पाकिस्तानात विविध ठिकाणी मंदिराचे काही अवशेष मिळाले आहेत. मात्र नुकत्याच बौद्ध मंदिराबद्दल अधिक चर्चा केली जात आहे. यामागील कारण म्हणजे त्याचा इतिहास. पुरातत्व विभागाने असे म्हटले आहे की, पाकिस्तानातील स्वात जिल्ह्यात सापडलेले हे मंदिर फार प्राचीन आहे. ते जगभरात शोधण्यात आलेल्या आतापर्यंतचे सर्वाधिक जुने बौद्ध मंदिरांपैकी एक असू शकते. स्वात घाटात गेल्या दीर्घकाळापासून खोदकाम केले जात आहे. खोदकामादरम्यानच मंदिर आणि त्याचे काही अवशेष मिळाले आहेत.(Oldest Buddhist Temple)
काय आहे मंदिराचा इतिहास?
वेनिसच्या फोस्करी युनिव्हर्सिटी आणि पुरातत्व विभागाच्या लुका मारिया ओलिविएरी यांनी पाकिस्तान आणि इटली मधील साथीदारांच्या मदतीने खोदकाम केले. खोदकामादरम्यान, ज्या क्षेत्रात हे मंदिर मिळाले आहे ते प्राचीन गांधार क्षेत्राचा भाग आहे. तो हाच भाग आहे जो सिंकरदने जिंकला होता. पुरातत्ववाद्यांच्या मते, हे बौद्ध मंदिर दुसऱ्या शतकातील ईसा पूर्वच्या मध्य मधील आहे. जेव्हा गांधारवर उत्तर भारताच्या इंडो-युनानी साम्राज्याचे शासन होते. या मंदिराला तिसऱ्या शतकात ईसा पूर्व मध्ये उभारण्यात आलेल्या बौद्ध मंदिराच्यावरतीच बांधण्यात आले होते.
मंदिराची रचना कशी आहे?
लाइव सायन्सच्या रिपोर्ट्सनुसार, असे मानले जातेय की हे मंदिर बौद्ध धर्माचे संस्थापक सिद्धार्थ गौतम यांच्या मृत्यूच्य काही ९ वर्षाच्या आतमध्ये बनवले असेल. ५६३ ईसा पूर्वच्या जवळ गौतम बुद्ध उत्तर भारत आणि नेपाळ मध्ये रहायचे. रिपोर्ट्सनुसार, बारीकोट शहरच्या केंद्रस्थानी मिळालेल्या मदिराचे अवशेष हे १० फूटापेक्षा अधिक उंच आहेत.अवशेषांच्या घुमटाच्या रुपात बौद्ध स्मारक सुद्धा आहे. ज्याला स्तूप असे म्हटले जाते.
किती जुनं आहे मंदिर?
मंदिर परिसरात स्तूप, भिक्षुकांसाठी खास प्रकारचे कक्ष, पावटण्या, स्मारक स्तंभ आणि सार्वजनिक अंगण सुद्धा मिळाले आहे. या व्यतिरिक्त नाणी, दागिने, मुर्त्या, मोहरा, मातीच्या भांड्यांचे तुकडे, दगडांपासून बनवण्यात आलेल्या गोष्टी आणि २ हजारांहून अधिक कलाकृती मिळाल्या आहेत. पुरातत्ववाद्यांनी असे म्हटले की, आतापर्यंत समोर आले की, अवशेषांवरुन कळते हे सर्वाधिक जुने बौद्ध मंदिर आहे. मात्र अधिकृतपण पुष्टी करण्यासाठी यासाठी रेडियोकार्बन डेटिंगची मदत घेतली जाऊ शकते.(Oldest Buddhist Temple)
हे देखील वाचा- पाकिस्तान FATF च्या ग्रे लिस्टमधून बाहेर, जगासमोर बदलणार का देशाची प्रतिमा?
कशी झाली सुरुवात?
इटलीचे पुरातत्ववादी हे गेल्या काही दशकांपासून खोदकाम करत आहेत. काही तुकड्यांमध्ये त्यांनी खोदकाम केले आहे. २०१९ मध्ये बारिकोट शहरात पुन्हा खोदकाम केले तेव्हा त्यांना त्या ठिकाणी चोरट्यांनी खड्डा खणून त्याच्या माध्यमातून प्राचीन मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना असे वाटायचे की, तेथे काही खजिना असेल.