Oily skin make up- त्वचेचे काही प्रकार असतात आणि प्रत्येकाची त्वचा ही वेगवेगळी असून त्यांना काही समस्या सुद्धा असू शकतात. यामध्ये तेलकट त्वचेचा सुद्धा समावेश होतो, तेलकट त्वचेची आपली एक वेगळीच समस्या असते, कधी पिंपल्स तर कधी चेहरा अधिक तेलकट होतो. अशातच जेव्हा तेलकट चेहऱ्यासाठी मेकअप करायची वेळ येते तेव्हा एखाद्या टास्क सारखीच स्थिती होऊन जाते. काही वेळेस तेलकट त्वचा असणाऱ्या महिला मेकअप करताना आपल्याची स्किन कोणत्या प्रकारची आहे हे लक्षात घेत नाही आणि अखेर मेकअप खराब होतो. त्यामुळे काही वेळेस त्वचेसंबंधित समस्या ही उद्भवू शकते. तर तेलकट त्वचा असणाऱ्यांनी मेकअप कसा करावा किंवा कोणत्या गोष्टींची काळजी मेकअप करताना घ्यावी यासंबंधितच आपण अधिक जाणून घेणार आहोत.
मेकअप आपल्यावर उठून दिसण्यासाठी आणि दीर्घकाळ टिकण्यासाठी तुम्हाला तुमच्या त्वचेवर काम करावे लागणार आहे. तर प्रथम जाणून घेऊयात तेलकट त्वचा असणाऱ्या महिलांनी मेकअपपूर्वी काय करावे.
-क्लिंजिंग, टोनिंग आणि मॉइस्चराइज
त्वचा कोरडी असो किंवा तेलकट, उत्तम त्वचेसाठी ती नेहमीच स्वच्छ असावी. एनसीबीआयच्या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आलेल्या एका संशोधनात असे म्हटले आहे की, त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी क्लिंजिंग केल्यास पिंपल्सची समस्या दूर राहू शकते. दरम्यान, लक्षात ठेवा तेलकट त्वचेला सूट होणारे क्लिजिंग घ्या. तेलकट त्वचेसाठी सॅलिसिलिक अॅसिड युक्त क्लिंजिंगची निवड करु शकता.
तसेच Witch Hazel युक्त टोनरचा वापर केल्यास त्वचेवरील अतिरिक्त तेल हटवण्यासाठी मदत होते. अन्य त्वचेप्रमाणे तेलकट त्वचेवर ही क्लिंजिंग, टोनिंगसह मॉइस्चराइज करण्याची आवश्यकता असते. असे केल्याने त्वचेवर होणाऱ्या जळजळीची समस्या दूर होते, तसेच त्वचेवर ओलावा टिकून राहतो.
हे देखील वाचा- मेकअपचा किट योग्य पद्धतीने कसा वापरालं?

-गुलाबाचे पाणी
मेकअप करण्यासाठी गुलाबाचे पाणी तुमच्या चेहऱ्याला, मानेवर स्प्रे करा. गुलाबाचे पाणी तुम्हाला तुमची त्वचा दिवसभर टवटवीत ठेवण्यास मदत करते. तसेच त्वचेमधील अत्याधिक तेल ही नियंत्रित करण्यात मदत होते. याचसोबत त्वचेवरील अॅक्नेच्या समस्येपासून ही बचाव करण्यास उपयोगी ठरते.(Oily Skin make up)
-प्राइमर जरुर लावा
मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्याला प्रायमर जरुर लावा. खरंतर प्राइमर फाउंडेशनसाठी बेस तयार करण्याचे काम करते. प्राइमर मेकअप दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत करते. या व्यतिरिक्त प्राइमरचा वापर केल्यास हायपरपिग्मेंटेशन आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या या कमी होण्यात मदत होते.
तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी ब्युटी प्रोडक्ट्स
फाउंडेशन, कंसीलर, ब्लेंडिंग स्पॉन्ज किंवा ब्रश, सेटिंग पाउडर आणि सेटिंग स्प्रे.
तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी मेकअप संदर्भात खास टीप्स
-फाउंडेशन लावा
चेहऱ्याला प्राइमर लावल्यानंतर जेव्हा त्वचा मेकअपसाठी तयार होईल तेव्हा सर्वात प्रथम फाउंडेशन लावा. उत्तर परिणामासाठी तुम्ही फाउंडेशनसाठी थोडे मॉइस्चराइजर मिक्स करा आणि आपल्या बोटांनी संपूर्ण चेहरा आणि मानेवर लावा. आता ब्लेंडिंग स्पॉन्ज वापरुन ते ब्लेंड करा. तेलकट त्वचेसाठी फाउंडेशनची निवड आपल्या स्किन टोननुसार करा. लक्षात ठेवा की, फाउंडेशनचा रंग हा तुमच्या स्किन टोनला मॅच होणारा असावा.
-आता कंसिलर लावा
कंसिलरचा उपयोग आपल्या डोळ्यांखालील काळे डागे लपवण्यासाठी केली जाऊ शकते. या व्यतिरिक्त चेहऱ्यावर डाग लपवण्यासाठी कंसिलर हे फायदेशीर ठरेल. आता फाउंडेशन लावल्यानंतर कंसिलर लावा.(Oily Skin make up)
-पाउडरच्या मदतीने सेट करा
फाउंडेशन आणि कंसिलर लाववल्यानंतर ट्रांसलूमेंट पाउडरला स्पॉन्जच्या माध्यमातून लावत मेकअप सेट करा. यामुळे तेलकट त्वचा ऑइल फ्री दिसते आणि मेकअप खुप वेळ चेहऱ्यावर राहतो.
-आता राहिलेला मेकअप करा
आता तुमच्या चेहऱ्याचा बेसिक मेकअप झाला असून त्यात तुमचा चेहरा उजळ दिलेस. आता तुम्ही मॅट ब्लश, आयशॅडो, आयलाइनर, काजळ आणि लिपस्टिक वापरुन तुमचा मेकअप पुर्ण करु शकता.
-सेटिंग स्प्रे देईल फाइनल लूक
अखेर तुम्हाला सेटिंग स्प्रे वापरुन मेकअप सेट करावा लागेल. उत्तम पद्धतीने फाउंडेशन, कंसिलर आणि ट्रांसलूसेंट पाउडर आणि अन्य गोष्टी केल्यानंतर शेवटी चेहऱ्यावर सेटिंग स्प्रेचा वापर करा. लक्षात ठेवा अधिक स्प्रे करु नका. सेटिंग स्प्रे तुमचा मेकअप हा दीर्घकाळ टिकवून ठेवेलय