Home » नदीतून बाहेर आलं हजारो वर्ष जुनं एक गूढ शहर, तेव्हाही होत्या उंच इमारती अन् टॉवर

नदीतून बाहेर आलं हजारो वर्ष जुनं एक गूढ शहर, तेव्हाही होत्या उंच इमारती अन् टॉवर

0 comment
Share

इतिहासाच्या गर्भात अशी अनेक रहस्ये दडलेली आहेत, ज्यांची आपल्याला काहीच माहिती नाही. अशी रहस्ये कालांतराने समोर येत राहतात. दरम्यान असेच गूढ शहर समोर आले आहे. नदीतून बाहेर आलेल्या या शहराबद्दल ज्याला समजले, तो हे शहर पाहण्यासाठी पोहोचला. हे शहर तब्बल ३४०० वर्षांनंतर भूमीच्या गर्भातून बाहेर आले आहे. विशेष म्हणजे, या शहरात सर्व ऐतिहासिक गोष्टी दडलेल्या आहेत, ज्यावरून त्या काळातील सभ्यता आणि संस्कृती कशी होती? त्या काळात वास्तुकला कशी होती? लोक कसे जगायचे, हे लक्षात येते. (City emerges from river)

हे शहर इराक देशात आहे. इथे तिगरीस नदीच्या काठी जमिनीच्या गर्भातून एक संपूर्ण शहर बाहेर आलं आहे. पुरातत्वशास्त्रज्ञांच्या मते, हे शहर सुमारे साडेतीन हजार वर्षे जुने आहे. त्यांच्या मते, हजारो वर्षांनंतर समोर आलेल्या या शहरात बऱ्याच ऐतिहासिक गोष्टी लपलेल्या असू शकतात.

ताम्रयुगातील शहर

इराकच्या कुर्दिस्तान प्रांतात हे  ऐतिहासिक शहर आढळले आहे. स्थानिक पातळीवर पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर, बाहेर आलेले हे शहर ताम्रयुगातील असल्याचे सांगितले जात आहे. (City emerges from river)

१२७५ ते १४७५ मधील शहर 

या शहराबद्दल माहिती मिळताच, या शहराचा शोध घेण्यात येत आहे. पुरातत्वशास्त्रज्ञांच्या मते, हे शहर सुमारे १२७५ ईसापूर्व ते १४७५ ईसापूर्व आहे. (City emerges from river)

हे क्षेत्र मिटानी राज्याच्या अंतर्गत येते, ज्याने १४७५ ईसा पूर्व ते १२७५ बीसी पर्यंत तिगरीस प्रदेशावर राज्य केले. जर्मन आणि कुर्दिश पुरातत्वशास्त्रज्ञांची टीम सध्या या परिसराचा अभ्यास करत आहे. या शहरात टॉवर आणि इमारतीही आहेत. (City emerges from river)

त्यांनी मातीच्या १०० जुन्या टॅबलेट काढल्या आहेत. दुष्काळामुळे नावलौकिकात आलेल्या या शहरात मातीच्या भिंती असून, त्या एखाद्या राजवाड्याचा भाग असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी टॉवर्स आहेत आणि इमारतीही अनेक मजल्यांच्या आहेत. (City emerges from river)

दरम्यान, फ्रीबर्ग विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार, हे शहर ताम्रयुगातील आहे आणि ते मिटानी राज्याचे आहे. इ.स.पूर्व १३५० मध्ये झालेल्या भूकंपात हे ठिकाण नष्ट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

हे देखील वाचा: स्वतःच्याच करोडोंच्या मालमत्तेची माहिती महिलेला नव्हती; घर विकणार होती, तेव्हाच सापडला दडलेला खजिना

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुरातत्वशास्त्रज्ञांना याठिकाणी एक मोठी इमारत देखील सापडली आहे, जिथे विविध वस्तूंचा संग्रह केला जात होता. त्यावेळी झालेल्या भूकंपामुळे याच्या वरचा भाग उद्ध्वस्त झाला होता, तर खालचा भाग अजूनही काही प्रमाणात सुरक्षित असल्याचे तपास पथकाचे मत आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.