Home » कपिल देवचे ‘ते’ शब्द भारतीय संघासाठी टर्निंग पॉईंट ठरले, आणि भारताला पाहिला अनपेक्षित विजय मिळाला

कपिल देवचे ‘ते’ शब्द भारतीय संघासाठी टर्निंग पॉईंट ठरले, आणि भारताला पाहिला अनपेक्षित विजय मिळाला

by Correspondent
0 comment
1983 world cup final | K Facts
Share

भारतात क्रिकेट हा सर्वांच्याच आवडीचा विषय आहे. सचिन सारख्या क्रिकेटपटूला तर काही जण देव मानू लागले आहेत. मात्र एक काळ असा होता, की जेव्हा क्रिकेटला दुय्यम दर्जाचे स्थान दिले जात होते.

तेव्हा एक अशी घटना घडली जेव्हापासून भारतीय क्रिकेट खेळाचा चेहरामोहरा बदलून गेला. ही घटना म्हणजे भारताला मिळालेला पहिला विश्वचषक. आजच्याच दिवशी म्हणजे २५ जून १९८३ रोजी भारताला कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली पाहिले विश्वचषक विजेतेपद मिळाले होते. (On this day: India win the 1983 World Cup)

२५ जून १९८३ चा शनिवारचा तो दिवस होता. वेस्ट इंडिज (West Indies) सारख्या बलाढ्य देशाला टक्कर देत भारतीय संघाने लॉर्ड्स मैदानावर विश्वचषकाची बाजी मारली होती. या विश्वचषकात कर्णधार कपिल देव ह्यांचा खेळ म्हणावा तसा चांगला झाला नसला, तरी सुद्धा त्यांच्या या सामन्यातील नेतृत्वाने आणि त्यांनी घेतलेल्या व्हिव्ह रिचर्ड्स या खेडूच्या कॅचने त्यांना भरभरून प्रसिद्धी मिळवून दिली होती.

1983 world cup

या अगोदर वेस्ट इंडिजने विश्वचषकाचे दोन सामने जिंकले होते. तिसऱ्या विश्व विजयासाठी फक्त १८६ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजला मात्र यावेळी भारतीय संघाने धूळ चारली होती

या सामन्यात भारताचा डाव फक्त १८३ धावांवर संपुष्ठात आला होता. आणि भारताला आपण हा सामना निश्चितच पराभूत होणार असे वाटत होते. मात्र अशा परिस्थितीत खेळाडूंचे मनोबल वाढवण्याचे काम कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी केले. “हा सामना आपण सहजा सहजी गमवायचा नाही.” कपिल देवचे ते शब्द भारतीय संघासाठी टर्निग पाईंट ठरले.

त्यानंतर वेस्ट इंडिजचा डाव १४० धावात संपुष्ठात आला. आणि भारताने ४३ धावांनी वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय मिळवला. क्रिकेटवर जेव्हा वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड सारख्या संघांचा दबदबा होता तेव्हा पहिल्या विश्वचषकाच्या विजेतेपदाला भारतीय संघाने गवसणी घातली.

भारतीय संघ (India cricket team) १९८३ पूर्वी कमकुवत असून देखील पुढे भारतीय संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर बलाढ्य वेस्ट इंडिजचा १९७५, १९७९ व १९८३ या तिन्ही विश्वचषकात साखळी सामन्यांमध्ये पराभव केला होता.

1983 World Cup final

मात्र पहिल्या विश्वचषकात जरी खेळाडू चांगले खेळले असले तरी देखील त्यांना मानधन अगदी कमी देण्यात आले होते. भारतीय संघ जेव्हा फायनलमध्ये पोहोचला होता तेव्हा बीसीसीआयने (BCCI) प्रत्येक खेळाडूला २५ हजार रुपये बोनस दिला होता.

तर जेव्हा भारतीय संघाने पहिला विश्वचषक जिंकला तेव्हा, लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी नॅशनल स्टेडियमवर एक कार्यक्रम आयोजित केला. यातून जमा झालेल्या पैशातून प्रत्येक खेळाडूला एक-एक लाख रुपये देण्यात आले होते.

पण या विश्वचषकाच्या विजयानंतर क्रिकेटचा मात्र चेहरामोहरा बदलून गेला होता. भारतामध्ये या विजयानंतर एक दिवसीय क्रिकेट सामन्याला प्रचंड लोकप्रियता मिळू लागली. क्रिकेटचे सामने दूरदर्शनवर नियमितपणे प्रसारित होऊ लागले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला यामुळे प्रचंड पैसा मिळू लागला. या पैशाच्या ताकदीने भारतीय क्रिकेटचा चेहरा मोहरा बदलला गेला.

– निवास उद्धव गायकवाड

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.