Ola-Uber Travel Tips : कॅबमधून प्रवास करताना बहुतांश तरुणींना आपल्या सुरक्षिततेची भीती वाटत राहते. तुम्ही देखील कॅबने सातत्याने प्रवास करत असल्यास पुढील काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा.
ओला असो किंवा उबर, कॅब बुकिंग करण्याआधी बहुतांशजणांच्या मनात भीती निर्माण होते. कारण ओला-उबेरच्या माध्यमातून प्रवास करताना घडलेल्या काही विचित्र घटनांमुळे मनात भीती निर्माण होणे सामान्य बाब आहे. अशातच तुम्ही कॅबने प्रवास करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. याबद्दलच जाणून घेऊया अधिक….

Ola Uber
अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही कॅब बुकिंग करताना लक्षात ठेवल्या पाहिजेत
-कॅब बुकिंग केल्यानंतर ज्यावेळी ड्रायव्हर तुम्हाला तुम्ही कॅब बुक केल्याचे विचारल्यानंतर त्यामध्ये बसू नका. सर्वप्रथम अॅपमध्ये दिलेल्या कारचा क्रमांक आणि कॅब जी तुमच्या समोर आहे त्याचा क्रमांक समान आहे का हे तपासून पाहा.
-दुसरी गोष्ट अशी की, अॅपवर जो रस्ता दाखवला जातोय ना याकडे लक्ष द्या. याशिवाय ड्रायव्हर तुम्हाला दुसऱ्या मार्गाने तर घेऊन जात नाहीय ना हे देखील पाहा.
-काही गाड्यांसाठी चाइल्ड लॉक फिचर येतात. यामुळे कारमध्ये बसल्यानंतर हे जरुर तपासून पाहा की, ड्रायव्हरने चाइल्ड लॉक फिचर एनेबल केले नाहीय ना. हे फिचर सुरू असल्यास कारच्या काचा आणि दरवाजा लॉक होऊ शकतो. (Ola-Uber Travel Tips)
-अॅपमध्ये ड्रायव्हरची जी ओखळ दाखवली आहे तोच कारमध्ये आहे का हे तपासून पाहा.
-सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट अशी की, एखादा कॅब ड्रायव्हर तुमच्यासोबत गैरवर्तवणूक करत असल्यास लगेच पोलिसांना फोन लावा. यासाठी 112 India App डाउनलोड करून ठेवा.