ही तुम्हाला डेटिंग अॅपचा वापर करताना नक्की कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबद्दच सांगणार आहोत.
-ग्रुप फोटो अपलोड करु नका
काही वेळेस लोक डेटिंग अॅपवर ग्रुप पिक्चर अपलोड करतात. पण तसे करु नका. कारण यामध्ये असलेल्या अन्य लोकांची सुद्धा प्रायव्हसी प्रभावित होते. यामुळेच तुम्ही तुमचा सिंगल फोटो अपलोड करा.
फिल्टरचा वापर करु नका
बहुतांश लोक समोरच्या व्यक्तीवर आपले उत्तम इंप्रेशन पाडण्यासाठी सोशल मीडियात फोटो अपलोड करतेवेळी फिल्टरचा वापर करतात. ज्यामध्ये डेटिंग अॅपच्या प्रोफाइल फोटोचा सुद्धा समावेश आहे. पण यामुळे डेटिंग अॅपवर तुम्हाला पसंद करणाऱ्या व्यक्तीच्या मनात एक चुकीचे इंप्रेशन तयार होऊ शकते. फिल्टर न लावलेला फोटो तुम्ही वापरु शकता.
मास्कचा वापर करु नका
कोरोनामुळे बहुतांश लोक येताजाता काळजीपोटी मास्क घालतात. अशातच फोटो क्लिक करताना सुद्धा काहीजण मास्क काढत नाही. हाच फोटो डेटिंग अॅपवर सुद्धा अपलोड करतात. त्यामुळे तुम्हाला समोरचा व्यक्ती व्यवस्थितीत ओळखू शकत नाही. मास्क नसलेला फोटो अपलोड करणे तुमच्यासाठी योग्य ठरेल.(Online Dating App)
हेही वाचा- प्रत्येक गोष्टीचा राग करणे तुमच्या आयुष्यासाठी ठरेल धोकादायक
बोल्ड फोटो अपलोड करु नका
डेटिंग अॅपवर आपले बोल्ड फोटो अपलोड करण्यापासून दूर रहा. कारण याचा दुरपयोग केला जाऊ शकतो. काही लोक टाइम पास म्हणून तुम्हाला पसंद करण्यास सुरुवात करु शकतात. ऐवढेच नव्हे तर चुकीच्या उद्देशाने तुमचा फोटो कुठेही वापरला जाऊ शकतो.
वॉइस चॅट करा
डेटिंग अॅपवर पार्टनरचा शोध घेताना समोरच्या व्यक्तीची कोणतीही माहिती न घेता त्याच्याशी फोनवर बोलण्यास सुरुवात करतात. पण डेटिंग अॅपवर लगेच अनोळख्या व्यक्तीला आपला मोबाईल क्रमांक देणे खुप रिस्की ठरु शकते. अशातच तुम्ही वॉइस चॅट करु शकता.
योग्य डेटिंग अॅपची निवड करा
सायबर सिक्युरिटी तज्ञांनुसार पॉप्युलर डेटिंग अॅपचा वापर करणे सुरक्षित असते. तर डेटिंग अॅपला कॉन्टॅक्ट, एसएमएस आणि पिक्चर गॅलरीचा एक्सेस देऊ नये. काही डेटिंग अॅपवर फेसबुक सोबत लॉग इन करण्याचा सुद्धा ऑप्शन असतो.