Home » तुमचे केस वारंवार तेलकट होतात? ‘या’ घरगुती उपायांनी सोडवा समस्या

तुमचे केस वारंवार तेलकट होतात? ‘या’ घरगुती उपायांनी सोडवा समस्या

by Team Gajawaja
0 comment
Oily hair
Share

तेलकट (Oily hair) आणि चिपचिपित झालेले केस कोणालाही आवडत नाहीत. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी लोक विविध प्रकारचे उपाय ही करतात. परंतु काही वेळेस त्यांचे सकारात्मक परिणाम दिसून येत नाहीत. सध्या ही समस्या सर्वसामान्य झाली आहे आणि त्यापासून सुटका कशी मिळवायची हा प्रश्न उपस्थितीत राहतोच. त्यामुळेच आम्ही तुम्हाला तुमचे केस वारंवार तेलकट होत असतील तर अशा कोणत्या घरगुती उपायांनी त्यावर तोडगा काढू शकता याबद्दल सांगणार आहोत. परंतु ते घरगुती उपाय तुमच्या तेलकट केसांना काही प्रमाणात कमी करु शकतात आणि केसांसंबंधित अन्य काही समस्यांपासून ही तुम्हाला दूर ठेवू शकतात.

तेलकट केस होण्यामागील कारणं
तेलकट केस होण्यामागील मुख्य कारण म्हणजे स्कॅल्पमध्ये असलेले सिबेशॅस (ऑइल ग्लँड्स) मधून अत्याधिक तेल निघणे. या तेलाला सीबम असे ही म्हटले जाते आणि ते अतिप्रमाणात निघण्याची काही कारण असू शकतात. याबद्दलच प्रथम आपण अधिक जाणून घेऊयात.

-महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये सीबम अधिक निर्माण होतो
-ओव्यूलेशन दरम्यान सीबमचे प्रमाण हे महिलांमध्ये अधिक होते
-वसंत किंवा उन्हाळ्यात ही समस्या अधिक होते
-वातावरणात ओलावा येणे
-नियमित रुपात केस न धुणे
-स्कॅल्प आणि केसांना अधिक प्रमाणात तेल लावणे

Oily hair
Oily hair

तेलकट केसांसाठी (Oily hair) घरगुती उपाय
-नारळाचे तेल
एका वाटीत नारळाचे तेल घेऊन ते हलके गरम करा. आता या तेलाने केसांना १५-२० मिनिटे मसाज करा. त्यानंतर एक तास हे तेल असेच केसांवर राहू द्या आणि अखेर शॅम्पूने तुमचे केस धुवा. तर नारळाचे तेल हे केसांसाठी खुप फायदेशीर मानले जाते. इंटरनॅशनल जर्नल ऑफ ट्रिकलोलॉजी यांच्या द्वारे करण्यात आलेल्या एका संशोधनात असे दिसून आले की, सुर्यफुल आणि मिनरल ऑइलच्या तुलनेत नारळाचे तेल हलके असतात ते अगदी सहज स्लॅल्पमध्ये मुरते. या तिन्ही तैलांपैकी नारळाचे तेल हे केसांमध्ये प्रोटीन तयार करण्यास मदत करु शकतात. परंतु तेलकट स्कॅल्पची समस्या नारळाचे तेल पूर्णपणे दूर करत नाही.

-सफरचंद व्हिनेगर
दोन-तीन चमचे सफरचंदाचे व्हिनेगर घेऊन त्यात एक कप पाणी टाका. केस शॅम्पूनी धुतल्यानंतर केस पुन्हा सफरचंदाच्या व्हिनेगरने ही वॉश केल्यानंतर ती थोडावेळ तशीच राहू आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. सफरचंदाच्या व्हिनेगरमुळे स्कॅल्प आणि केसांचे आरोग्य राखण्यास मदत होते. हे आपल्या अँन्टीमायक्रोबियल गुणांसाठी ओळखले जाते. त्यामुळेच हे केस आणि त्वचेवर संक्रमण करणारे बॅक्टेरिया दूर करण्यात मदत करु शकतात.

हे देखील वाचा- डोळ्यांच्या आरोग्यासाठी खा ‘हे’ सुपर हेल्थी फूड्स

-टी ट्री ऑइल
टी ट्री ऑइलचे १०-१२ थेंब आणि जवळजवळ ३० मिली नारळाचे किंवा जोजोबा ऑइल घ्या. हे तेल केसांच्या स्काल्प पर्यंत लावा आणि थोडा वेळ तसेच राहू द्या. तर १ तासांनी केस शॅम्पूने धुवा. तेलकट केसांमुळे कोंडा होण्याची शक्यता असते. अशातच जर तुम्ही टी ट्री ऑइलचा केसांसाठी वापर केल्यास कोंड्याची समस्या दूर होऊ शकते. यामध्ये असलेले अँन्टीफंगल गुण कोंड्याची समस्या दूर करण्यात मदत करु शकतात.

-एलोवेरा जेल
एक-दोन चमचे एलोवेरा जेल, एक चमचा लिंबूचा रस आणि एक कप पाणी घ्या. हे सर्व एकत्रित करुन त्याचे मिश्रण तयार करा. आता शॅम्पूने केस धुतल्यानंतर या मिश्रणाने पुन्हा मसाज करा आणि काही वेळाने केस थंड पाण्याने स्वच्छ धुवा. तेलकट केसांसाठी घरगुती उपाय म्हणून एलोवेरा हे काही प्रकारे केसांसाठी फायदेशीर आहे. केसांचे गळणे थांबवण्यासह त्यांना तुटण्यापासून ही मदत करु शकतात. तसेच कोंड्याची समस्या ही दूर करतात.

-अंड
एक अंड घेऊन त्यात एक चमचा लिंबूचा रस टाका. आता यांचे मिश्रण तयार करुन ते केसांना ३०-३५ मिनिटे लावून ठेवा. अखेर केसांना शॅम्पू लावल्यानंतर ते थंड पाण्याने धुवा. लक्षात ठेवा अंड लावल्यानंतर केस गरम पाण्याने धुणे टाळा. असे केल्यास केसांना लावेल्या अंड्याचा वास निघून जाण्यास समस्या येऊ शकते. केस आणि स्काल्प संबंधित काही समस्या दूर करण्यासाठी आणि केसांचे आरोग्य राखण्यासाठी अंड खुप फायदेशीर असते. केसांचे गळणे कमी करण्यासह तुटलेले केस ठिक करण्यास ही मदत करतात. या व्यतिरिक्त कोंड्याची समस्या की करणे आणि केसांना कंडिशन करण्यास ही मदत होते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.