इस्लामी दहशतवादी गट अल-कायदाचा संस्थापक ओसामा बिन लादेनला अमेरिकेनं पाकिस्तानमध्ये 2 मे 2011 रोजी मारले. ओसामाच्या मृत्युला आता 13 वर्ष होऊन गेली आहेत. ओबामा लादेन मारला गेला असला तरी त्याची अनेक मुलं आहेत. ओसामला वीसहून अधिक मुलं-मुली असल्याची माहिती आहे. या त्याच्या मुलांमधील सर्वात मोठा मुलगा आता 43 वर्षाचा आहे. उमर बिन लादेन असं ओबामाच्या मुलाचे नाव आहे. या मोठ्या मुलाला ओबामानं अल कायदामध्ये सामिल करण्याचा प्रयत्न केला होता, पण मला लोकांना मारायला आवडत नाही, असे उत्तर देत उमरनं वेगळा मार्ग पत्करला. हा उमर त्याच्या पत्नीसोबत फ्रान्समध्ये एक चित्रकार म्हणून रहात होता. मात्र त्याला त्याच्याच वडिलांचे समर्थन केल्यामुले फ्रान्सनं हद्दपार केलं. सुरुवातीला ही हद्दपारी दोन वर्षांसाठी होती, आता फ्रान्स सरकानं भविष्यात उमरला फ्रान्समध्ये कधीही प्रवेश मिळणार नाही, असे जाहीर केले आहे. एकेकाळी आपल्या वडिलांच्या आतंकवादी कृत्याचा निषेध करणारा उमर त्याच्या पत्नीसोबत वडिलांचा वाढदिवस साजरा करत होता. (Omar Bin Laden)
उमरनं आपले वडिल, ओसामा बिन लादेन यांच्या वाढदिवसाचा केक कापला आणि त्यांचे आपण समर्थन करीत असल्याची पोस्ट सोशल मिडियावर शेअर केली होती. त्याच्या या पोस्टमुळे फ्रान्समध्ये खळबळ उडाली. ओसामा बिन लादेननं केलेल्या कृत्याचे कोणीही आणि कधीही समर्थन करु शकत नाही, असे बजावत फ्रान्स सरकारनं उमरला तात्काळ देश सोडण्याचे आदेश दिले. दहशतवादी ओसामा बिन लादेनचा मुलगा उमर बिन लादेन पुन्हा चर्चेत आला आहे. फ्रान्समध्ये एक चित्रकार म्हणून तो ओळखला जात होता. त्याला आता फ्रान्सने कायमचे हाकलून दिले आहे. उमर त्याच्या वडिलांचा, म्हणजेच दहशतवादी ओसामा बिन लादेनचा वाढदिवस साजरा करत होता. त्या वाढदिवसाची पोस्ट त्यानं सोशल मीडियावर शेअर केली. दहशतवादाचे समर्थन करणाऱ्या पोस्टमुळे उमर बिन लादेनची फ्रान्सचे गृहमंत्री ब्रुनो रिटेलो थेट हाकालपट्टी केली. (International News)
फ्रान्सच्या गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, उमर बिन लादेन फ्रान्सच्या नॉर्मंडी भागात त्याच्या पत्नीसह राहत होता. परंतु फ्रेंच अधिकाऱ्यांनी त्याला देश सोडण्याचे आदेश दिल्यानंतर त्याने फ्रान्स सोडून आता कतारमध्ये आपले घर केले. उमरवर ही बंदी 2023 मध्ये टाकण्यात आली होती. तेव्हा या बंदीचा काळ हा दोन वर्षांचा होता. पण आता फ्रान्स सरकारनं ही बंदी आजन्म केली आहे. त्यामुळे उमर कधीही फ्रान्समध्ये येऊ शकणार नाही. एक चित्रकार म्हणून उमरनं फ्रान्समध्ये आपली प्रतिमा तयार केली होती. त्याच्या चित्रांची प्रदर्शनेही फ्रान्सच्या मान्यवर आर्टगॅलरीमध्ये होत होती. त्या चित्रांच्या विक्रीतून येणा-या पैशातून आपली गुजरण होत असल्याचे उमरचे म्हणणे होते. (Omar Bin Laden)
मात्र फ्रान्स सरकरानं त्याच्या सर्व अर्जाना नकार देत आपल्या देशात दहशतवादाचे समर्थन करणा-यांना कधीही स्थान असणार नाही, असे सांगून उमरच्या आशेवर पाणी फिरवले आहे. ओबामा बिन लादेनचा मोठा मुलगा असलेल्या 43 वर्षाच्या उमर बिन लादेनचा जन्म सौदी अरेबियात झाला. 2000 साली त्याला 19 व्या वर्षी ओबामा बिन लादेननं अल कायदामधील प्रशिक्षण केंद्रात भरती होण्याचा आग्रह केला होता. पण त्यानं वडिलांना नकार देत सुरुवातीला सुदान आणि नंतर काही वर्ष अफगाणिस्तानमध्ये मुक्काम केला. 2007 मध्ये उमरने ब्रिटिश नागरिक जेन फेलिक्स-ब्राऊन बरोबर लग्न केले. जेननं त्यानंतर मुस्लिम धर्म स्विकारत झैना मोहम्मद हे मुस्लिम नाव धारण केले. या दोघांच्या वयात बराच फरक असल्यामुळे हे लग्न अनेक दिवस चर्चेचा विषय झालं होतं. (International News)
लग्न झाल्यावर उमरनं ब्रिटनमध्ये रहाण्यासाठी ब्रिटीश सरकारला विनंती केली. मात्र ब्रिटन सरकारनं त्याची मागणी फेटाळून लावली. तेव्हा उमर आणि त्याची पत्नी फ्रान्सच्या आश्रयाला गेले. 2011 मध्ये पाकिस्तानमध्ये अमेरिकन स्पेशल फोर्सने ओसामा बिन लादेनला ठार केल्यावर उमरनं आपल्या वडिलांचा मृतदेह मुलगा म्हणून मला मिळायला हवा होता, अशी पोस्ट टाकली, तेव्हाही तो वादात आला होता. मात्र त्याच वडिलांचा वाढदिवस साजरा करतांना त्यानं दहशतवादाचा गौरव केल्यामुळे त्याला फ्रान्सनं देश सोडायचा हुकूम दिला. या निर्णयाविरुद्ध उमरनं कायदेशीर लढाईही दिली. मात्र त्या लढाईत त्याचा पराभव झाला असून फ्रान्सनं त्याच्यासाठी आपल्या देशाची द्वारे कायमची बंद केली आहेत. (Omar Bin Laden)
======
हे देखील वाचा : इल्हान उमर आहे तरी कोण?
======
उमरनं 2009 मध्ये एक पुस्तकही प्रकाशित केले आहे. त्यात त्याचा जन्म कशा परिस्थितीत झाला हे सांगितले आहे. तसेच दहशतवादी ओसामा बिन लादेनचा मुलगा असल्यामुळे त्याला किती द्वेष सहन करावा लागला हेही या पुस्तकात सांगितले आहे. असे असले तरी जगभरातील गुप्तचर यंत्रणा उमरच्या मागावर आहेत. कारण त्याचा अद्यापही अल कायदाबरोबर संपर्क असल्याचा संशय व्यक्त होतो. मध्यंतरी त्यानं अल कायदाच्या काही दहशतवाद्यांबरोबर बैठक घेतल्याचीही माहिती बाहेर आली होती. अर्थात उमरचे चित्रकार मित्र दहशतवादी विचारसरणीचा उमरनं पूर्णपणे त्याग केल्याचे सांगतात. हाच उमर आता कतारच्या आश्रयाला गेला आहे. (International News)
सई बने