पावसाळ्यात त्वचेसंदर्भातील काही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे पावसाळ्यात त्वचा ही तेलकट होऊ लागते. तेलकट त्वचा असण्यामागे काही कारण असू शकतात. यामध्ये प्रमुख कारणे अशी की, तणाव, हार्मोन्स मध्ये बदल, तेलकट पदार्थांचे अतिसेवन. अत्याधिक स्ट्रिट फूड खाण्याने सुद्धा त्वचेसंबंधित समस्या उद्भवू शकता. अशातच तेलकट त्वचा (Oily Skin) असलेल्या महिला त्यापासून सुटका मिळवण्यासाठी विविध ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करतात. मात्र ब्युटी प्रोडक्ट्समध्ये केमिकल्स असतात. याचा थेट परिणाम तुमच्या त्वचेवर होते. परंतु काही घरगुती उपायांनी तुम्ही पावसाळ्यात तुम्ही तुमच्या तेलकट त्वचेची काळजी कशी घ्यावी याबद्दलच्या काही टीप्स सांगणार आहोत.
-स्क्रबिंग करा
पावसाळ्यात तापमानात वारंवार बदल होत असल्याने चेहऱा तेलकट होऊ शकतो. अशातच तुम्ही स्क्रबची मदत घेऊ शकता. स्क्रबिंग केल्याने तुमच्या त्वचेवर असेली डेड स्किन निघून जाते. यासाठी तुम्ही लिंबू, साखर, मध, ऑलिव्ह ऑलचा वापरचा करु शकता. यामुळे तुमच्या त्वचेवरील तेलकटपणा काही प्रमाणात कमी होऊ शकतो.
-टोनरचा वापर करा
स्क्रबिंग केल्यानंतर टोनरचा वापर करा. यासाठी तुम्ही घरगुती वस्तूंचा वापर करु शकता. यामध्ये ग्रीन टी बॅग, एलोवेरा जेल आणि हलक्या कोमट पाण्याने टोनर करु शकता. यासाठी गरम पाण्यात सर्वप्रथम ग्रीन टी बॅग काही वेळासाठी ठेवा. जेव्हा पाणी थंड होईल तेव्हा ग्रीन टी बॅग काझा. आता एलोवेरा जेल त्यामध्ये मिसळून ते चेहऱ्याला लावा. काही वेळानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा.
हे देखील वाचा- High Heels घालत असाल तर तुम्ही वेदनेला देतायत आमंत्रण, वेळीच घ्या काळजी
-फेसमास्कचा वापर करा
पावसाळ्यात तेलकट त्वचेची (Oily Skin) काळजी घेण्यासाठी घरीच्या घरीच फेसमास्क तयार करु शकता. यासाठी पिकलेले केळ. दालचिनी पावडर आणि मध एकत्रित मिसळून फेस पॅक तयार करा. आता हे फेस पॅक जवळजवळ 10 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा. यानंतर चेहऱा स्वच्छपणे धुवा. त्वचेवर ओलावा टिकून राहण्यासाठी रोज 3 लीटर पाणी प्या. तसेच डाएटमध्ये पावसाळ्यात येणारी फळ, भाज्या यांचा जरुर समावेश करा. यामुळे शरिरात असलेले टॉक्सिन बाहेर पडण्यास मदत होईल.
-चेहऱ्यावर बेसन किंवा मुल्तानी मातीचा वापर
मुल्तानी माती किंवा बेसनचा वापर तुम्ही चेहऱ्याला लावू शकता. कारण चेहऱ्यावर अत्याधिक तेल यामुळे शोशले जाते. तुमची त्वचा यामुळे हायड्रेट सुद्धा करेल आणि त्वचेवर ओलावा टिकवून ठेवेल. या व्यतिरिक्त आपल्या त्वचेवरील पोर्स कमी करण्यासाठी हे फायदेशीर ठरेल.
तर वरील काही घरगुती उपायांनी तुम्ही पावसाळ्यात तुमच्या तेलकट त्वचेची काळजी घेऊ शकता. त्याचसोबत तुमची त्वचा अधिकच तेलकट असेल तर ब्युटी प्रोडक्ट्स स्वत:हून वापरण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्या. जेणेकरुन आपल्या चेहऱ्याची त्वचा ही अगदी नाजूक असल्याने तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो.