Home » काश्मिरमध्ये पुन्हा एकदा पूर्वीची रौनक…

काश्मिरमध्ये पुन्हा एकदा पूर्वीची रौनक…

by Team Gajawaja
0 comment
Kashmir
Share

काश्मिर (Kashmir) ….पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ज्या काश्मिरचा उल्लेख करण्यात येतो, त्या काश्मिरमध्ये (Kashmir) अनेक वर्षापासून दहशतवाद्यांच्या भीतीनं चित्रपटगृह बंद होते. फारकाय काश्मिरमध्ये (Kashmir) चित्रपटांचे शुटींगही करणे जवळपास बंद झाले होते. बॉलिवूडसह टॉलिवूडचीही शुटींगसाठी पहिली पसंती काश्मिर असायची, पण तेथील बिघडलेल्या परिस्थितीमुळे अनेक चित्रपटांचे शुटींग परदेशात केले जायचे. आता याच काश्मिरमधील (Kashmir) परिस्थिती बदलत चालली आहे. काश्मिरमध्ये दहशतवाद्यांवर होणा-या कारवाईमुळे पर्यटन व्यवसाय पुन्हा बहरु लागला आहे.  सोबतच या स्वर्गिय सौदर्य लाभलेल्या खो-यात पुन्हा चित्रपटांचे शुटींग सुरु झाले आहे. आता फक्त चित्रपटच नाहीत तर मोठ्या प्रमाणात वेबसिरीज आणि गाण्यांच्या अल्बमचे शुटींगही काश्मिर येथे होत आहे.  या बदललेल्या परिस्थितीमुळे स्थानिक काश्मिरी (Kashmir) युवकांनाही रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत.  जवळपास 34 वर्षांनंतर काश्मिरमध्ये 200 चित्रपटांचे शूटिंग होत आहे. ही खूप चांगली गोष्ट असून बदलत्या परिस्थितीमुळे काश्मिरमध्ये (Kashmir) पुन्हा एकदा पूर्वीची रौनक परत येईल अशी आशा येथील चित्रपट कामगार परिषदेतर्फे व्यक्त करण्यात आली आहे.  

गेल्या वर्षात 200 बॉलीवूड चित्रपट, वेब सिरीज आणि अल्बमच्या शूटिंगला काश्मिरमध्ये (Kashmir) परवानगी देण्यात आली आहे. गेल्या 34 वर्षांतील हा विक्रमी आकडा आहे. 90 च्या दशकाच्या सुरुवातीपासूनच काश्मीरमध्ये दहशतवादाचा मोठ्या प्रमाणात पसरला होता. त्यामुळे तेथील पर्यटन आणि चित्रपट व्यवसायाला मोठा फटका बसला. येथे रोजगारासाठी हे दोन प्रमुख मार्ग होते. ते बंद झाल्यामुळे स्थानिकांचा कोंडमारा झाला होता. आता पुन्हा काश्मिर खो-याच चित्रपटांचे शुटींग सुरु झाल्याने स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. काश्मीर खोरे पुन्हा एकदा चित्रपटाच्या शूटिंगचे केंद्र होऊ घातले आहे. जम्मू आणि काश्मीर (Kashmir) फिल्म डेव्हलपमेंट कौन्सिल यावर्षी शूटिंगसाठी निर्मात्यांकडून 500 हून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. आतापर्यतचा हा सर्वाधिक मोठा अर्जांचा आकडा आहे.  सध्या काश्मिरमध्ये बॉलिवूडसह दक्षिण भारतीय चित्रपट निर्मातेही शूटिंग करण्यासाठी उत्सुक आहेत. जम्मू आणि काश्मीर चित्रपट विकास परिषद त्यासाठी सर्व व्यवस्था पुरवत आहे. या परिषदेची स्थापना 2021 मध्ये करण्यात आली आहे. चित्रपटाच्या शूटिंगची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सिंगल विंडो क्लिअरन्सची व्यवस्था येथे आहे. फक्त एका अर्जावर चित्रपट किंवा वेबसीरिजच्या शुटींगसाठी येथे सर्व परवानग्या देण्यात येतातच शिवाय त्यांना आवश्यक अशा सुविधाही देण्यात येतात. यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहेत. याशिवाय स्थानिक कलाकारांनाही यात नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आतापर्यत जेकेएफडीसीमध्ये एक हजाराहून अधिक स्थानिक कलाकारांनी नोंदणी केली आहे.  स्थानिक कलाकारांसोबत हे बाहेरुन शुटींगसाठी येणारे निर्माते तंत्रज्ञ, कॅमेरामन आणि मदतनीस म्हणूनही स्थानिकांचा वापर करतात.  त्यामुळे सर्वांनाच कामाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.  

जम्मू-काश्मीरमधील 90% चित्रपट काश्मीरमध्ये (Kashmir) शूट केले जातात. चित्रपट निर्माते आता गुलमर्ग, पहलगाम, काश्मीरमधील दल सरोवर यांसारख्या पारंपारिक ठिकाणांबरोबर अन्य नव्या पर्यायांचाही वापर करीत आहेत.  त्यामध्ये  बांदीपोरा, दूधपात्री आणि योशमार्गमधील गुरेझ आणि वुलर अशी नवीन ठिकाणे आहेत. स्थानिक कलाकार आणि तंत्रज्ञ त्यांच्या टीममध्ये असल्यामुळे नवीन स्थळ शोधण्यासाठी त्यांना फार धावाधाव करावी लागत नाही. स्थानिकांच्या मदतीनं नवीन लोकेशन निर्मात्यांना मिळत आहे.  

1970-80 च्या दशकात काश्मीर (Kashmir) हे चित्रपटांच्या शूटिंगचे केंद्र असायचे. अनेक गाजलेल्या चित्रपटांचे आणि गाण्यांचे चित्रिकरण काश्मिरमध्ये झाले आहे.  मात्र  1990 च्या दशकात वाढलेल्या दहशतवादी कारवायांमुळे हे  सर्व ठप्प झाले. मात्र आता पुन्हा वातावरण सुधारल्याने चित्रपट निर्मात्यांनी काश्मिरला पसंती दिली आहे. काश्मिरमध्ये शुटींग करण्यासाठी दररोज अर्ज येत असल्याचे संबंधित परिषदेच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे. आतापर्यंत सुमारे 130 अर्ज मंजूर झाले आहेत. यामध्ये रिलायन्स, साऊथ फिल्म प्रोडक्शन हाऊस, आमिर खान प्रोडक्शन आणि इतर अनेक ओटीटी  प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. 110 चित्रपट कंपन्यांनी लोकेशन्स बुक केल्या आहेत. काहींनी शूटिंगही सुरू केले आहे.  बॉलिवूडशिवाय टॉलिवूडसह प्रादेशिक चित्रपट निर्मातेही आता येथे येत आहेत. चित्रपटांशिवाय अनेक म्युझिक अल्बमचे शूटिंगही सुरू आहे. गुलमर्ग, पहलगाम, ऐतिहासिक मार्तंड मंदिर अशा अनेक ठिकाणांना मोठी मागणी आहे. आगामी काळात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या सहकार्याने काश्मीरमध्ये (Kashmir) पाच दिवसीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासर्वांना परवानगीसाठी सिंगल विंडो सिस्टीमची सुलभ प्रक्रिया, एकाच पोर्टलवरून सहज मंजुरी मिळणे आणि शूटिंगच्या ठिकाणी मोफत सुरक्षा या सर्व गोष्टी मिळत असल्यामुळे निर्मात्यांनी पहिली पसंती काश्मिरला दिली आहे.  

======

हे देखील वाचा : देशातील ‘या’ गावात केले जाते दोन मुलांचे एकमेकांशी लग्न

======

गेल्या वर्षभरात सुमारे डझनभर चित्रपटांचे शूटिंग काश्मीरमध्ये (Kashmir) झाले आहे.  त्यापैकी आमिर खानचा लाल सिंग चड्ढा. दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि विजय यांनी काही दिवसांपूर्वी ‘कुशी’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. उदित नारायण आणि लखविंदर वडाली यांनी नुकतेच काश्मीरमध्ये म्युझिक व्हिडिओ शूट केले आहे. जब जब फूल खिले, काश्मिरी की कली, बेताब, बॉबी, हकीकत, जंगली, कभी कभी, दिल से,  स्टुडंट ऑफ द इयर, हायवे, राझी, बजरंगी भाईजान यासारख्या चित्रपटांचे शुटीग काश्मिरच्या खो-यात झाले आहे. मात्र आता पुन्हा मोठ्याप्रमाणात काश्मिरमध्ये चित्रपट सृष्टी शुटींगसाठी आल्यामुळे या खो-याचे सौदर्य आणि तेथील शांतता यांची ओळख नव्यानं जगाला होणार आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.