विजयादशमी म्हणजे असत्यावर सत्याच्या विजयाचा उत्सव. नवरात्रीनंतर 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमी साजरी होईल. या दिवशी देशभरात रावणाचे पुतळे जाळण्यात येतात. चांगल्या शक्तीचा वाईटावर असलेल्या विजयाचे हे प्रतिक मानण्यात येते. देशभरात रावणाचे पुतळे जाळण्यात आले तरी या रावणाला आपला जावई म्हणून काही ठिकाणी त्याची पूजाही होते. मध्यप्रदेशमधील काही गावांमध्ये लंकेचा राजा असलेल्या रावणाला जावई मानण्यात येते. त्यामुळे येथे या जावयाला जाळण्यात येत नाही, तर त्याची पूजा करण्यात येते. मध्यप्रदेशमधील मंदसौर आणि विदिशा येथे रावणाला हा जावईपदाचा मान आहे. या अनोख्या प्रथेमागे येथे काही आख्यायिका सांगण्यात येतात. विजयादशमीला भारतभर रावणाच्या पुतळ्याचे दहन होत असले तरी भारतातील काही ठिकाणी रावणाची पूजा केली जाते. यामध्ये मध्य प्रदेशातील मंदसौर आणि विदिशा यांचा समावेश आहे. या दोन्ही ठिकाणी रावणाची पूजा केली जाते. येथे रावणाला जावई आणि दैवत मानण्यात येते. त्याला कारण म्हणजे, मंददरी हे रावणाची पत्नी राणी मंदोसौर हिचे माहेर मानण्यात येते. (Mandsaur)

त्यानात्यानं रावण हा मंदसौरचा जावई लागतो. त्यामुळेच आपल्या जावयाच्या पुतळ्याचे दहन या भागात होत नाही. याबाबत सांगण्यात येते की, मंदसौरचे मूळ नाव दशपूर होते. येथेच रावणाची पत्नी राणी मंदोदरीचा जन्म झाला. त्यावरुनच या शहराचे नाव मंदसौर ठेवण्यात आले. मध्य प्रदेशातील मंदसौरमधील नामदेव समुदाय रावणाला त्यांचा जावई मानतो. मायासूराची मुलगी असलेल्या मंदौदरीचे लग्न झाल्यापासून या भागात रावणाचे अनेक पुतळे उभारण्यात आले. पण ते जाळण्यात आले नाहीत. तर या पुतळ्यांची जावई म्हणून येथे पूजा करण्यात येते. विशेषतः जेव्हा भारतभर रावणाचे पुतळे जाळण्यात येतात, त्या विजयादशमीला येथे या रावणांच्या पुतळ्यांची पूजा केली जाते. विजयदशमीला येथे कापसात भिजवलेले तेल रावणाच्या नाभीला लावले जाते. असे मानले जाते की, असे केल्याने त्याच्या नाभीला छेदलेल्या बाणाचे दुःख कमी होते. (Social News)
या दिवशी लोक रावणाची पूजा करुन जगाच्या कल्याणासाठी आणि गावाच्या समृद्धीसाठी प्रार्थना करतात. मंदसौरमधील खानपुरा येथे हा रावणाचा भव्य पुतळा आहे. या भागातील नामदेव समुदायाचे लोक या पुतळ्याची देखभाल करतात. विशेष म्हणजे, या पुतळ्याची पूजा केल्यावर मनातील इच्छाही व्यक्त केली जाते. रावणाच्या पुतळ्याच्या उजव्या पायाला दोरा बांधून इच्छा व्यक्त केली जाते. असे केल्यानं आजार बरे होतात, अशी येथील लोकांची धारणा आहे. मंदसौरमध्ये जसा रावणाचा पुतळा आहे, तसाच पुतळा विदिशा जिल्ह्यातील रावणग्राम या गावातही आहे. येथे रावणाची 10 फूट उंच झोपलेली मूर्ती स्थापित केली आहे. या मूर्तीचीही विजयादशमीच्या दिवशी विशेष पूजा केली जाते. सोबतच या रावणग्राममध्ये कोणत्याही शुभ कार्यापूर्वी रावणाची देव मानून पूजा केली जाते. (Mandsaur)

मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील काचीखली गावातही दसऱ्याला रावणाचा पुतळा जाळला जात नाही. त्याऐवजी येथे रावणाची पूजा केली जाते. येथे अशी श्रद्धा आहे की, जर रावणाची पूजा केली नाही तर संपूर्ण गावाचा विनाश होईल. या भीतीमुळे आजही गांवकरी दसऱ्याला रावण जाळत नाहीत, तर त्याच्या मूर्तीला अभिषेक करुन पूजा करतात. याशिवाय हिमाचल प्रदेशमधील कांगडा येथेही रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जात नाही. येथील स्थानिक रावणाला भगवान शंकराचा एक महान भक्त मानतात. रावणानं कठोर तपश्चर्या केली त्याचे उदाहरण येथे दिले जाते, त्यामुळेच त्याचा पुतळा जाळण्यात येत नाही. (Social News)
========
हे देखील वाचा :
Navratri : नवरात्रीमध्ये केल्या जाणाऱ्या कुंकुमार्जनाचे महत्व
=========
उत्तरप्रदेशमधील बिसरख हे गाव रावणाचे जन्मस्थान मानले जाते. या गावचे ग्रामस्थ रावणाची पूजा एक विद्वान ब्राह्मण आणि शिवभक्त म्हणून करतात. या गावातही रावणाचा पुतळा कधीही जाळण्यात येत नाही. उलट त्याला देवासारखे इथे पुजले जाते. कर्नाटक येथेल कोलार मध्ये रावणाचे मंदिर आहे. येथे दस-याला रावणाच्या मंदिरात जाऊन त्याची पूजा केली जाते, आणि मग शेतीच्या कामाची सुरुवात होते. राजस्थानमधील जोधपूर येथे रावण आणि मंदोदरी यांचा विवाह झाल्याची कथा सांगितली जाते. त्यामुळे तिथेही रावणाच्या पुतळ्याचे दहन होत नाही. (Mandsaur)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
