Home » तेलकट त्वचेवरील मेकअप निघून जातो? लक्षात ठेवा या टिप्स

तेलकट त्वचेवरील मेकअप निघून जातो? लक्षात ठेवा या टिप्स

तेलकट त्वचा असणाऱ्यांना मेकअप प्रोडक्ट्स निवडण्याची समस्या येते. एवढेच नव्हे त्वचेतून अत्याधिक तेल निघण्याच्या समस्येमुळे मेकअप केल्यानंतर लुक बिघडला जातो.

by Team Gajawaja
0 comment
Love Story
Share

Oily Skin Makeup Tips : आजकाल मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ब्युटी प्रोडक्ट्स मिळतात. याशिवाय प्रत्येक स्किन टाइपनुसार तरुणी ब्युटी प्रोडक्ट्स खरेदी करतात. जेणेकरुन मेकअप केल्यानंतर लुक अधिक खुलला जातो. अशातच तेलकट त्वचा असल्यास मेकअप करताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. खरंतर, तेलकट त्वचेवर मेकअप व्यवस्थितीत सेट होत नाही.

तेलकट त्वचा असणाऱ्या बहुतांशजणांच्या मनात असा प्रश्न उद्भवतो की, अखेर कोणता मेकअप लावला पाहिजे जो त्वचेसाठी बेस्ट असेल. मेकअप प्रोडक्ट खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. खासकरुन स्किन टोन आणि टाइपनुसार ब्युटी प्रोडक्ट्स खरेदी करावेत. जर तुमची त्वचा अत्याधिक तेलकट असल्यास स्किन केअर रुटीन फॉलो करावे. पुढील काही टिप्सच्या मदतीने तुम्ही तेलकट त्वचा असली तरीही मेकअप करू शकता.

तेलकट त्वचा मेकअपसाठी कशी तयार कराल?
सर्वप्रथम चेहरा क्लिन करा
तेलकट त्वचा असणाऱ्यांनी जेल आधारित फेस वॉशचा पर्याय निवडा. मेकअप लावल्याने चेहऱ्याला एखादा माइल्ड फेस वॉश लावा. यामुळे चेहऱ्यावरील अत्याधिक तेल निघून जाईल.

स्किन टोनिंग करा
चेहऱ्याला केवळ फेस वॉशने स्वच्छ करण्याएवजी डीप क्लिनिंग करू शकता. यासाठी फेस वॉश केल्यानंतर चेहऱ्याला टोनरने स्वच्छ करा. चेहऱ्याच्या टोनिंगसाठी गुलाब पाण्याचा वापर करू शकता.

बर्फाने मसाज करा
चेहऱ्याला गुलाब पाणी लावल्यानंतर बर्फाचा वापर करा. यासाठी एका भांड्यात पाणी घेऊन त्यात बर्फाचे तुकडे टाका. कमीत कमी 2-3 मिनिटे चेहरा त्यामध्ये बुडवून ठेवा.

मॉइश्चराइजर लावा
तेलकट त्वचेवर तुम्ही वॉटर बेस्ड मॉइश्चराइजर लावू शकता. असे केल्याने चेहऱ्यामधून अत्याधिक तेल निघणार नाही. (Oily Skin Makeup Tips)

चेहऱ्याला मसाज करा
मेकअप लावण्याधई चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करा. यामुळे चेहऱ्यावरील ब्लड फ्लो वाढला जाईल. त्वचा रिलॅक्स होईल. यानंतरच चेहऱ्यावर मेकअप करण्यास सुरूवात करा.


आणखी वाचा :
सेंसेटिव्ह स्किनसाठी घरच्याघरी असे तयार करा टोनर
उन्हाळ्यात पायांना भेगा पडतात? करा हे घरगुती उपाय
ओठांना मध लावण्याचे 5 आश्चर्यकारक फायदे

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.