Oily Skin Care Tips : तेकट त्वचेची काळजी घेणे थोडेसे कठीण असते. अधिक सीबमच्या उत्पादनामुळे त्वचा नेहमीच तेलकट दिसून येते. अशातच कळत नाही की, तेलकट त्वचेची नैसर्गिक पद्धतीने काळजी कशी घ्यायची. मार्केटमध्ये तेलकट त्वचेसाठी वेगवेगळ्या ब्युटी क्रिम्स उपलब्ध आहेत. यामधील बहुतांश प्रोडक्ट्समध्ये केमिकल असते. पण घरच्याघरी नैसर्गिक पद्धतीने बेसन आणि कडुलिंबाचा फेस मास्क लावू शकता.
बेसनमुळे त्वचेमधील अतिरिक्त तेल शोषून घेणे, डेड स्किन हटवणे आणि चेहऱ्याला चमक देण्यास मदत करते. याशिवाय कडुलिंबात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेंटरी गुणधर्म असल्याने तेलकट त्वचेसंदर्भातील समस्या दूर होऊ शकतात.
कडुलिंब आणि बेसनचा स्क्रब
सामग्री
-एक चमचा कडुलिंबाची पावडर
-एक चिमुटभर हळद
-एक चमचा बेसन
-आवश्यकतेनुसार गुलाब पाणी
असा तयार करा स्क्रब
-सर्वप्रथम कडुलिंबाची पावडर, हळद आणि बेसन मिक्स करा.
-यामध्ये थोडे गुलाब पाणी मिक्स करुन पेस्ट तयार करा.
-पेस्ट चेहऱ्यावर 10-15 मिनिटे लावून स्वच्छ धुवा. यानंतर चेहऱ्याला मॉइश्चराइजर लावा.
बेसन आणि कडुलिंबाचा फेस मास्क
बेसन आणि कडुलिंबाचा फेस मास्क चेहऱ्याला लावल्याने त्वचेमधील अतिरिक्त तेल कंट्रोल करण्यासाठी मदत होते. याशिवाय चेहऱ्यावर ग्लो देखील येतो.
आवश्यक सामग्री
-एक चमचा बेसन
-एक चमचा कडुलिंबाची पावडर
-अर्धा चमचा मध (Oily Skin Care Tips)
फेस मास्क असा करा तयार
-बेसन, कडुलिंबाची पावडर आणि मधाची पेस्ट तयार करा.
-पेस्ट चेहऱ्याला लावून 10-15 मिनिटे ठेवून स्वच्छ धुवा.
-अखेर त्वचेला मॉइश्चराइजर लावा.
आणखी वाचा :